मानेवर काळपटपणा आला की, चारचौघात लाजिरवाणे वाटते (Neck Tanning). साबणाने कितीही घासले तरीही हा काळपटपणा निघत नाही. चेहऱ्याबरोबरच मान काळी पडणं खूपच कॉमन आहे (Skin care Tips). चेहऱ्यावरचं टॅनिंग दूर करण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करतो. पण काळवंडलेल्या मानेकडे अनेक जण दुर्लक्ष करतात (Beauty Hacks).
मानेचा काळेपणा घालवण्यासाठी बऱ्याच महिला आधी ब्यूटी पार्लरमध्ये धाव घेतात. पण ब्यूटी पार्लरला जाण्याऐवजी आपण घरातच काही घरगुती उपायांना फॉलो करून, मानेचा काळेपणा घालवू शकता. यासाठी आपण टूथपेस्टचा देखील वापर करू शकता. टूथपेस्टच्या वापरानेही मानेचा काळेपणा निघू शकतो. यासाठी विशेष साहित्यांची गरज नाही. कमी साहित्यात टॅनिंग रिमुव्हल क्रीम तयार होईल(Want To Get Rid Of Dark Neck, Underarms And Elbows? try Toothpaste remedy).
मानेचा काळेपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय
लागणारं साहित्य
टूथपेस्ट
बेकिंग सोडा
केस गळती थांबतच नाही? मग ५ पैकी १ पदार्थ रोज खाऊन पाहा; पातळ केस होतील दाट - टक्कलही गायब
लिंबाचा रस
या पद्धतीने तयार करा टॅनिंग रिमुव्हल क्रीम
मानेचा काळेपणा घालवण्यासाठी आपण घरातच टॅनिंग रिमुव्हल क्रीम तयार करू शकता. यासाठी विशेष साहित्यांची गरज नाही. कमी साहित्यात टॅनिंग रिमुव्हल क्रीम तयार होऊ शकते. शिवाय बाजारातून महागडे क्रीमची गरज नाही.
केस पातळ धाग्यासारखे दिसतात? 'या' रंगाच्या कांद्याच्या रसाचा करा वापर; केस करतील शाईन - होतील दाट
यासाठी एका बाऊलमध्ये एक चमचा टूथपेस्ट घ्या. त्यात एक चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा लिंबाचा रस घालून मिक्स करा. तयार क्रीम मानेवर लावा. लिंबाची साल किंवा ब्रशने मान घासून घ्या. या उपायामुळे काही मिनिटात मानेचा काळेपणा दूर होईल.