पन्नाशीच्या उंबरठ्यावर पोहचल्यावरही तिशीतल्या महिलांना लाजवेल असं अभिनेत्री मलायका अरोराचं (Malaika Arora) सौंदर्य. फिटनेस क्वीन म्हणून बॉलीवूडमध्ये तिची ओळख (Fitness). फिटनेससह ती आपल्या त्वचा आणि केसांचीही काळजी घेते (Skin Care Tips). पन्नाशीच्या उंबरठ्यावर पोहचल्यावरही मलायकाची स्किन ही मुलायम आणि ग्लो करते. तिची तुकतुकीत स्किन पाहून, तुमच्याही मनात तिच्या स्किनबद्दल कुतूहल वाटलं असेल.
चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी मलायका एक घरगुती पेय रोज पिते. या पेयामुळे चेहऱ्याला नवी चमक मिळते. जर चेहऱ्यावर फेसपॅक किंवा ब्यूटी उत्पादनांचा वापर करूनही तेज येत नसेल तर, मलायका पिते ते ड्रिंक नियमित प्या. यामुळे नक्कीच त्वचेवर इन्स्टंट ग्लो येईल. यासह रक्त शुद्ध होते. ज्यामुळे रक्ताभिसरणात अडचण येत नाही(Watch Malaika Arora share special Amla juice recipe to boost your immunity and Clear skin).
मलायकाच्या ग्लोइंग स्किनचे रहस्य
लागणारं साहित्य
आवळा
हळदी
दिवाळीत खोपा घाला किंवा फ्रेंच रोल, हेअरस्टाइल पारंपरिक असो मॉर्डन, तुमच्याकडे हवेच हे ५ Hair Brooch
आलं
काळी मिरी
पाणी
ऍपल सायडर व्हिनेगर
अशा प्रकारे करा ग्लोइंग स्किन ड्रिंक
ग्लोइंग स्किन ड्रिंक बनवणं खूप सोपं आहे. यासाठी आधी मिक्सरचं भांडं घ्या. त्यात आवळा, हळद, आलं, काळी मिरी, ऍपल सायडर व्हिनेगर आणि पाणी घालून मिक्स करा. ग्लासवर चहाची गाळणी ठेवा. त्यात ज्यूस ओतून ड्रिंक गाळून घ्या. अशा प्रकारे मलायका स्पेशल ग्लोइंग स्किन ड्रिंक पिण्यासाठी रेडी.
ग्लोइंग स्किन ड्रिंक पिण्याचे फायदे
- या पेयामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते. यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग कमी होण्यास मदत होते. तसेच त्वचेची गुणवत्ता सुधारून त्वचा मऊ आणि चमकदार दिसते.
- त्वचेवर आलेल्या बारीक रेषा, सुरकुत्या घालवण्यासाठी नियमित हे पेय प्या. सूर्याच्या प्रकाशामुळे त्वचेचे होणारे नुकसान टाळण्यासाठी हे पेय मदत करते.
त्वचेसाठी आवळ्याचे फायदे
आवळ्यातील व्हिटॅमिन सी आणि ई त्वचेसाठी फायदेशीर ठरते. यामुळे त्वचा टवटवीत होते. यासह अकाली वृद्धत्व टाळण्यास मदत होते. जर त्वचा तुकतुकीत हवी असेल तर, आवळ्याचा आहारात समावेश करा.