त्वचेवरील डेड स्किन काढून टाकण्यासाठी स्क्रबिंग खूप महत्वाचे असते. आपल्या स्किनमध्ये साचलेली घाण काढून टाकण्यासाठी स्क्रबिंगचा खूपच फायदा होतो. धूळ, माती, प्रदूषण यांमुळे चेहऱ्यावर डेड स्किन जमा होऊ लागते. अशा परिस्थितीत, स्किन स्वच्छ करण्यासाठी वेळोवेळी आपण स्किनला स्क्रबिंग करतो. बहुतेकजणी स्किनला स्क्रबिंग करण्यासाठी घरगुती उपायांपैकी एक म्हणून साखरेचा वापर करतात. पण साखरेचे हे स्क्रब तुमच्या संवेदनशील त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. शुगर स्क्रब चेहऱ्याच्या त्वचेला नुकसान पोहचवू शकते. साखरेला वेगवेगळ्या प्रकारच्या तेलांत किंवा फळांच्या रसात मिक्स करून साखरेचे स्क्रब बनवले जाते(What are the side effects of Sugar Scrub).
घरच्या घरी बनवलेला शुगर स्क्रब वापरल्याने आपल्या नाजूक स्किनचे नुकसान होऊ शकते. काहीवेळा आपल्याला पार्लरला जायला वेळच नसतो किंवा घरच्याघरी घरगुती पदार्थांचा वापर करून शुगर स्क्रब बनवले जाते. हे स्क्रब घरगुती आहे म्हणून आपण त्याचा वापर अगदी बिनधास्तपणे करतो, परंतु या साखरेने स्क्रबिंग केल्याने आपल्या स्किनचे नुकसान होऊ शकते. शुगर स्क्रबिंग केल्याने नेमके काय होते ते पाहूयात(Why Sugar Scrubs Are Bad for Your Facial Skin).
शुगर स्क्रबिंग केल्याने नेमके काय होते ?
१. त्वचा सोलवटून निघणे :- चेहऱ्याच्या नाजूक त्वचेसाठी शुगर स्क्रबमधील साखरेचे ग्रॅन्युल्स अनेकदा खूप मोठे असतात. जरी ते डेड स्किनच्या पेशी साफ करू शकत असले तरी, ते जास्त प्रमाणात घासल्याने त्वचा सोलण्याची शक्यता अधिक असते. यामुळे त्वचेची जळजळ होऊन, त्वचा सोलवटून निघण्याची शक्यता अधिक असते.
२. त्वचेची सूज आणि लालसरपणा :- चेहऱ्याची त्वचा शरीराच्या इतर भागांच्या त्वचेपेक्षा पातळ आणि अधिक संवेदनशील असते. साखरेच्या दाण्यांच्या खडबडीत रचनेमुळे चेहऱ्यावर सूज आणि लालसरपणा येऊ शकतो. सेन्सेटिव्ह स्किन असणाऱ्यांनी शुगर स्क्रब वापरणे कायमचे टाळावे. तर, काहीजणी खूपच हार्ड स्क्रबिंग करतात अशांना, कठोर स्क्रबिंगच्या वापराने रोसेसिया किंवा एक्जिमा होऊ शकतो.
डेड स्किनमुळे चेहरा डल दिसतो? हा घ्या डेड स्किन रिमुव्हल मास्क, पार्लरला जाण्याचीही गरज नाही...
३. त्वचेची आर्द्रता कमी करू शकते :- साखरेचे स्क्रब स्ट्रॅटम कॉर्नियम नावाच्या त्वचेच्या संरक्षणात्मक थराला हानी पोहोचवू शकतात. हा थर त्वचेला बाह्य उत्तेजक घटकांपासून संरक्षण करण्यास आणि ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतो. स्क्रबिंग दरम्यान हा थर खराब होऊ शकतो. त्यामुळे त्वचा कोरडी पडणे, त्वचारोग आणि इतर आजार होण्याची शक्यता वाढते.
४. संसर्ग होण्याची शक्यता :- शुगर स्क्रबमुळे होणारे मायक्रोटेअर्स बॅक्टेरिया आणि इतर जीवाणू त्वचेत प्रवेश करू शकतात, ज्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. मुरुमांचा त्रास असलेल्या लोकांसाठी हे त्रासाचे कारण बनू शकते. याव्यतिरिक्त, यामुळे मुरुमांसोबत जळजळ होऊ शकते.
म्हणायला कडू पण मेथ्या म्हणजे आरोग्यासाठी वरदान, ४ सोप्या पद्धतीने वापरा- केसांसाठी तर अतीगुणकार...
मग नेमके कशाने स्क्रबिंग करावे ?
घरच्या घरी स्क्रबिंग करताना आपण साखरेऐवजी वेगवेगळ्या प्रतीची तेलं किंवा फळांच्या रसाचा वापर करू शकता. पपई आणि अननस यांसारख्या फळांपासून मिळणारे एन्झाइम एक्सफोलिएंट्स डेड स्किन हळूवारपणे काढून टाकतात. त्यामुळे आपण यांसारख्या फळांच्या रसाचा वापर करू शकता.