Join us  

वेटलॉस करायचाय? ब्रेकफास्ट करताना ४ गोष्टी लक्षात ठेवा, वजन वाढण्याची चिंता विसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2022 8:23 AM

How To Do Breakfast For Weight Control: वेटलॉससाठी प्रयत्न करत असाल, तर सकाळच्या नाश्त्यासंबंधी असणाऱ्या या काही गोष्टी लक्षात ठेवा. कदाचित याच काही गोष्टी तुमचं वजन वाढण्यासाठी जबाबदार असू शकतात.

ठळक मुद्देहाय कॅलरी, हाय प्रोटीन अन्न घेतल्याने पुढे अनेक तास शरीरात उर्जा टिकून राहण्यास मदत होते. वारंवार भूक लागत नाही. 

वेटलॉस करणाऱ्यांना प्रत्येकवेळी प्रत्येक घास खाताना, त्यातून पोटात जाणाऱ्या कॅलरी आणि वाढणारं वजन एवढंच दिसत असतं. काही जण तर वजन कमी करण्यासाठी व्यायाम सोडून डाएटवरच अधिक भर देतात. काही जण आहार एकदम कमी करून टाकतात आणि मग त्या नादात सकाळचा नाश्ता करणं सोडून देतात. काही याच्या अगदी उलट करतात. खूप हेवी नाश्ता (perfect breakfast for Weight Control) करतात आणि मग दिवसभर फक्त ज्यूस आणि फळं खातात. असं काहीही करत असाल, तर त्यापुर्वी या काही टिप्स नक्की वाचा.

 

नाश्ता करताना या गोष्टी लक्षात ठेवा१. जास्त कॅलरी आणि प्रोटीन्स घ्यानाश्त्यामध्ये नेहमीच जास्त कॅलरी असणारा आहार घ्यावा. कारण दिवसाच्या सुरुवातीला अन्न पचविण्याची आपल्या शरीराची ताकद रात्रीपेक्षा दुप्पट असते. हाय कॅलरी, हाय प्रोटीन अन्न घेतल्याने पुढे अनेक तास शरीरात उर्जा टिकून राहण्यास मदत होते. वारंवार भूक लागत नाही. 

 

२. फॅट्स आणि फायबरसकाळच्या नाश्त्यातून शरीरासाठी पोषक असणारे फॅट्स पोटात जातील, याची काळजी घ्या. पण फॅट्स आणि कॅलरी यांचं गणित मात्र सांभाळा.

अंकिता कोंवर करतेय अप्रतिम मेरुदंडासन! वेटलॉस तर होईलच, वाचा ५ जबरदस्त फायदे 

त्याचबरोबर फायबरयुक्त आहारही नाश्त्यातून मिळणे गरजेचे आहे. यामुळे पचन आणि चयापचय क्रिया अधिक चांगल्या होतात.

 

३. नाश्ता करणं टाळू नकाअनेक जण वजन वाढू नये म्हणून नाश्ता करणं टाळतात आणि थेट दुपारी जेवण करतात. पण यामुळे मग खूप भूक लागून दुपारच्या जेवणात गरजेपेक्षा जास्त खाल्ले जाते. शिवाय एवढा वेळ उपाशी राहिल्याने ॲसिडीटी, चिडचिड, डोकेदुखी, हार्मोन्सचे असंतुलन असा त्रासही उद्भवतो.

दिवाळीत बहिणीला काय गिफ्ट द्यायचं? ८ पर्याय, प्रेमाचं सुंदर गिफ्ट, बहिण होईल खुश

४. शिळे पदार्थ टाळारात्री उरलेले अन्न गरम करून तेच नाश्त्यामध्ये घेत असाल, तर नक्कीच वजन वाढीचा त्रास होऊ शकतो. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सअन्न