Join us

कितीही शाम्पू लावा, तेल चोपडा केस गळतातच? ‘ही’ आहेत केस गळण्याची ५ खरीखुरी कारणं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2025 13:52 IST

What are the top 5 reasons for hair loss : Top 5 Reasons Why Hair Loss Happens : hair fall causes top 5 reasons behind : काही केल्या केसगळती थांबत नसेल तर या खास ५ कारणांकडे लक्ष देणे गरजेचे आहे...

केसांशी संबंधित अनेक समस्यांपैकी 'केसगळती' ही फारच कॉमन आणि खूप मोठी समस्या आहे. केसगळती होऊ नये यासाठी आपण सगळेच अनेक प्रकारचे उपाय करुन पाहतो. वेगवेगळ्या (What are the top 5 reasons for hair loss) प्रकारची तेलं, शाम्पू, कंडिशनर, हेअर मास्क असे सगळेच उपाय काहीवेळा करुनही (Top 5 Reasons Why Hair Loss Happens) काहीच उपयोग होत नाही. नेहमीच केसांची योग्य ती काळजी घेऊन देखील केसगळती कायम होत राहते. या केसगळतीच्या समस्येकडे वेळीच योग्य पद्धतीने लक्ष दिले नाही तर केसांचे नुकसान होऊ शकते(hair fall causes top 5 reasons behind).

काहीवेळा केस इतके गळतात की केसांचे पुंजकेच्या पुंजके हातात येऊ लागतात. थोड्या प्रमाणात केस गळत असतील तर ठीक, पण जर केस गळून गळून विरळ झाले असतील किंवा छोटे झाले असतील तर ही खरंच चिंतेची बाब आहे. अशात ही समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळी औषधं, केमिकल्स उपलब्ध आहेत. पण यांचा वापर करूनही काहीवेळा केसगळती थांबत नाही अशा परिस्थितीत, केसगळती नेमकी कशामुळे होते याची मुख्य कारणं शोधणं गरजेचे असते. केसगळती (Hair Fall) थांबवण्यासाठी जर तुम्ही अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करून पाहिले असतील आणि तरी देखील तुमची केसगळती थांबत नसेल तर या खास ५ कारणांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 

काही केल्या केसगळती थांबतच नाही कारणं... 

१. अनहेल्दी डाएट आणि पोषणमूल्यांची कमतरता :- केसांचे आरोग्य हे थेट तुमच्या आहाराशी संबंधित असते. जर तुमच्या आहारात प्रथिने, लोह, जस्त, व्हिटॅमिन 'डी' आणि ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड सारख्या पोषक तत्वांचा अभाव असेल तर केसगळती थांबवणे कठीण होते. केसांसाठी आवश्यक पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे केस कमकुवत होतात आणि त्यांचे गळणे वाढते. जेव्हा शरीराला आतून पोषण मिळते तेव्हाच घरगुती उपचार आणि इतर प्रॉडक्ट्स काम करतात. 

पांढऱ्या केसांना डाय लावायची भीती वाटते? बिटाचा रस 'या' पद्धतीने लावा - केसांना मिळेल सुंदर रंग...

२. ताण आणि मानसिक आरोग्य :- केसगळतीचे एक प्रमुख कारण म्हणजे ताणतणाव. जेव्हा तुम्ही तणावात असता तेव्हा शरीरात कोर्टिसोल हार्मोनची पातळी वाढते, ज्यामुळे केसांच्या वाढीच्या चक्रावर त्याचा परिणाम होतो. यामुळे केसगळती वाढू शकते. ताणतणावामुळे होणारी केसगळती रोखण्यासाठी केवळ बाह्य उपचार पुरेसे नाहीत तर मानसिक आरोग्याची तितकीच काळजी घेणे देखील गरजेचे असते. मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आणि ताण कमी करण्यासाठी योग, ध्यान आणि पुरेशी झोप आवश्यक आहे. 

३. हार्मोनल असंतुलन :- केस गळतीचे एक प्रमुख कारण हार्मोनल असंतुलन देखील आहे. थायरॉईड, पीसीओएस (पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम) किंवा रजोनिवृत्ती दरम्यान शरीरात होणारे हार्मोनल बदल केस गळण्यास कारणीभूत ठरू शकतात. अशा परिस्थितीत, घरगुती उपचार आणि फक्त केसांची काळजी घेणारी उत्पादने काम करत नाहीत. अशा परिस्थितीत, डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि हार्मोनल समस्येवर उपचार करणे महत्वाचे असते. 

४. केसांची काळजी घेण्यासाठी चुकीच्या हेअर प्रॉडक्ट्सचा वापर करणे :- बाजारांत उपलब्ध असलेल्या अनेक प्रकारच्या हेअर प्रॉडक्ट्समध्ये जास्त प्रमाणात केमिकल्स असतात, जी केसांना हानी पोहोचवू शकतात. सल्फेट्स, पॅराबेन्स आणि सिलिकॉन सारखी रसायने केसांना कमकुवत करतात आणि केसगळती वाढवतात. याशिवाय, चुकीचे शॅम्पू, कंडिशनर किंवा हेअर स्टायलिंग प्रॉडक्ट्स वापरणे देखील केसांसाठी हानिकारक ठरू शकते. तुमच्या केसांच्या प्रकारानुसार योग्य आणि केसांना सूट होणारे हेअर प्रॉडक्ट्स निवडणे महत्वाचे असते. 

सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरी फसली, भयानकच दिसतोय चेहरा-१० बॉलिवूड अभिनेत्रींची भलतीच गोष्ट...

५. दीर्घकालीन आजार किंवा इतर आरोग्य समस्या :- कधीकधी केस गळणे हे एखाद्या आरोग्य समस्येचे लक्षण देखील असू शकते. मधुमेह, ऑटोइम्यून डिसऑर्डर किंवा स्कॅल्प इन्फेक्शन यासारख्या समस्यांमुळे केस गळती वाढू शकते. अशा परिस्थितीत केवळ बाह्य उपचार काम करत नाहीत. जर केस गळत राहिले तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि या समस्येवर उपचार करणे महत्वाचे आहे.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी