Join us  

कोणत्याही महागड्या फेसपॅकपेक्षा जान्हवी कपूरला आवडतो 'हा' घरगुती उपाय- त्वचेच्या सौंदर्यासाठी ती.... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2024 5:49 PM

Janhavi Kapoor Shared Remedies For Glowing Skin: बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हिने नुकत्याच तिच्या स्किन केअर टिप्स शेअर केल्या आहेत..

बाेनी कपूर आणि श्रीदेवी यांची कन्या म्हणजे जान्हवी कपूर.जान्हवी कपूर सध्या तिच्या लग्नासंबंधी येणाऱ्या बातम्यांमुळे खूपच जास्त चर्चेत आहे. त्यासोबतच तिचा एक व्हिडिओदेखील सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये ती तिच्या त्वचेची कशी काळजी घेते आणि त्वचेचा ग्लो टिकवून ठेवण्यासाठी कोणता घरगुती उपाय करते, याविषयीची माहिती तिने शेअर केली आहे. हा उपाय करायला अगदी सोपा आहे. जान्हवी म्हणते की तिला अधून- मधून जसा वेळ मिळेल तेव्हा त्वचेचे सौंदर्य कायम ठेवण्यासाठी हा उपाय करायला खूप आवडते. बघा ती नेमकं काय करते....(janvi kapoor shared her beauty secret)

 

जान्हवी कपूरचा आवडता DIY फेसमास्क

त्वचेची काळजी घेण्यासाठी जान्हवी कपूर कोणता उपाय करते, याविषयीचा व्हिडिओ amy_aliya_devriz या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. 

उन्हाळ्यात कोथिंबीर लवकर सुकते, आज आणली तर उद्या वाळून जाते? २ उपाय- कोथिंबीर राहील हिरवीगार

यामध्ये जान्हवी सांगते की हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी एका वाटीमध्ये १ चमचा दही घ्या. त्यात १ चमचा मध टाका. 

आता त्या मिश्रणात केळीचा एक छोटासा तुकडा टाका आणि दही, मध, केळीचा तुकडा हे सगळं मिश्रण व्यवस्थित कालवून एकजीव करून घ्या.

 

यानंतर हे मिश्रण चेहऱ्याला लावा आणि ८ ते १० मिनिटे चेहऱ्याला हळूवार मसाज करा.

यानंतर एखादी संत्री किंवा मोसंबी अगदी मधोमध कापा आणि तिचे दोन तुकडे करा. त्यापैकी एक तुकडा घेऊन चेहऱ्यावर त्याने थेट ५ ते ७ मिनिटांसाठी स्क्रबिंग करा.

दूध घातलेला चहा पिणं सोडा, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचा सल्ला! चहा प्यायचाच असेल तर....

यानंतर चेहरा स्वच्छ धुवून टाका. या उपायामुळे दही, मध, केळी यामुळे त्वचा छान हायड्रेटेड होईल तसेच व्हिटॅमिन सी असणाऱ्या स्क्रबिंगमुळे त्वचेवरचे टॅनिंग, डेडस्किन निघून जाऊन त्वचा छान फ्रेश होईल. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीजान्हवी कपूर