Lokmat Sakhi >Beauty > कमी वयात चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या? दिवसभरात २ गोष्टी करा; पन्नाशीतही तरूण-फिट दिसाल

कमी वयात चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या? दिवसभरात २ गोष्टी करा; पन्नाशीतही तरूण-फिट दिसाल

Ways to reduce premature skin aging : ताण-तणाव, कमी झोप आणि खाण्यापिण्याच्या वेळा चुकवणं यामुळे चेहऱ्यावर कमी वयातच सुरकुत्या दिसून येतात. अशा स्थितीत काहीजण मेकअप करून चेहऱ्यावरील खुणा लपवतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 01:16 PM2023-07-21T13:16:51+5:302023-07-21T17:05:21+5:30

Ways to reduce premature skin aging : ताण-तणाव, कमी झोप आणि खाण्यापिण्याच्या वेळा चुकवणं यामुळे चेहऱ्यावर कमी वयातच सुरकुत्या दिसून येतात. अशा स्थितीत काहीजण मेकअप करून चेहऱ्यावरील खुणा लपवतात.

Ways to reduce premature skin aging : The 2 Best Anti-aging Tips of All Time | कमी वयात चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या? दिवसभरात २ गोष्टी करा; पन्नाशीतही तरूण-फिट दिसाल

कमी वयात चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या? दिवसभरात २ गोष्टी करा; पन्नाशीतही तरूण-फिट दिसाल

आपण तरूण, ग्लोईंग दिसावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. पण सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये पंचवीशीनंतरच चेहऱ्यावर फाईन लाईन्स, सुरकुत्या दिसतात. (Skin Care Tips)अभिनेत्रींप्रमाणे नितळ त्वचा मिळवण्याासाठी आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये आणि आहारात बदल करणं गरजेचं आहे. धावपळीत असल्यानं महिला स्वत:ची काळजी घेत नाहीत. ताण-तणाव, कमी झोप आणि खाण्यापिण्याच्या वेळा चुकवणं यामुळे चेहऱ्यावर कमी वयातच सुरकुत्या दिसून येतात. अशा स्थितीत  काहीजण मेकअप करून चेहऱ्यावरील खुणा लपवतात. (Anti-Aging Tips)

झोपण्याची आणि उठण्याची वेळ फिक्स ठेवा

झोप मेंदूचे कार्य सुरळीत होण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. यामुळे पचनतंत्र व्यवस्थित राहते. शरीराचं वजन संतुलित राहते आणि रोगप्रतिकारकशक्तीसुद्धा वाढते. पण धावपळीत झोपेचं रुटीन बिघडतं आणि झोप पूर्ण होत नाही याचा त्वचेवर वाईट परिणाम होतो. रोज रात्री झोपण्याची आणि सकाळी उठण्याची वेगळी वेळ असेल तर ते तुमचे आरोग्य बिघडू शकते. निरोगी राहण्यासाठी केवळ पुरेशी झोप घेणे आवश्यक नाही, तर झोपणे आणि वेळेवर जागे होणे देखील आवश्यक आहे.

तरूण दिसण्यासाठी काय खावे?

आजकाल वेळेच्या अभावामुळे लोक घरी जेवण बनवणं टाळून बाहेरचं जास्त खातात, वेळेवर जेवत नाहीत. याशिवाय हेल्दी डाएट न घेता तळलेले, मैद्याचे पदार्थ खातात. या पोटावर आणि त्वचेवर नकारात्मक परिणाम होतो. याचा परिणाम पचनअग्निवरही होतो. यामुळे असंतुलन होते आणि पोटाचे आरोग्य बिघडते.  मेटाबॉलिझ्म वाढविण्यासाठी आणि सक्रिय राहण्यासाठी, दररोज एकाच वेळी खाणे आवश्यक आहे. यामुळे रात्री उशिरापर्यंत जागणे आणि कधीही खाल्ल्याने होणारे अनेक आजार दीर्घकाळात टाळता येतात.

१) आहारात व्हिटॅमिन-ई आणि व्हिटॅमिन-सी असलेल्या पदार्थांचा समावेश करा. हे त्वचेचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते. भरपूर ताजी फळे आणि भाज्या खा. ज्यामुळे तुमची त्वचा निरोगी राहते.

२) सूर्यापासून त्वचेचे संरक्षण करणे खूप महत्वाचे आहे. यासाठी उन्हात बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन वापरा.

३) रात्री झोपण्याआधी मेकअप काढा आणि रोज रात्री झोपा. ज्यामुळे तुमची त्वचा स्वच्छ राहील आणि तुम्ही त्वचेशी संबंधित समस्या टाळू शकाल.

४) त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी मॉइश्चरायझरचा नियमित वापर करा. ज्याच्या मदतीने तुम्ही कोरड्या त्वचेची समस्या टाळू शकता.

५) शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात. अशा परिस्थितीत शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी दररोज पुरेसे पाणी प्या. त्यामुळे त्वचेची चमक कायम राहते

Web Title: Ways to reduce premature skin aging : The 2 Best Anti-aging Tips of All Time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.