Join us  

तमन्नासारखी ग्लोइंग - कोमल त्वचा हवी? घरगुती साहित्यांचा करा असा वापर, त्वचेला मिळेल नवी चमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2023 3:33 PM

Tamannaah Bhatia Home Remedies for Skin तमन्नाची तुकतुकीत त्वचा प्रत्येकाला भावते. ही त्वचा मिळवण्यासाठी फक्त २ पद्धतींना करा फॉलो..

साऊथसह हिंदी सिनेसृष्टी गाजवणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया आपल्या दिलखेचक अदाकारीसाठी ओळखली जाते. तिचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. तिच्या अदाकारीसह सौंदर्यावर भाळणारे फॅन्स आपण पाहिलेच असतील. तिची तुकतुकीत तजेलदार त्वचा प्रत्येकाला भावते.

तिने अनेक मुलाखतींमधून आपल्या चमकणाऱ्या कोमल त्वचेबद्दल माहिती दिली आहे. ती महागड्या प्रोडक्ट्सपासून लांब राहते. ती आपल्या त्वचेची काळजी घरगुती उपयांपासून घेते. आपल्याला देखील तमन्नासारखी चमकदार त्वचा हवी असल्यास काही टिप्स फॉलो करा.

चेहऱ्याची स्वच्छता राखणं महत्त्वाचं

चेहरा खोलवर स्वच्छ करण्यासाठी चांगल्या स्क्रबचा वापर करणं आवश्यक. काही लोक महागड्या स्क्रबचा वापर करतात. पण तमन्नाला नैसर्गिक गोष्टी वापरायला आवडतात. ती घरी स्क्रब बनवण्यासाठी चंदन, कॉफी आणि मधाचा वापर करते. या तिन्ही गोष्टी एकत्र मिसळून स्क्रब तयार करते आणि चेहऱ्यावर लावते. १० मिनिटे ठेवल्यानंतर सामान्य पाण्याने धुते. याने चेहऱ्याला नैसर्गिक ग्लो मिळतो.

चेहऱ्याला हायड्रेटेड ठेवणं महत्त्वाचं

चेहरा डिहायड्रेटेड झाला की, अनेक समस्या उद्भवतात. चेहऱ्यावरील हायड्रेशन लॉक करण्यासाठी बेसन, दही आणि गुलाबपाणीचा वापर करा. त्वचेवरील हायड्रेशन राखण्यासाठी पॅकमध्ये या तिन्ही वस्तू मिसळा. आणि चेहऱ्यावर लावा. १० मिनिटानंतर चेहरा धुवा. याने त्वचेवरील लालसरपणा कमी होईल. यासह चेहरा कोमल होईल.

जेव्हा ती थंड ठिकाणी शूट करते तेव्हा ती प्रथम वाफ घेते. असे केल्याने चेहऱ्यावरील छिद्र मोकळे होतात. मग ती बेसन, दही आणि गुलाबपाणी असलेला पॅक लावते. याने चेहऱ्याला संरक्षण मिळते.

टॅग्स :तमन्ना भाटियाब्यूटी टिप्सत्वचेची काळजी