Join us  

ब्लॅकहेड्स फार दिसतात, ३ घरगुती उपाय चेहरा दिसेल चमकदार, ब्लॅकहेड्स होतील कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2022 5:11 PM

Beauty Remedy Blackheads या फेस्टीव्ह सीजनमध्ये ब्लॅकहेड्सपासून मिळवा छुटकारा, फक्त ३ उपाय देतील ग्लोविंग लुक 

एका विशिष्ट वयानंतर महिलांच्या चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स निर्माण होतात. ते काळपट ब्लॅकहेड्स तुमच्या चेहऱ्यावरील चमक हिरावून घेते. मेकअप करून देखील काही ब्लॅकहेड्स लपवणे कठीण जाते. या ब्लॅकहेड्समुळे चेहरा निस्तेज आणि निर्जीव बनते. सुंदर चेहऱ्याला देखील हे ब्लॅकहेड्स कुरूप बनवतात. त्वचेच्या छिद्रांमध्ये तेल आणि बाहेरील हवा प्रदूषण जाऊन चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स निर्माण होतात. तेलकट त्वचा असलेल्या लोकांना ब्लॅकहेड्सचा धोका जास्त असतो. त्यांना त्वचेची अधिक काळजी घेणे तितकेच महत्वाचे आहे. या ब्लॅकहेड्सपासून छुटकारा मिळवण्यासाठी आपण घरगुती ३ उपायांचा वापर करू शकता. बाहेरील रासायनिक प्रोडक्ट्सचा वापर न करता घरगुती साहित्यांपासून आपण या फेस्टीव्ह सीजनमध्ये ग्लोविंग चेहरा मिळवू शकता.

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा हे सौंदर्य उत्पादनात अनेक कारणांसाठी वापरण्यात येऊ लागला. त्याचे साफ करणारे गुणधर्म हे एक चांगले आणि नैसर्गिक क्लिंजर बनवतात. याशिवाय, हे एक उत्कृष्ट एक्सफोलिएंट देखील आहे जे त्वचेवरील मृत त्वचा, घाण आणि अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत करतात. 2 चमचे बेकिंग सोडा 2 चमचे पाण्यात मिसळून पेस्ट बनवा आणि प्रभावित भागावर लावा. कोरडे झाल्यावर कोमट पाण्याने धुवा.

टोमॅटो

टोमॅटो हा एक नैसर्गिक तुरट आणि त्वचा उजळणारा घटक आहे. यात अनेक पोषक घटक आहेत. तेलकट त्वचेसाठी हे वरदानापेक्षा कमी नाही. २ चमचे ओट्स पावडरमध्ये टोमॅटोचा रस मिसळून पेस्ट बनवा. ब्लॅकहेड्स असलेल्या भागांवर ते लावा. 10 मिनिटांनंतर, ते हलक्या हातांनी घासून घ्या आणि कोमट पाण्याने धुवा.

टूथपेस्ट

टूथपेस्ट फक्त दात चमकदार बनवण्यासाठी नाही तर, चेहरा तजेलदार बनवण्यासाठी देखील मदत करेल. सर्वप्रथम, 1 चमचा बेकिंग सोडा, 1 चमचा टूथपेस्ट(पांढरी टूथपेस्ट) आणि 1 चमचा पाणी मिसळून पेस्ट बनवा. आता कोमट पाण्यात एक मऊ टॉवेल भिजवा आणि ब्लॅकहेड भाग दाबा, यामुळे ब्लॅकहेड्स सहज दूर होतील. आता तयार केलेली पेस्ट लावा आणि मऊ टूथब्रशने गोलाकार हालचालीत हलक्या हाताने घासून घ्या. लक्षात ठेवा की हे 2 मिनिटांपेक्षा जास्त काळ करू नये. यानंतर चेहरा सौम्य फेसवॉशने धुवा आणि मॉइश्चरायझ करा.

 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सहोम रेमेडी