आऊटिंग, हॉटेलिंग किंवा पिकनिकसाठी बाहेर पडल्यावर किंवा एखाद्या पार्टीसाठी तयार होताना अनेक जणींना शॉर्ट ड्रेस किंवा मिनी ड्रेस घालण्याची इच्छा असते. पण शॉर्ट ड्रेस कॅरी कसा करावा, हेच अनेक जणींना समजत नाही. त्यामुळे मग कॉन्फिडन्स कमी होतो. म्हणूनच जर थोडी तयारी करून शॉर्ट ड्रेस घातले, तर नक्कीच तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, तुम्ही ते उत्तम प्रकारे कॅरी करू शकाल आणि त्यामुळे आपण जे काही वेगळं, हटके घातलं आहे, याचा तुम्हाला आनंद मिळू शकेल.
शॉर्ट ड्रेस घालण्यापुर्वी कशी घ्यावी काळजी ?
१. व्हॅक्सिंग करायला विसरू नका
जेव्हा केव्हा तुम्ही शॉर्ट ड्रेस घालणार असाल, तेव्हा व्हॅक्सिंग करणं मस्ट आहे. त्यामुळे जर पायाचं व्यवस्थित व्हॅक्सिंग झालं नसेल, तर शॉर्ट ड्रेस मुळीच घालू नका. व्हॅक्स न करता शॉर्ट्स घातले तर पाय खूपच ओंगळवाणे दिसतात आणि त्यामुळे आपला कॉन्फिडन्स जातो. आपले पाय स्वच्छ, छान, व्हॅक्स करून नीटनेटके ठेवलेले आहेत, ही जाणीव देखील आपल्याला वेगळाच आत्मविश्वास देते.
२. शेपवेअर नक्कीच घाला
शॉर्ट ड्रेस घालताना शेपवेअर नक्कीच घातलं पाहिजे. विशेषत: ज्या तब्येतीने थोड्या जाड आहेत, त्यांनी तर नक्कीच याचा वापर केला पाहिजे. शेपवेअर घातले तर तुमच्या शरीरावरची अतिरिक्त चरबी अजिबात दिसून येत नाही. तसेच तुमच्या फिगरचे कर्व्हदेखील चांगल्याप्रकारे दिसून येतात. अनेकदा आपण टाईट ड्रेस घातला तर ब्रा चा आकार लगेचच ड्रेसच्यावरून दिसून येतो. हे टाळायचे असेल, तर शॉर्ट ड्रेसच्या आधी शेपवेअर नक्कीच घालायला हवे. कारण बहुतांश शॉर्ट ड्रेस हे टाईट फिटिंगचेच असतात.
३. न्यूड शेड अंडरगारमेंट्स घाला
शाॅर्ट ड्रेस घालणार असाल तर शक्यतो त्या ड्रेसच्या रंगाशी मॅचिंग असणारे किंवा मग न्यूड शेडचे अंडरगारमेंट्स घालावेत. त्यामुळे तुम्हाला ऑक्वर्ड होणार नाही, आणि तुम्ही आत्मविश्वासाने वावरू शकाल. सीमलेस अंडरगारमेंट्सचा वापर देखील तुम्ही करू शकता. कारण अशा पद्धतीचे अंडर गारमेंट्स घातले तर टाईट कपड्यावरून त्याचे कोणतेही बेल्ट दिसून येत नाहीत. अभिनेत्री देखील शॉर्ट आणि टाईट ड्रेस घातल्यावर सीमलेस अंडरगारमेंट्स किंवा लेजर कट, थाँग्ज, लेस अंडरगारमेंट्स घालत असतात.