Join us  

Hair straightening : केस स्ट्रेट करायचे? वापरा घरातली दूध पावडर, घरच्याघरी स्पा- केस स्टायलिश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2022 4:19 PM

दूध पावडरची हेअर स्पा क्रीम; केस स्ट्रेट आणि स्टायलिश करण्याचा सहज सोपा उपाय

ठळक मुद्देमिल्क हेअर स्पा क्रीम तयार करण्यासाठी दूध पावडर, मध, दही आणि खोबऱ्याचं तेल या सामग्रीची गरज असते. 

स्टायलिश दिसण्यासाठी केवळ स्टायलिश कपडे घालून उपयोगाचं नाही , केसही स्टायलिश दिसायला हवेत. केस स्टायलिश दिसण्यासाठी ते स्ट्रेट आणि सिल्की असणं गरजेचं असतं. आता ही गरज पार्लरमध्ये गेल्याशिवाय पूर्ण कशी होणार? म्हणजे केस स्टायलिश दिसण्यासाठी भरमसाठ पैसे खर्च करणं आलेच . पण घरच्याघरी केस स्ट्रेट आणि स्टायलिश करता येतात. शिवाय ते करताना त्यात कोणत्याही रसायनांचा वापर केला जात नसल्यानं केसांवर त्याचे दुष्परिणामही होत नाही. घरात असलेल्या दूध पावडरचा उपयोग करुन केसांना स्टायलिश लूक देणारी हेअर स्पा क्रीम तयार करता येते.

Image: Google 

दूध पावडरची हेअर स्पा क्रीम 

दूध पावडरपासून हेअर स्पा क्रीम तयार करण्यासाठी अर्धा कप दूध पावडर, 2 मोठे चमचे मध, 1 कप दही, अर्धा कप पाणी आणि 2 चमचे खोबऱ्याचं तेल घ्यावं.  हेअर स्पा क्रीम करताना एका वाटीत दूध पावडर घ्यावी. त्यात थोडं पाणी घालावं. नंतर त्यात मध, दही घालून ते चांगलं एकजीव करुन घ्यावं. या मिश्रणात 2 लहान चमचे खोबऱ्याचं तेल घालावं. खोबऱ्याचं तेल मिश्रणात नीट मिसळून घ्यावं. मिल्क हेअर स्पा क्रीम केसांना लावण्याआधी केस धुवून स्वच्छ करावेत. केस थोडेसे ओलसर असताना हे क्रीम लावावं. हेअर स्पा क्रीम टाळुला आणि केसांना व्यवस्थित लावावं. मिश्रण लावल्यानंतर अर्ध्या तासानं केस पाण्यानं स्वच्छ धुवावेत. 

Image: Google

दूध पावडरच्या हेअर स्पा क्रीमचे फायदे

1. कुरळ्या केसांसाठी दूध उत्तम आहे. दुधापेक्षा दूध पावडर जास्त फायदेशीर मानलं जाते. कारण दूध पावडरमुळे केस खूप मऊ होतात. दूध पावडरमुळे टाळूचं माॅश्चरायझिंग होतं. त्यामुळे डोक्यात कोंडाही होत नाही. मिल्क स्पा क्रीममधील दूध पावडरमुळे केस मऊ मुलायम राहातात.

Image: Google

2. मिल्क स्पा क्रीम करताना दह्याचा वापरही केलेला असतो. दह्यामुळे टाळुची त्वचा मऊ होते  आणि केस मुलायम राहातात. दह्यामुळे केसांचं कंडिशनिंग होतं. दह्यातील ॲण्टिबायोटिक, ॲण्टिफंगल गुणधर्मांमुळे केसांशी निगडित समस्या दूर होतात आणि केस निरोगी आणि सुंदर होतात. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीदूध