आठवड्यातून एकदा आपल्यालाही थोडं रिलॅक्स व्हायला हवं असतं. त्याच त्याच रुटीनमधून थोडा चेंज हवा असतो. तसंच काहीसं आपल्या त्वचेलाही (home remedies for flawless skin) पाहिजे असतं. त्वचा नेहमीच यंग आणि ब्युटीफुल (solution for young and beautiful skin) रहावी, चेहरा आठवडाभर टवटवीत आणि तजेलदार रहावा, असं वाटत असेल तर आठवड्यातून एकदा त्वचेला अशा पद्धतीन पॅम्परिंग (skin pampering) करणं गरजेचं आहे. आठवड्यातून एकदा त्वचेची अशी काळजी घेतली तर नक्कीच त्वचा नितळ, मुलायम आणि फ्लॉलेस होईल.
हे एक पद्धतीचे नॅचरल क्लिनअप (natural clean up) आहे. हा उपाय अतिशय सोपा आहे, त्यामुळे तो घरच्याघरी करता येतो. फक्त हा उपाय करण्यासाठी आपल्याकडे २० ते २५ मिनिटांचा वेळ हवा. आठवड्यातून एकदा सुटीच्या दिवशी आपल्या त्वचेसाठी वेळ काढायला आपल्याला निश्चितच जमू शकतं. त्यामुळे सुटीच्या दिवशी हा उपाय करून बघा.. त्वचाही खुश आणि त्वचा छान चमकतेय म्हणून आठवडाभर आपणही खुश..
image credit- google
कसं करायचं घरच्याघरी नॅचरल क्लिनअप...
१. सगळ्यात आधी तर चेहरा स्वच्छ करायला हवा. यासाठी एका बाऊलमध्ये दिड ते दोन टेबल स्पून कच्चं दूध घ्या. यामध्ये कापूस किंवा एखादा सुती कपडा बुडवा आणि त्याने चेहरा व्यवस्थित पुसून घ्या. कच्च्या दुधात त्वचेसाठी पोषक असणारे फॅट्स असल्याने त्वचेला मऊपणा देण्यासाठी त्याचा चांगलाच उपयोग होतो. एक ते दिड मिनिट चेहऱ्याला मसाज केल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका आणि स्वच्छ कोरडा करा.
२. यानंतर आता दुसरी स्टेप. या स्टेपमध्ये तुम्हाला तुमच्या त्वचेचे स्क्रबिंग करायचे आहे. यासाठी एका बाऊलमध्ये अर्धा टीस्पून कॉफी घ्या. एक ते दिड टी स्पून तांदळाचे पीठ घ्या. त्यामध्ये मध टाका आणि त्याची थोडी घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला लावा आणि हलक्या हाताने ३ ते ४ मिनिट चेहऱ्याला मसाज करा. नैसर्गिक घटक वापरून केलेले हे स्क्रब त्वचा स्वच्छ करण्यास उपयुक्त ठरते. आता यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून टाका.
३. तिसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला चेहऱ्याला फेसपॅक लावायचा आहे. फेसपॅक लावल्याने त्वचा टाईट होण्यास मदत होते. यासाठी एका बाऊलमध्ये २ टेबलस्पून बेसन पीठ घ्या. त्यामध्ये १ टीस्पून हळद टाका. दही टाकून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला लावा. ५ ते ६ मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. हा उपाय केल्यानंतर चेहऱ्याला मॉईश्चरायझर लावा. आठवड्यातून एकदा नियमितपणे हा उपाय केल्यास पार्लरमध्ये जाऊन क्लिनअप, फेशिअल करण्याची गरजच नाही.
video credit- beautyhealth_fc instagram page