बेकिंग सोडा
बेकिंग सोडा हे सौंदर्य उत्पादनात अनेक कारणांसाठी वापरण्यात येऊ लागला. त्याचे साफ करणारे गुणधर्म हे एक चांगले आणि नैसर्गिक क्लिंजर बनवतात. याशिवाय, हे एक उत्कृष्ट एक्सफोलिएंट देखील आहे जे त्वचेवरील मृत त्वचा, घाण आणि अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत करतात. 2 चमचे बेकिंग सोडा 2 चमचे पाण्यात मिसळून पेस्ट बनवा आणि प्रभावित भागावर लावा. कोरडे झाल्यावर कोमट पाण्याने धुवा.
टोमॅटो
टोमॅटो हा एक नैसर्गिक तुरट आणि त्वचा उजळणारा घटक आहे. यात अनेक पोषक घटक आहेत. तेलकट त्वचेसाठी हे वरदानापेक्षा कमी नाही. २ चमचे ओट्स पावडरमध्ये टोमॅटोचा रस मिसळून पेस्ट बनवा. ब्लॅकहेड्स असलेल्या भागांवर ते लावा. 10 मिनिटांनंतर, ते हलक्या हातांनी घासून घ्या आणि कोमट पाण्याने धुवा.
टूथपेस्ट
टूथपेस्ट फक्त दात चमकदार बनवण्यासाठी नाही तर, चेहरा तजेलदार बनवण्यासाठी देखील मदत करेल. सर्वप्रथम, 1 चमचा बेकिंग सोडा, 1 चमचा टूथपेस्ट(पांढरी टूथपेस्ट) आणि 1 चमचा पाणी मिसळून पेस्ट बनवा. आता कोमट पाण्यात एक मऊ टॉवेल भिजवा आणि ब्लॅकहेड भाग दाबा, यामुळे ब्लॅकहेड्स सहज दूर होतील. आता तयार केलेली पेस्ट लावा आणि मऊ टूथब्रशने गोलाकार हालचालीत हलक्या हाताने घासून घ्या. लक्षात ठेवा की हे 2 मिनिटांपेक्षा जास्त काळ करू नये. यानंतर चेहरा सौम्य फेसवॉशने धुवा आणि मॉइश्चरायझ करा.