Lokmat Sakhi >Beauty > काचेप्रमाणे तुकतुकीत त्वचा हवी? मधापासून बनवा फेसक्रीम, ३ साहित्यात ५ मिनिटात येईल ग्लो

काचेप्रमाणे तुकतुकीत त्वचा हवी? मधापासून बनवा फेसक्रीम, ३ साहित्यात ५ मिनिटात येईल ग्लो

Want skin as smooth as glass? Make face cream from honey चेहरा ग्लो करावा असे प्रत्येकाला वाटते, यासाठी एक फेसक्रीमचा करा असा वापर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2023 02:46 PM2023-02-08T14:46:37+5:302023-02-08T14:47:33+5:30

Want skin as smooth as glass? Make face cream from honey चेहरा ग्लो करावा असे प्रत्येकाला वाटते, यासाठी एक फेसक्रीमचा करा असा वापर..

Want skin as smooth as glass? Make face cream from honey, glow in 5 minutes with 3 ingredients | काचेप्रमाणे तुकतुकीत त्वचा हवी? मधापासून बनवा फेसक्रीम, ३ साहित्यात ५ मिनिटात येईल ग्लो

काचेप्रमाणे तुकतुकीत त्वचा हवी? मधापासून बनवा फेसक्रीम, ३ साहित्यात ५ मिनिटात येईल ग्लो

त्वचा तुकतुकीत तजेलदार दिसण्यासाठी आपण चेहऱ्यावर एक्सपेरिमेंट करतच असतो. आपली त्वचा ग्लो करावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी आपण फेस पॅक, स्क्रब, फेशिअल अशा कित्येक ब्युटी ट्रीटमेंटचा आधार घेतो. पण या उपायांमुळे क्षणिक फायदा होतो तसंच केमिकलयुक्त ब्युटी प्रोडक्टमुळे चेहऱ्याचं नुकसानही होते. बाहेरून आपण जितकी त्वचेची काळजी घेतो, त्याचप्रमाणे शरीराच्या आतून देखील बदल घडणे आवश्यक.

यासाठी नियमित योग्य आहाराचे सेवन करावे. चेहऱ्यावर केमिकल प्रोडक्ट्स लावण्यापेक्षा घरगुती उपाय केव्हाही उत्तम. घरगुती उपाय घरातील साहित्यात झटपट बनतात. यासह चेहऱ्यावर याचा काही दुष्परिणाम देखील होत नाही. आपल्याला घरातील साहित्यात तुकतुकीत काचेसारखी चमकदार त्वचा हवी असल्यास मधाचा वापर करून एक फेसक्रीम तयार करा. हा फेसक्रीम चेहऱ्यावर नक्कीत ग्लो आणेल.

फेसक्रिम बनवण्साठी लागणारं साहित्य

मध

खोबरेल तेल

एलोवेरा जेल

अशी बनवा फेसक्रीम

सर्वप्रथम, एका वाटीत एक टेबलस्पून मध घ्या, त्यात एक टेबलस्पून खोबरेल तेल टाका. त्यानंतर हे मिश्रण चांगले मिक्स करा. मिश्रण मिक्स केल्यानंतर त्यात एक टेबलस्पून एलोवेरा जेल टाका. आणि संपूर्ण मिश्रण चांगले मिक्स करा. आता आपला चेहरा सामान्य पाण्याने धुवून घ्या. चेहरा धुतल्यानंतर टिश्यूने चेहरा स्वच्छ पुसून घ्या. चेहरा स्वच्छ झाल्यानंतर ही तयार क्रीम चेहऱ्यावर लावा.

क्रीम लावल्यानंतर चेहऱ्याला हाताने मसाज करा. मसाज केल्याने चेहऱ्याच्या आतील रक्ताभिसरण सुरळीत होते. हा मसाज ३ - ४ मिनिटे केल्यानंतर २ - ३ मिनिटे वाफेच्या मशीनने स्टीम घ्या. स्टीम घेतल्यामुळे चेहरावरील मृत पेशी निघून जाते. यासह चेहऱ्यावरील छिद्रे साफ होते. ही प्रक्रिया आठवड्यातून एक वेळा करा याने चेहरा काचेसारखा ग्लो करेल.

Web Title: Want skin as smooth as glass? Make face cream from honey, glow in 5 minutes with 3 ingredients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.