आपण आपल्या दातांची विशेष काळजी घेतो. हसताना किंवा फोटोमध्ये दात पांढरे दिसण्यासाठी आपण अनेक दातांच्या दवाखान्यात जाऊन भेट देतो. दातांची विशेष काळजी घेण्यासाठी आपण अनेक महागडे ओरल केअर प्रोडक्ट्स वापरतो. सहसा वेगवेगळ्या टूथपेस्ट आणि माउथवॉश वापरूनही अनेकांचे दात पिवळे पडतात. अशा स्थितीत घरगुती साहित्याने तुम्ही ओरल केअर प्रोडक्ट घरच्या घरी बनवू शकता, ते ही केळीच्या सालेपासून. केळीच्या सालीच्या मदतीने दातांचा पिवळेपणा कमी करता येतो. केळीचे साल फेकून न देता तुम्ही एक विशिष्ट घरगुती प्रकारे दातांसाठी खास ओरल केअर प्रोडक्ट बनवू शकता.
दातांसाठी हर्बल पावडर बनवण्यासाठी साहित्य
केळीचे साल
१ चमचे कॅल्शियम पावडर
२ चमचे ऑलिव्ह तेल
१ चमचे मीठ
हर्बल पावडर बनवण्याची पद्धत
घरगुती हर्बल पावडर बनवण्यासाठी प्रथम केळीची साले उन्हात वाळवण्यासाठी ठेवा, केळीचे साल हे फ्रेश आणि पिवळे असणे गरजेचं आहे. केळीचे साल सुकल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून पावडर बनवा. आता या पावडरमध्ये कॅल्शियम पावडर, ऑलिव्ह ऑईल आणि मीठ घालून चांगले मिसळा. आता ही पावडर डब्ब्यामध्ये साठवा, तुमची हर्बल पावडर तयार आहे.
हर्बल पावडरचा वापर
सर्वप्रथम हातावर हर्बल पावडर काढून घ्यावे. आता ही पावडर बोटात लावून हिरड्या स्वच्छ करावे. यानंतर टूथब्रशमध्ये पावडर घेऊन दात स्वच्छ करावे. ब्रश केल्यानंतर, आपले तोंड कोमट पाण्याने स्वच्छ धुवावे. ही पावडर तुम्ही दिवसातून एकदा वापरू शकता. मात्र, पावडर लावल्यानंतर ती हिरड्यांवर आणि दातांवर जास्त वेळ ठेऊ नये. लगेच धुवून टाकावे.
हर्बल पावडरचे फायदे
दात पांढरे करण्यासाठी घरगुती हर्बल पावडर वापरणे हे उत्तम आहे. यामुळे तुमचे दात पांढरे आणि चमकदार दिसतात. त्याचबरोबर हर्बल पावडरमध्ये असलेले कॅल्शियम दात मजबूत करण्यास मदत करते. याशिवाय हर्बल पावडरने मसाज केल्याने हिरड्या मजबूत होतात.