Lokmat Sakhi >Beauty > अक्रोड-बदाम फक्त खाऊ नका, काळ्याभोर आयब्रोजसाठी करा ‘हा’ नॅचरल उपाय, पाहा कसा बदलतो लूक...

अक्रोड-बदाम फक्त खाऊ नका, काळ्याभोर आयब्रोजसाठी करा ‘हा’ नॅचरल उपाय, पाहा कसा बदलतो लूक...

Grow Your Eyebrows By Using Homemade Serum : serum to grow sparse & thin eyebrows : HOMEMADE Eyebrow Growth Serum : Walnuts Almonds Homemade Eyebrow Growth Serum : पातळ - विरळ आयब्रोजवर करा अक्रोड - बदाम सारख्या ड्रायफ्रुटसची खास जादू...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2025 14:46 IST2025-03-13T14:10:35+5:302025-03-13T14:46:02+5:30

Grow Your Eyebrows By Using Homemade Serum : serum to grow sparse & thin eyebrows : HOMEMADE Eyebrow Growth Serum : Walnuts Almonds Homemade Eyebrow Growth Serum : पातळ - विरळ आयब्रोजवर करा अक्रोड - बदाम सारख्या ड्रायफ्रुटसची खास जादू...

Walnuts Almonds HOMEMADE Eyebrow Growth Serum serum to grow sparse & thin eyebrows | अक्रोड-बदाम फक्त खाऊ नका, काळ्याभोर आयब्रोजसाठी करा ‘हा’ नॅचरल उपाय, पाहा कसा बदलतो लूक...

अक्रोड-बदाम फक्त खाऊ नका, काळ्याभोर आयब्रोजसाठी करा ‘हा’ नॅचरल उपाय, पाहा कसा बदलतो लूक...

डोळ्यांवरील भुवया आपल्या डोळ्यांचे खरेखुरे सौंदर्य वाढवतात. आपल्या भुवया जाड, दाट आणि भरीव असाव्यात असे प्रत्येकीला वाटते. पातळ, विरळ झालेले भुवयांचे केस यामुळे भुवया (Grow Your Eyebrows By Using Homemade Serum) पाहिजे तितक्या सुंदर - रेखीव दिसत नाहीत. यासाठी आपण भूवयांवर अनेक उपाय देखील करुन पाहतो. दर महिन्याला आयब्रोज करणे, आयब्रोजचे केस वाढण्यासाठी त्यावर तेल किंवा क्रीम लावणे. इतकेच नव्हे तर काहीवेळा आपण भुवया दाट - भरीव (serum to grow sparse & thin eyebrows) होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आर्टिफिशियल ट्रिटमेंट्स देखील करतो. परंतु आयब्रोज जाड - भरीव होण्यासाठी असे आर्टिफिशियल उपाय करण्यापेक्षा आपण घरच्या घरीच काही नैसर्गिक पदार्थ वापरुन घरगुती उपाय देखील करु शकतो(Walnuts Almonds Homemade Eyebrow Growth Serum )

या घरगुती उपायांमध्ये आपण अक्रोड, खोबरेल तेल, बदामाचे तेल यांसारख्या घरातच उपलब्ध असणाऱ्या नैसर्गिक पदार्थांचा वापर करुन आयब्रोजसाठी घरगुती हेअर ग्रोथ सीरम तयार करु शकतो. या घरगुती नॅचरल सीरमचा वापर केल्याने भुवयांच्या केसांची वाढ करण्यासोबतच त्यांना दाट आणि भरीवपणा देखील येऊ शकतो. 

आयब्रोज दाट - भरीव करण्यासाठी होममेड सीरम कसे तयार करावे ?

साहित्य :- 

१. अक्रोड - १
२. पेट्रोलियम जेली - १ टेबलस्पून 
३. व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल - १ कॅप्सूल 
४. खोबरेल तेल - १ टेबलस्पून 
५. बदामाचे तेल - १ टेबलस्पून 

उन्हाळ्यांत तेलकट त्वचेसाठी फक्त चमचाभर चंदन पावडरची जादू, तेलकटपणा होईल मिनिटभरात गायब...


अंगणातील लालचुटुक जास्वंदीच्या फुलांचे करा होममेड कंडिशनर, केसांना मिळेल पोषण - येईल नॅचरल चमक...

कृती :- 

१. सर्वात आधी चिमट्यामध्ये अक्रोड धरुन गॅसच्या मंद आचेवर संपूर्णपणे काळा रंग येईपर्यंत भाजून घ्यावा. 
२. त्यानंतर भाजून घेतलेला अक्रोड खलबत्त्याने कुटून त्याची बारीक पूड तयार करून घ्यावी. 

केसांच्या अनेक समस्या सतावतात ? करुन पाहा आवळा - रिठा - शिकेकाईच्या पाण्याचा असरदार उपाय...

३. आता ही काळ्या रंगाची अक्रोडची पूड एका कंटेनरमध्ये भरुन घ्यावी. 
४. त्यानंतर या कंटेनरमध्ये प्रत्येकी १ टेबलस्पून पेट्रोलियम जेली वितळवून घालावी, त्यानंतर खोबरेल तेल व बदामाचे तेल घालावे. 
५. सगळ्यांत शेवटी व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल फोडून घालावी. 
६. सगळे जिन्नस चमच्याच्या मदतीने कालवून एकजीव करून घ्यावे. 

आयब्रोजसाठीचे घरगुती सीरम वापरण्यासाठी तयार आहे. 

या सीरमचा वापर कसा करावा?     

रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही बड्सच्या मदतीने हे तयार सीरम आयब्रोजवर लावून घ्यावे. त्यानंतर रात्रभर हे सीरम आयब्रोजवर तसेच राहू द्यावे. सकाळी स्वच्छ पाण्याने आयब्रोज धुवून घ्यावेत. हा उपाय महिनाभर केल्यास आपल्याला आयब्रोजमध्ये लगेच फरक दिसून येईल.

Web Title: Walnuts Almonds HOMEMADE Eyebrow Growth Serum serum to grow sparse & thin eyebrows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.