त्वचेची काळजी आपण सर्वच घेतो. पण धावपळीच्या जीवनात काही वेळेला दुर्लक्षही होतं. प्रत्येकाची स्किन ही वेगळी असते. स्किननुसार प्रॉडक्ट्स वापरणे गरजेचं आहे. चुकीचे प्रॉडक्ट्स वापरल्यास स्किन खराब होण्याची शक्यता वाढते. काही लोकं महागड्या प्रॉडक्ट्स वापरण्यास प्राधान्य देतात तर, काही घरगुती उपायांनी त्वचेची काळजी घेतात.
त्वचेसाठी आपण मधाचा देखील वापर करू शकता. मधामध्ये कॉपर, आयर्न (लोह), फॉस्फोरस, मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअम सारखी तत्वे असतात. जे त्वचेतील अतिरिक्त घाण काढून टाकते, ज्यामुळे चेहऱ्यावर तजेलदार ग्लो येतो(Ways to Use Honey on Your Skin for Natural Glow).
स्किन ठेवते ऑइल फ्री
ऑइली स्किनवर सहसा अधिक प्रमाणावर पुरळ व डागांची समस्या निर्माण होते. धूळ व प्रदूषणामुळे स्किन आणखी डल दिसू लागते. यावर उपाय म्हणून आपण मधाचा वापर करू शकता.
कांद्याची टरफलं कचरा म्हणून फेकू नका, ५ मिनिटांत करा झटपट हेअर डाय! केस काळेभोर होतील
ऑइली स्किनवर मधाचा करा असा वापर
एका वाटीत अर्धा चमचा लिंबाचा रस, व १ चमचा मध घेऊन मिसळा.
आता फेस वॉशच्या मदतीने चेहरा स्वच्छ करा.
मधाची तयार पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा.
काही वेळानंतर त्वचा स्वच्छ करा आणि टॉवेलच्या मदतीने पुसून टाका.
त्वचा कोरडी होणार नाही
कोरड्या त्वचेसाठी आपण हनी मास्कचा वापर करू शकता. मधामध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात, जे त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यास मदत करतात, म्हणूनच कोणत्याही क्रीमऐवजी आपण स्किन केअर रुटीनमध्ये मधाचा समावेश करू शकता.
कोरड्या त्वचेसाठी मधाचा करा फेसमास्क
एका वाटीत १ पिकलेलं केळ घ्या, त्याला मॅश करून त्यात १ चमचा मध आणि १ चमचा लिंबाचा रस घाला.
साहित्य मिसळल्यानंतर ही तयार पेस्ट चेहऱ्यावर लावा.
पेस्ट चेहऱ्यावर लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
१५ मिनिटानंतर चेहरा पाण्याने धुवून घ्या.
आपण या पेस्टचा वापर महिन्यातून ३ वेळा करू शकता.
स्किनवर ग्लो आणण्यासाठी उपयुक्त
स्किनवर ग्लो आणण्यासाठी आपण मधाचा वापर करू शकता. चेहऱ्यावर मधाचा वापर केल्याने त्वचा एक्सफोलिएट होते, मधाचा स्क्रब बनवणे खूप सोपे आहे.
कानाचे छिद्र मोठे झाले, कान ओघळलेत? १ उपाय - कानातले लोंबणार नाहीत..
ग्लोइंग स्किनसाठी मधाचा करा असा वापर
एका वाटीत १ चमचा मध, २ चमचे बेसन, साखर आणि पाणी मिसळून पेस्ट तयार करा.
हे तयार स्क्रब चेहऱ्यावर लावा.
स्किनवर हाताने मसाज करा, व १५ मिनिटानंतर चेहरा पाण्याने धुवा.
या स्क्रबमुळे ब्लॅकहेड्स व चेहऱ्यावरील इतर समस्या दूर होतात.