Lokmat Sakhi >Beauty > या लक्षणांवरून ओळखा शरीरातली व्हिटामीन सी ची कमतरता; त्वचेवरील परिणांमासह दृष्टी जाण्याचाही धोका

या लक्षणांवरून ओळखा शरीरातली व्हिटामीन सी ची कमतरता; त्वचेवरील परिणांमासह दृष्टी जाण्याचाही धोका

Vitamin c deficiency signs : व्हिटामीन सी ची कमतरता जाणवल्यानं शरीराला व्यवस्थित पोषण मिळत नाही. त्यामुळे जखम भरायला खूप वेळ लागतो. 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 03:02 PM2021-05-28T15:02:41+5:302021-05-28T15:21:52+5:30

Vitamin c deficiency signs : व्हिटामीन सी ची कमतरता जाणवल्यानं शरीराला व्यवस्थित पोषण मिळत नाही. त्यामुळे जखम भरायला खूप वेळ लागतो. 

Vitamin c deficiency signs symptoms disease food | या लक्षणांवरून ओळखा शरीरातली व्हिटामीन सी ची कमतरता; त्वचेवरील परिणांमासह दृष्टी जाण्याचाही धोका

या लक्षणांवरून ओळखा शरीरातली व्हिटामीन सी ची कमतरता; त्वचेवरील परिणांमासह दृष्टी जाण्याचाही धोका

Highlightsजर तुमचे डोळे वाढत्या वयात कमकुवत होत असतील तर व्हिटामीन सी आणि एंटी ऑक्सिडेंट्सच्या कमरतेमुळे ही समस्या आणखी वाढू शकते.

व्हिटामीन सी शरीरासाठी खूप फायद्याचं मानलं जातं. महिलांना  दिवसभरात  ७५ मिलिग्राम तर पुरूषांना ९० मिलिग्राम  व्हिटामीन सी ची आवश्यकता असते. अनेकदा  शरीरात नैसर्गिकरित्या व्हिटामीन सी तयार होण्यास अडचड होत असते. म्हणूनच व्हिटामीन सी  वाढवत असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करणं गरजेचं आहे. 

कोणत्या लोकांमध्ये व्हिटामीन सी ची कमतरता असते?

जीवनशैली खराब असणं, किडणी खराब असणं, खाण्यापिण्याच्या सवयी, जास्त धुम्रपान आणि मद्यपान केल्यानं  व्हिटामीन सी ची कमतरता भासते. व्हिटामीन सी ची कमतरता असल्यानं काही लक्षणं दिसून येतात. 

जखम भरण्यास वेळ लागतो

अनेकदा शरीरात व्हिटामीन सी चे प्रमाण कमी होते.  शरीराला कोलोजन तयार करण्याची आवश्यकता असते. कोलोजनमुळे प्रोटीन्स आणि त्वचा रिपेअर होण्यास मदत मिळते. व्हिटामीन सी मुळे न्युट्रोफिल पोहोचण्यास मदत होते. व्हिटामीन सी ची कमतरता जाणवल्यानं शरीराला व्यवस्थित पोषण मिळत नाही. त्यामुळे जखम भरायला खूप वेळ लागतो. 

हिरड्यांमधून रक्त बाहेर येतं

व्हिटामीन सी रक्तवाहिन्यांना निरोगी ठेवते. दात आणि हिरड्यांसाठी कोलेजन गरजेचं आहे. एका अभ्यासानुसार हिरड्याचा आजार असलेल्यांनी दोन आठवडे द्राक्ष खाल्ल्यानंतर हिरड्यातून रक्त येणं बंद झालं होतं.  या व्यतिरिक्त नाकातून रक्त येणं व्हिटामीन सी चा संकेत देत होते. 

वजन वाढणं

अनेक रिसर्चमधून असं दिसून येत आहे की शरीरात व्हिटामीन सी आणि वजनाचा विशिष्ट संबंध आहे. खासकरून पोटावरवरील चरबीशी. व्हिटामीनचा सी आहारात समावेश केल्यानं शरीरातील फॅट्स एनर्जीत बदलतात. 

सुरकुत्या आणि निस्तेज त्वचा

व्हिटामीन सी च्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. या व्यतिरिक्त सुरकुत्याही यायला सुरूवात होते.  जे लोक व्हिटामीन सी असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश  करतात त्यांची त्वचा मऊ असते. व्हिटामीन सी एक एंटी ऑक्सिडेंट्स आहेत. जे फ्री रॅडीकल्सपासून वाचवण्यासाठी मदत करतात. 

थकवा चिडचिड 

व्हिटामीन सी ची शरीरात कमतरता भासल्यांतर थकवा आणि चिडचिड जाणवते. १४१ लोकांवर करण्यात आलेल्या संशोधनात असं दिसून आलं की, व्हिटामीन सी च्या कमतरतेमुळे जास्त थकवा जाणवतो. व्हिटामीन सी दिल्यानंर काही तासांच्या आत या लोकांना व्यवस्थित वाटू लागलं.  याशिवायही थकवा आणि चिडचिड येण्याची अनेक कारणं असू शकतात.

कमकुवत इम्यूनिटी

व्हिटामीन सी मुळे रोगप्रतिकारकशक्ती कमकवत होऊ शकते. यामुळे तुम्ही वारंवार आजारी पडू शकता. तसंच बरं व्हायरला बराच वेळ लागू शकतो. काही अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार व्हिटामीन सी, निमोनिया, ब्लॅडर इन्फेक्शनप्रमाणे इतर आजारांपासून वाचवायचे काम करते. याव्यतिरिक्त हृदयाचे आजार आणि कॅन्सर होण्याचे चान्सेस कमी होतात. 

डोळे कमजोर होणं

जर तुमचे डोळे वाढत्या वयात कमकुवत होत असतील तर व्हिटामीन सी आणि एंटी ऑक्सिडेंट्सच्या कमरतेमुळे ही समस्या आणखी वाढू शकते. चांगला आहार, व्हिटामीन सी घेतल्यास मोतीबिंदू होण्याची शक्यता कमी होते. 

याऊलट  व्हिटॅमिन सी चे जास्त सेवन देखील आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. व्हिटॅमिन-सी देखील या सर्व पदार्थांप्रमाणे आहे, जे आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे आहे, परंतु जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीराला हानी पोहचू शकते. 

तज्ञ म्हणतात की जास्त प्रमाणात व्हिटॅमिन-सी घेतल्यामुळे आपण अतिसाराची समस्या उद्भवते. आपले पोट खराब होऊ शकते. उलट्या आणि अतिसार वाढू शकतो. या समस्या वाढल्यास बॉडी डिहायड्रेट देखील होऊ शकते. जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी घेतल्यामुळे आपल्याला मळमळ होऊ शकते. फळांमधील व्हिटामीन सी मुळे अशा समस्या होण्याची शक्यता कमी आहे, परंतु बाजारात उपलब्ध असलेल्या व्हिटॅमिन-सीच्या सप्लिमेंट्स कमी प्रमाणात घ्या.

जास्त व्हिटॅमिन-सी सेवन केल्याने पोटात वेदना  होऊ शकतात. म्हणून, एकाच वेळी व्हिटॅमिन-सी उत्पादनांचा मोठ्या प्रमाणात वापर करणे टाळा. निद्रानाश किंवा डोकेदुखी- जास्त प्रमाणात व्हिटॅमिन-सी घेतल्यामुळे निद्रानाश (निद्रानाश) आणि डोकेदुखी देखील होऊ शकते. रात्री झोपताना अस्वस्थता वाढू शकते. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी अशा गोष्टी खाऊ नका.

किती प्रमाणात सेवन करायला हवे?

अभ्यासानुसार लोकांना दररोज ६५ ते ९० मिलीग्राम व्हिटॅमिन-सी घेण्याचा सल्ला दिला जातो. दिवसाला 2000 ग्रॅमपेक्षा जास्त व्हिटॅमिन-सी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. उदाहरणार्थ, संत्र्यात सुमारे ५१ मिलीग्राम व्हिटॅमिन-सी असते. म्हणजेच, आपण एका दिवसात २ संत्री आरामात खाऊ शकता.

Web Title: Vitamin c deficiency signs symptoms disease food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.