Lokmat Sakhi >Beauty > Do It Yourself :घरबसल्या भन्नाट जुगाड-जुमला, फॅशन आणि ब्यूटीच्या जगातला नवा ट्रेण्ड

Do It Yourself :घरबसल्या भन्नाट जुगाड-जुमला, फॅशन आणि ब्यूटीच्या जगातला नवा ट्रेण्ड

डू इट युवरसेल्फ हा नुसता ट्रेण्डच नाही तर कल्पकतेचा आविष्कार झाला आहे. महिलांचे टॉप्स, कुर्तीज, पॅण्ट्स, पुरुषांचे पायजमे, शर्ट्स यांच्या हजारो नवीनवीन डिझाईन्स या फॅशन ट्रेण्डमधून साकारलेल्या दिसताहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 05:25 PM2021-03-29T17:25:38+5:302021-03-30T12:53:02+5:30

डू इट युवरसेल्फ हा नुसता ट्रेण्डच नाही तर कल्पकतेचा आविष्कार झाला आहे. महिलांचे टॉप्स, कुर्तीज, पॅण्ट्स, पुरुषांचे पायजमे, शर्ट्स यांच्या हजारो नवीनवीन डिझाईन्स या फॅशन ट्रेण्डमधून साकारलेल्या दिसताहेत.

What is the 'Do It Yourself' trend in fashion and beauty? | Do It Yourself :घरबसल्या भन्नाट जुगाड-जुमला, फॅशन आणि ब्यूटीच्या जगातला नवा ट्रेण्ड

Do It Yourself :घरबसल्या भन्नाट जुगाड-जुमला, फॅशन आणि ब्यूटीच्या जगातला नवा ट्रेण्ड

Highlightsडू इट युवरसेल्फ या ट्रेण्डमुळे अनेकजण फॅशन पर्सनलाइज्ड करु लागलेय. स्वत:ला जे आवडेल ते स्वत:च डिझाइन करुन वापरायचे असा देखील ट्रेण्ड यातून पुढे येऊ लागलाय.अत्यंत कमी साहित्यात करता येणारा हा प्रकार खूप व्हायब्रण्ट, कलरफूल तरीही ट्रॅडिशनल लूक मिळवून देतो.फक्त कपड्यांच्याच बाबत नाही तर हा ट्रेण्ड ब्युटी प्रोडक्ट्सबाबतही अनुभवण्यास मिळतोय.

-सारिका पूरकर-गुजराथी

आव्हानात्मक काळ जशी परीक्षा घेतो तसं नवीन काही करुन बघण्याची प्रेरणाही देतो.  फॅशन डिझायनिंगची आवड असणाऱ्यांना ती संधी या कोरोनाकाळात  मिळाली. या हौशी फॅशन डिझायनर्झनी DIY अर्थात डू इट युवरसेल्फ हा फॅशन ट्रेण्डच जन्माला घातला.  सध्या इन्टावर लॉकडाऊनमधील स्वत:च बनवलेले फॅशनचे फंडे भरभरुन वाहताहेत. बरं, हे काही नामांकित फॅशन डिझायनरने डिझाईन केलेले कपडे नाहीयेत तर घरबसल्या जे सुचले, त्यातून स्वत:वर ट्राय करत हा जुमला, जुगाड केला जातोय.विशेष म्हणजे हे डीआयवाय म्हणजेच डू इट युवरसेल्फ फंडे तुफान व्हायरल होताहेत, हिट होताहेत.  फॅशन डिझायनर, फॅशन ब्लॉगर, फॅशन प्रेमी, कलाकार ही सर्वच मंडळी नवनवीन संकल्पना घरबसल्या, घरात उपलब्ध कपडे आणि इतर साहित्यातून शोधत आहेत . डू इट युवरसेल्फ हा नुसता ट्रेण्डच नाही तर कल्पकतेचा आविष्कार झालाआहे. महिलांचे टॉप्स, कुर्तीज, पॅण्ट्स, पुरुषांचे पायजमे, शर्ट्स यांच्या हजारो नवीनवीन डिझाईन्स या फॅशन ट्रेण्डमधून साकारलेल्या दिसताहेत. कुणी सिंड्रेला स्टाइल गाऊन ट्राय करतय, कुणी टॉयलेट रोल पलाझो ट्राय करतय, क्वारंटाइन मेकओव्हर म्हणून इन्स्टावर हा असा धुमाकूळ सुरु आहे आणि फॅशन जगतातही. घरात ज्या ज्या वस्तू उपलब्ध आहेत, त्यात फॅशन शोधली जातेय.

 

डू इट युवरसेल्फ या फॅशन कल्चरमध्ये कोविड काळातील निराशा, मरगळ झटकून टाकण्यासाठी काही फंकी ड्रेसेस घरी तयार केले गेले. या ट्रेण्डमुळे अनेकजण फॅशन पर्सनलाइज्ड करु लागलेय. स्वत:ला जे आवडेल ते स्वत:च डिझाइन करुन वापरायचे असा देखील ट्रेण्ड यातून पुढे येऊ लागलाय. जगभरात, भारतात अनेक सेलिब्रेटीही डू इट युवरसेल्फ हा ट्रेण्ड ट्राय करताहेत. लॉकडाऊन काळात काहीतरी क्रिएटिव्ह करता येईल का या हेतूने डू इट युवरसेल्फने सगळ्यांनाच भुरळ घातली.  हाताशी असलेले कपडे, रंग, बटन्स, पिन्स याचा वापर करुन कपाटातील कपड्यांचा मेकओव्हर केला गेला.  घरात अडगळीत ठेवलेली शिलाई मशीन बाहेर निघाली  आणि अनेकजणांनी घरीच कपडे शिवले. हा ट्रेण्ड अजूनही सुरुच आहे.


 

डू इट युवरसेल्फ ट्रेण्डमध्ये टाय ॲण्ड डाय हा प्रकार खूपच हिट झालाय. कारण अत्यंत कमी साहित्यात करता येणारा हा प्रकार खूप व्हायब्रण्ट, कलरफूल तरीही ट्रॅडिशनल लूक मिळवून देतो. इंटरनेटवर ट्युटोरियल्स पाहून अनेकांनी लॉकडाऊनमध्ये जुन्या कपड्यांवर हा फंडा ट्राय केलेला आढळून आला आहे. टी शर्ट पेटिंग हा डू इट युवरसेल्फ  प्रकार देखील लहान मुलांसाठी खूपच ट्रेण्डी ठरला आहे. जुने, प्लेन टी शर्ट्स, काही रंग, फुलं-पानं, भाज्या मुलांपुढे ठेवून द्यायच्या आणि टी शर्टवर सुंदर चित्रं मुलं चितारत बसतात. झाला जुना टी शर्ट नव्यासारखा. हेच नाही तर कपाटातील शूज, हातरुमाल, स्कार्फ यांचासुद्धा मेकओव्हर डू इट युवरसेल्फ ट्रेंडमुळे झालेला दिसून येतोय. एफबीवर नुकतीच एक पोस्ट वाचण्यात आली, लॉकडाऊन काळात वयाची ऐंशी पार केलेल्या दोन बहिणींनी लहान मुलांसाठी 38 स्वेटर्स विणले आणि 25 बेबी फ्रॉक्स शिवले आणि एका संस्थेला भेट दिले. एरवीही जुन्यातून नवं करत राहण्याचा त्यांचा छंद आहे. त्यांच्या या कपड्यांना खूप मागणी असते. होममेड तेच सुंदर असाही ट्रेण्ड कोरोनामुळे आल्याचं चित्र आहे आता. कारण रेडिमेडपेक्षा स्वत:ची कल्पकता, मेहनत यास एक वेगळाच सुगंध असतो, तोच या डू इट युवरसेल्फ ट्रेण्डमुळे अनुभवायला मिळत आहे.  फक्त कपड्यांच्याच बाबत नाही तर हा ट्रेण्ड ब्युटी प्रोडक्ट्सबाबतही अनुभवण्यास मिळतोय.

काही महिन्यांपूर्वी  करिना कपूरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोत तिने स्वत: घरीच तयार केलेला फेस पॅक लावलेला एक फोटो होता आणि दुसरा फोटो होता फेसपॅक धुतल्यानंतरचा.  हळद,चंदन, दुूध, व्हिटामिन इ वापरुन करिनाने घरीच फेसपॅक तयार केला व लावला. या फेसपॅकची रेसिपीही तिने शेअर केली. बेबोचा हा फेसपॅक प्रचंड चर्चेत होता.  कोविड काळात जगभर, भारतात अनेक युवती, महिला वर्क फ्रॉम होम करताहेत. एरवी किमान महिन्यातून एकदा फेशियल करणाऱ्या युवती लॉकडाऊनमुळे पार्लरची वारी करु शकल्या नाहीत.  त्यामुळे घरकामाचा आणि ऑफिसकामाचा ताण घालवण्यासाठी आणि स्वत:ची त्वचा घरबसल्या तजेलदार ठेवण्यासाठी  डू इट युवरसेल्फ या ट्रेण्डमधे सहभागी होत त्यांनी स्वत: ब्यूटी प्रोडक्ट बनवून् ट्राय केलेत.   ब्युटी टिप्स, फेसपॅक, हेअरमास्क, आयब्रो ग्रूमिंग केसं कसे कापायचे, कसे रंगवायचे, आयब्रो कशा शेप करायच्या, होम फेशियल कसं करायचं यासंदर्भातील अनेक साइट्स सर्च करुन अनेकजणी  ब्युटी प्रोडक्ट घरीच तयार करत आहेत.  

थोडक्यात काय ? तर घरचं ते घरचंच असं आपली आजी, आई नेहमी सांगत असते आपल्याला.  ते आत्ता कुठे सगळ्यांना पटायला लागलंय, नाही का? अन्नं असो, फॅशन असो, ब्युटी असो होममेडने आपल्या जीवनात पुन्हा प्रवेश केलाय. फक्त कोरोना संपलं की हे संपायला नको!

Web Title: What is the 'Do It Yourself' trend in fashion and beauty?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.