Join us  

काजळ जरुर लावा, पण हमखास होणारी १ चूक टाळा, नाहीतर डोळे व आजूबाजूची त्वचा होईल खराब...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2023 10:20 PM

Can your Kajal trigger dark circles : तुम्हीही दररोज डोळ्यांना काजळ लावता का ? पण नेहमी होणारी चूक करू नका नाहीतर त्वचेवर दिसतील वाईट परिणाम...

डोळ्यांत काजळ लावल्याने डोळे अतिशय सुंदर दिसून डोळ्यांच्या सौंदर्यात अधिक भर पडते. आपल्यापैकी काही महिलांना रोज डोळ्यांना काजळ लावण्याची सवय असते. सकाळी ऑफिसच्या गडबडीत संपूर्ण मेकअप करायला मिळाला नाही तर किमान काजळ, लिपस्टिक तरी आपण लावतोच. काजळ हे डोळ्यांचे सौंदर्य खुलविण्याचा एक महत्वाचा शृंगार आहे. डोळे अधिक आकर्षक दिसावते म्हणून अनेकजणी काजळ हमखास (Is it harmful to apply kajal on daily bases?) लावतात. यामुळे चेहरा खुलून दिसतो. सध्या बाजारांत आपल्याला काजळाचे अनेक प्रकार अगदी सहजपणे विकत मिळतात. यात वॉटरप्रूफ, न पसरणारे, २४ तास डोळ्यांवर टिकणारे असे असंख्य नवनवीन प्रकार आपल्याला पहायला मिळतात(What are the risks of applying kajal on eyelids?).

काजळ (Is applying kajal safe for eyes?) लावल्यानंतर डोळे मोठे आणि अधिक सुंदर दिसतात हे खरंय, पण डोळ्यांना सतत काजळ लावणं हे डोळ्यांच्या रोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरु शकत. सध्या बाजारांत मिळणाऱ्या अनेक काजळांमध्ये अशी (Is using kajal in the eyes dangerous for the eyes?) रसायन असतात, ज्यामुळे डोळ्यांना ऍलर्जी होते, डोळे कोरडे, रुक्ष पडतात. एवढेच नव्हे तर सतत काजळ लावल्याने डोळ्यांचे आरोग्य तर बिघडते यासोबतच डोळ्यांच्या आजूबाजूच्या त्वचेवर (Why do my eyes gets extremely irritated as soon as I apply Kajal on my eyes? ) देखील याचा परिणाम होऊ शकतो. या संदर्भात RVMU अकादमीच्या संस्थापक, सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आणि स्किन केअर एक्सपर्ट रिया वशिष्ठ यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात(Does Kajal Affect Skin Near Eyes).

डोळ्यांजवळील त्वचेवर काजळाचा कसा परिणाम होऊ शकतो ? 

तज्ज्ञांच्या मते, काजळ लावणे ही काही वाईट सवय नाही. आपण नियमित डोळ्यांना काजळ लावून डोळ्यांचा लूक अधिक आकर्षक बनवू शकतो. परंतु बहुतेक महिला डोळ्यांना काजळ लावल्यानंतर एक मोठी चूक करतात, ज्यामुळे डोळ्यांच्या आजूबाजूच्या त्वचेवर देखील याचा वाईट परिणाम होतो. डोळ्यांजवळची त्वचा चेहऱ्याच्या इतर भागांच्या तुलनेत अधिक जास्त संवेदनशील आणि मऊ, पातळ असते. जर काजळ लावल्यानंतर आपण रोज एक चूक  करत असाल, तर याचा डोळ्यांवर तसेच डोळ्याच्या आजूबाजूच्या त्वचेवर वाईट परिणाम दिसून येतो. खरंतर तज्ज्ञांच्या मते, रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांवरील  काजळ न काढणं ही सर्वात मोठी चूक आहे.

'जेड रोलर' म्हणजे काय ? त्यानं चेहऱ्याला मसाज केला तर चेहऱ्याच्या सगळ्या समस्या गायब होतात, हे खरं आहे ?

भरीव-दाट-रेखीव भुवयांसाठी खास उपाय, खोबरेल तेल आणि कलौंजी- भुवया होतील अतिशय सुंदर

जर आपण काजळ रोज डोळ्यांना लावले पण रात्री झोपताना ते डोळ्यांवरुन काढले नाही तर हे काजळ   डोळ्यांच्या आजूबाजूच्या त्वचेच्या आतील भागात आपोआप मुरते. या बाजारांत विकत मिळणाऱ्या रासायनिक काजळांमध्ये झिंक, लोह आणि लीड ऑक्साईड यांसारखे रासायनिक घटक वापरले जातात. हे असे घटक आहेत जे योग्य प्रकारे आपल्या त्वचेवरुन स्वच्छ न केल्यास डोळ्यांखाली काळी वर्तुळे येऊ शकतात. यासोबतच डोळे व डोळ्यांच्या आसपासची नाजूक व संवेदनशील त्वचा हळुहळु खराब होऊ लागते. त्यामुळे जरी आपण डोळ्यांना काजळ लावले तरीही ते रात्री झोपण्यापूर्वी अवश्य काढावे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवावी. 

गरब्यासाठी हटके हेअर स्टाईल करण्याच्या नादात, केसांचे नुकसान तर करुन घेत नाही ना ?

घरच्याघरी १००% शुद्ध कोरफड जेल बनवायची सोपी कृती, ३ स्टेप्स - महागड्या जेलची गरजच नाही...

डोळ्यांवरील काजळ नैसर्गिक पद्धतीने काढण्याची योग्य पद्धत :- 

१. क्लिंजिंग मिल्क वापरा :- ज्याप्रमाणे आपण मेकअप काढण्यासाठी क्लिंजिंग मिल्कचा वापर करता, त्याचप्रमाणे डोळ्यांभोवतीचे काजळ काढण्यासाठी देखील क्लिंजिंग मिल्कचा वापर करु शकता. क्लिंजिंग मिल्क कापसाच्या बोळ्यावर किंवा कॉटन पॅडवर घ्या. त्यानंतर हळुहळु हलक्या हातांनी डोळ्यांवरील काजळ पुसून घ्यावे. 

२. गुलाबपाणी वापरा :- काजळ काढण्यासाठी आपण गुलाबपाण्याचा देखील वापर करु शकता. गुलाबपाणी हे केवळ मेकअप काढण्यासाठीच नाही तर त्वचेला ग्लो आणण्यास आणि काजळाचे बारीक कण काढून टाकण्यास देखील मदत करते.

३. पेट्रोलियम जेलीचा असा करा वापर :- आपण पेट्रोलियम जेलीनेही डोळ्यांतील काजळ काढू शकता. काजळ काढण्यासाठी थोडीशी पेट्रोलियम जेली बोटांवर घ्यावी. काजळ लावलेल्या भागावर हलक्या हाताने मसाज करुन घ्यावा. त्यानंतर पेट्रोलियम जेली कापसाच्या पॅडने पुसून टाकावी.

टॅग्स :ब्यूटी टिप्सडोळ्यांची निगा