Join us

बाटलीतील नेलपेंट सुकून कडक झाले? ३ झटपट ट्रिक्स, महागडी नेलपेंट फेकून न देता टिकेल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2025 19:42 IST

How do you get dry nail polish to work again : How to bring old nail polish back to life : What do you do if your favorite nail paint is dried up : बऱ्याच नेलपेंट शेड्स एकाचवेळी खरेदी केल्याने, त्या कालांतराने सुकतात... असे होऊ नये म्हणून टिप्स...

हाता-पायांच्या सौंदर्यात अधिक भर पडून ते सुंदर दिसण्यासाठी प्रत्येकजणी नखांना नेलं पॉलिश लावतात. सौंदर्य म्हटलं की महिला फक्त आपल्या चेहेऱ्याचाच विचार (What do you do if your favorite nail paint is dried up) न करता सर्वांगाचा विचार करतात. चेहेऱ्यासोबत (How to bring old nail polish back to life) त्या हात - पाय यांचीदेखील तितकीच काळजी घेतात. हातापायांचे वेळच्या वेळी मेनिक्युअर, पेडीक्युअर करणे, त्यांची काळजी घेणे, नेलपेंट लावून त्यांची सुंदरता अधिक वाढवणे अशा सगळ्या गोष्टी केल्या जातात(How to bring old nail polish back to life).

काही महिलांना हातांना वेगवेगळ्या रंगाची नेलपेंट लावायला आवडते. काहीवेळा तर या महिला स्वतःच्या आवडीच्या अनेक नेलपेंट घेतात मग आपल्या आवडीनुसार त्या लावतात. अशा बऱ्याच नेलपेंट एकाच वेळी खरेदी करून ठेवल्यास त्या काही कालांतराने सुकून खराब होतात. एकाच वेळी खरेदी केलेल्या या नेलपेंट्स व्यवस्थित स्टोअर केल्या नाहीत तर त्या सुकल्यावर फेकून द्याव्या लागतात. अशावेळी महागड्या ब्रँडसच्या विकत घेतलेल्या नेलपेंट्स फेकून दिल्याने फारच नुकसान होते. अशा परिस्थितीत, काही सोप्या टिप्स वापरुन या महागड्या ब्रँड्सच्या नेलपेंट्स सुकून खराब होण्यापासून वाचावू शकतो. 

नेलपेंट्स सुकल्यानंतर ती पुन्हा पूर्ववत कशी करावी ? 

१. गरम पाण्याचा वापर करावा :- जर बराच काळ स्टोअर करून नेलपेंट आतून सुकली असेल तर नेलपेंटची बॉटल गरम पाण्यात ठेवावी. एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात नेलपेंटची बॉटल १५ ते २० मिनिटांसाठी तशीच राहू द्यावी. असे केल्याने, आतून घट्ट झालेली नेलपेंट पुन्हा द्रव रुपात येऊन सैल होऊ लागेल आणि अशा प्रकारे आपण ती नेलपेंट पुन्हा वापरू शकता. गरम पाण्यातून नेलपेंटची बॉटल काढल्यानंतर ती चांगली मिसळून घ्यावी आणि नंतरच नखांवर लावावी.

करिश्मा तन्ना म्हणते, सगळ्यात भारी माझ्या आईने सांगितलेला सोपा उपाय, म्हणून चमकतो आहे चेहरा...

कितीही गडद डार्क सर्कल्स होतील गायब! फक्त चमचाभर केशर वापरा - आजीबाईच्या बटव्यातील उपाय...

२. नेलपेंट थिनरचा वापर :- नेलपेंट थिनर बाजारात सहज उपलब्ध होते. याचा वापर करून देखील आपण नेलपेंट सैल करू शकता. चांगल्या दर्जाचे नेलपॉलिश थिनर खरेदी करा. त्याचे दोन ते तीन थेंब नेल पेंटच्या बाटलीत घालून बॉटल चांगली हलवा. असे केल्याने नेलपेंट सैल होते. जर आपण यासाठी नेलपॉलिश रिमूव्हर वापरत असाल तर हे अजिबात करू नका, कारण यामुळे नेलपेंट लिक्विडमध्ये गुठळ्या तयार होऊ शकतात.

३. उन्हांत ठेवा :- नेलपॉलिश घट्ट होत असेल तर थोडावेळ उन्हात ठेवा. यानंतर ते  नखांवर लावण्यापूर्वी चांगले मिसळा. सूर्यप्रकाशात ठेवल्यास द्रव वितळतो. त्यामुळे उन्हात वितळून नेलपेंट पातळ होते. त्यामुळे नवीन नेलपॉलिश विकत घेण्याची किंवा जुने नेलपेंट फेकून देण्याची गरज भासणार नाही.

नेलपेंट सुकू नये म्हणून स्टोअर करताना कोणती काळजी घ्यावी...

१. थेट पंख्याखाली बसून नेलपॉलिश कधीही लावू नका. नेल पेंट लावण्यापूर्वी पंखा बंद करा.२. ब्रशला नेल पेंट लावताच झाकण हलके बंद करा, नेलपॉलिशची बाटली पूर्णपणे उघडी ठेवू नका.३. नेलपेंट फ्रिजमध्ये न ठेवता सामान्य तपमानावर बॉक्समध्ये ठेवा, अन्यथा नेलपॉलिशच्या द्रवामध्ये गुठळ्या तयार होतील.४. जर नेलपेंट बराच काळ न वापरात नसेल ते तसेच ठेवले असेल, तर वापरण्यापूर्वी ते चांगले रोल करून हलवून घ्यावे.

टॅग्स :ब्यूटी टिप्सहोम रेमेडी