Lokmat Sakhi >Beauty > पोट आणि पायावरचे स्ट्रेच मार्क्स कमी करायचेत? ३ तेल आणि ३ उपयोग, स्ट्रेच मार्क होतील गायब

पोट आणि पायावरचे स्ट्रेच मार्क्स कमी करायचेत? ३ तेल आणि ३ उपयोग, स्ट्रेच मार्क होतील गायब

Tips to Reduce Stretch Marks स्ट्रेच मार्क्स दिसतात वाईट, त्यासाठी महागड्या क्रिम्सही असतात, पण त्यापेक्षा सोपे उपाय करुन पाहिले तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2023 07:04 PM2023-01-12T19:04:22+5:302023-01-12T19:05:36+5:30

Tips to Reduce Stretch Marks स्ट्रेच मार्क्स दिसतात वाईट, त्यासाठी महागड्या क्रिम्सही असतात, पण त्यापेक्षा सोपे उपाय करुन पाहिले तर..

Want to reduce stretch marks on stomach and legs? 3 oils and 3 uses, stretch marks will disappear | पोट आणि पायावरचे स्ट्रेच मार्क्स कमी करायचेत? ३ तेल आणि ३ उपयोग, स्ट्रेच मार्क होतील गायब

पोट आणि पायावरचे स्ट्रेच मार्क्स कमी करायचेत? ३ तेल आणि ३ उपयोग, स्ट्रेच मार्क होतील गायब

महिलांसह पुरुषांना देखील स्ट्रेच मार्कच्या समस्येला सामोरे जावे लागते. स्ट्रेच मार्कची ही समस्या अनेक कारणांमुळे उद्भवते. झपाट्याने वजन वाढणे, वाढलेलं वजन कमी होणे, अथवा डिलिव्हरीनंतर देखील शरीराच्या विविध ठिकाणी स्ट्रेच मार्क्स येतात. काही स्ट्रेच मार्क्स विविध उपायांना फॉलो करून निघून जातात. मात्र, काही स्ट्रेच मार्क्सवर कोणतेही उपाय प्रभावी ठरत नाही. स्ट्रेच मार्क शरीरातील विविध ठिकाणी दिसून येतात. जास्त करून मांड्या, पाय, हात, पोटावर दिसून येतात. स्ट्रेच मार्क्स सहसा लवकर जात नाही. त्याला अनेक दिवस जातात. हे स्ट्रेच मार्क्स आपण घरगुती उपायांना फॉलो करून कमी करण्याचा प्रयत्न करू शकता. काही विशिष्ट तेलाचे वापर करून आपण स्ट्रेच मार्कला कमी करू शकता.

स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी 'या' तेलांचे करा वापर

खोबरेल तेल

स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी आपण खोबरेल तेलाचा वापर करू शकता. खोबरेल तेलात फॅटी अॅसिड असते. या तेलातून त्वचेला दाहक-विरोधी गुणधर्म मिळतात, यासह कोलेजन तयार करण्यातही मदत करते. हलक्या हातांनी स्ट्रेच मार्क्सवर खोबरेल तेल लावा. जर त्वचा खूप तेलकट असेल तर काही वेळानंतर तेल लावून पुसून टाका.

ऑलिव्ह ऑईल

व्हिटॅमिन ई ने समृद्ध ऑलिव्ह ऑईल स्ट्रेच मार्क्सवर प्रभावी ठरते. हे तेल रात्रीच्यावेळी स्ट्रेच मार्क्स लावावे. सकाळी धुवून टाकावे. आपण हे तेल सकाळच्या सुमारास देखील लावू शकता. ऑलिव्ह ऑईल स्ट्रेच मार्क्सवर २० ते ३० मिनिटे लावून ठेवा. आणि कोमट पाण्याने धुवून टाका. ही प्रक्रिया दररोज करा.

बदाम तेल

स्ट्रेच मार्क्सवर बदामाचे तेल लावल्याने त्वचेची लवचिकता वाढते, गर्भधारणेदरम्यान हे तेल वापरू नये. गर्भधारणेनंतर या तेलाचा वापर करावा. जर तुमचे स्ट्रेच मार्क्स खूप जुने असतील तर तुम्ही हे तेल वापरावे. लाल दिसणाऱ्या स्ट्रेच मार्क्सवर हे तेल लावणे टाळा.

तेल व्यतिरिक्त 'हे' उपाय करून पाहा

स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी एलोवेरा जेलचा वापर करता येईल. या जेलचा जाड थर स्ट्रेच मार्क्सवर लावा आणि २० मिनिटे ठेवल्यानंतर धुवा.

कोको बटर त्वचेवर चांगला परिणाम करतो. स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी आपण कोको बटरचा वापर करू शकता. त्वचेवर कोको बटर सकाळी आणि संध्याकाळी लावा. यानंतर सामान्य पाण्याने धुवून काढा.

जर स्ट्रेच मार्क्स जुने यासह काळे डाग दिसत असतील तर, त्यावर बटाट्याचा रस लावा. बटाटा किसून त्याचा रस स्ट्रेच मार्क्सवर लावा आणि ३० मिनिटे ठेवून द्या. शेवटी सामान्य पाण्याने धुवून काढा.

Web Title: Want to reduce stretch marks on stomach and legs? 3 oils and 3 uses, stretch marks will disappear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.