Join us  

डोक्यातल्या कोंड्याने वैताग आणला? फक्त २ पदार्थ घेऊन करा 'हा' उपाय, ७ दिवसांत कोंडा कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2024 3:38 PM

Best Home Remedies For Dandruff And Dry Scalp: फक्त ७ दिवसांत डोक्यातला कोंडा कमी होईल- बघा पारस तोमरचा खास नुस्खा, केसही भराभर वाढतील

ठळक मुद्देहा उपाय केल्यानंतर अवघ्या ३ ते ७ दिवसांत तुमच्या डोक्यातला कोंडा बऱ्यापैकी कमी झालेला दिसेल...

डोक्यातला काेंडा कसा कमी करावा, हा प्रश्न अनेकींना पडलेला असतो. डोक्यातली त्वचा कोरडी पडली किंवा स्काल्पची म्हणजेच डोक्याच्या त्वचेची पीएच लेव्हल बिघडली तर अशी समस्या निर्माण होते. बऱ्याचदा आपण कोंडा कमी करण्यासाठी वेगवेगळे शाम्पू लावून पाहातो. पण त्याचा उलटाच परिणाम होतो आणि वेगवेगळे शाम्पू ट्राय करून डोक्याची त्वचा आणखीनच कोरडी पडते आणि कोंड्याचे प्रमाण वाढत जाते. तुम्हीही डोक्यातल्या कोंड्यामुळे हैराण झाला असाल तर ब्यूटी एक्स्पर्ट पारस तोमर (Paras Tomar) यांनी सांगितलेला हा खास उपाय एकदा करून पाहा (how to get rid of dandruff). हा उपाय केल्याने केसांतला कोंडा अगदी आठवडारातच कमी होईल तसेच केसही भराभर वाढण्यास मदत होईल. (best home remedies for dandruff and dry scalp)

 

केसांतला कोंडा कमी करण्यासाठी उपाय

केसांतला कोंडा कमी करण्यासाठी नेमका काय उपाय करावा, याविषयीचा व्हिडिओ ब्यूटी एक्सपर्ट सेलिब्रिटी पारस तोमर यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

हा उपाय केल्यानंतर अवघ्या ३ ते ७ दिवसांत तुमच्या डोक्यातला कोंडा बऱ्यापैकी कमी झालेला दिसेल असं पारस तोमर सांगतात. 

ओपन पोर्समुळे चेहरा खूपच रापलेला दिसतो? ५ सोपे उपाय, ओपन पोर्स जाऊन त्वचा दिसेल तरुण

हा उपाय करण्यासाठी आपल्याला दालचिनी आणि ॲपल साईड व्हिनेगर हे दोन पदार्थ मुख्यत: वापरायचे आहेत. 

सगळ्यात आधी १ ग्लास पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये दालचिनीची पावडर करून टाका. साधारण १ ग्लास पाणी असेल तर त्यात १ चमचा दालचिनीची पावडर आणि २ चमचे ॲपल साईड व्हिनेगर टाका. हे मिश्रण व्यवस्थित हलवून एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा.

 

दररोज रात्री झोपण्यापुर्वी या पाण्याचा स्प्रे तुमच्या डोक्याच्या त्वचेवर म्हणजेच स्काल्पवर मारा. हा उपाय आठवडाभर नियमितपणे करा. यामुळे अवघ्या ७ दिवसांतच तुम्हाला खूप चांगला परिणाम दिसून येईल.

पिंपल्स, टॅनिंग कमी करण्याचा मस्त उपाय, किचनमधला 'हा' पांढरा पदार्थ चेहऱ्यावर चोळा- सौंदर्य बहरेल

ॲपल साईड व्हिनेगरमुळे स्काल्पची पीएच लेव्हल बॅलेन्स होऊन कोंडा कमी होण्यास मदत होईल, तसेच दालचिनीमुळे केसांचे टेक्स्चर चांगले होऊन ते भराभर वाढतील. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी