मेकअप केल्यामुळे आपला चेहरा अधिक आकर्षक दिसतो. अनेकींना स्वतःचा मेकअप स्वतःच करायला आवडतं. शिवाय आजकाल मेकअप करणं ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. सणसमारंभासाठीच नव्हे तर रोजचे ऑफिस किंवा कॉलेजमध्ये जाताना देखील स्त्रिया आणि मुली मेकअप करणं पसंत करतात. मात्र मेकअप करणं ही एक कला आहे हे देखील तितकंच खरं आहे. कारण जर मेकअपमध्ये छोटीशी जरी चुक झाली तर त्याचा थेट परिणाम तुमच्या लुकवर पडतो. यासाठी मेकअपचं साहित्य आणि ते कसं वापरावं हे आपल्याला माहित असायलाच हवं. मेकअप करण्यासाठी बऱ्याचदा मेकअप ब्लेंडरचा वापर केला जातो. मेकअप ब्लेंडर सोबतच आपण मेकअप करताना इतरही मेकअप टूल्सचा अवश्य वापर करतो.
आजच्या काळात ब्युटी ब्लेंडर हा प्रत्येकाच्या मेकअप किटचा भाग बनला आहे. आतापर्यंत मेकअप करण्यासाठी फक्त हातांच्या बोटांचा आणि ब्रशचा वापर केला जात होता. परंतु आता ब्युटी ब्लेंडर खूप लोकप्रिय होत आहेत. ब्युटी ब्लेंडर बाजारात विविध आकारात सहज उपलब्ध होत असल्याने, याच्या मदतीने चेहऱ्यावर आणि मानेच्या भागावर सहज मेकअप लावू शकता. ब्युटी ब्लेंडर वापरण्यापूर्वी ते पूर्णपणे स्वच्छ करण्याचा सल्ला दिला जातो, परंतु हा ब्युटी ब्लेंडर स्पंज वापरण्याआधी फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवला आणि नंतर त्याने चेहऱ्यावर मेकअप लावला तर त्याचे अनेक फायदे मिळतात(What Are The Benefits Of Freezing Your Beauty Blender?).
ब्युटी ब्लेंडर स्पंज फ्रिजमध्ये ठेवण्याचे फायदे :-
१. स्किन पोर्स टायटनिंग करण्यास मदत होते :- ब्युटी ब्लेंडर वापरण्याआधी फ्रिजमध्ये ठेवल्याने स्किन पोर्स टायटनिंग करण्यास मदत होते. जेव्हा आपण ब्युटी ब्लेंडर वापरण्याआधी फ्रिजमध्ये ठेवतो, तेव्हा त्याच्या थंड तापमानामुळे स्किन पोर्स टायटनिंग होण्यास मदत होते. अशा ब्युटी ब्लेंडरने मेकअप केल्यास मेकअप चेहऱ्यावर छान सेट होतो. स्किन पोर्स टाईट झाल्यामुळे, त्वचेमध्ये तेलाचे उत्पादन देखील कमी होते आणि आपल्या त्वचेवर असलेल्या बारीक रेषा आणि सुरकुत्या देखील कमी दिसतात.
२. मेकअप ब्लेंड करण्यास सोपे जाते :- आपल्या मेकअपला एक स्मूद, गुळगुळीत लूक येणे गरजेचे असते. यासाठी मेकअप चांगल्या प्रकारे ब्लेंड होणे गरजेचे असते. मेकअप ब्लेंड होण्यासाठी ब्युटी ब्लेंडर फ्रिजमध्ये ठेवणे गरजेचे असते. जेव्हा आपण ब्युटी ब्लेंडर फ्रिजमधून बाहेर काढता तेव्हा ते थोडे ओलसर असते ज्यामुळे मेकअप प्रॉडक्ट्स ब्लेंड करण्यात मदत होते.
ब्युटी ब्लेंडरमधला स्पंज साफ करणं म्हणजे डोक्याला ताप? पाहा ३ सोप्या पद्धती, सफाई होईल चटकन..
३. मेकअप दीर्घकाळ टिकण्यास मदत मिळते :- मेकअप केल्यानंतर, तो दीर्घकाळ चेहेऱ्यावर तसाच टिकवून ठेवणे हे निश्चितच कठीण काम असते . पण जेव्हा तुम्ही ब्युटी ब्लेंडर फ्रिजमध्ये ठेवून नंतर त्यासोबत मेकअप करता तेव्हा ते तुमचा मेकअप दीर्घकाळ टिकतो. कारण थंड ब्युटी ब्लेंडर स्किन पोर्सना टाईट करते आणि त्वचेमधून तेल लवकर चेहऱ्यावर येत नाही. यामुळे, मेकअप बराच काळ टिकतो. तसेच अशा प्रकारे ब्युटी ब्लेंडर वापरल्याने चेहऱ्यावर चमक येते.
फेशियल नेमके किती दिवसांनी करायला हवे? महिन्यातून एकदा केले तर त्वचेला खरंच फायदा होतो?
४. मेकअप करण्यासाठीचा वेळ वाचतो :- मेकअप करताना आपला बराचसा वेळ जातो. सहसा, मेकअप करताना, आपण प्रथम चेहऱ्यावर बर्फ लावतो आणि नंतर कंसीलर किंवा फाउंडेशन मिसळण्यासाठी स्पंज ओला करतो. पण जर तुम्ही ब्युटी ब्लेंडर थोडावेळ फ्रिजमध्ये ठेवले तर तुमचा वेळ नक्कीच वाचेल. खरं तर, कोल्ड ब्युटी ब्लेंडर वापरल्याने तुम्हाला बर्फ वापरण्याची गरज भासत नाही आणि मेकअप करण्यास वेळही कमी लागतो. पण नेहमी लक्षात ठेवा की ब्युटी ब्लेंडर वापरल्यानंतर ते व्यवस्थित स्वच्छ करून मगच फ्रिजरमध्ये ठेवा.