Lokmat Sakhi >Beauty > चेहऱ्यावर जाडजाड पिंपल्स-पुळ्या-मुरुमांचं जंगल? पुळ्या फोडल्या तर ते जास्त वाढतात का? कसा कमी होईल त्रास

चेहऱ्यावर जाडजाड पिंपल्स-पुळ्या-मुरुमांचं जंगल? पुळ्या फोडल्या तर ते जास्त वाढतात का? कसा कमी होईल त्रास

What Happens When You Pop A Pimple चेहऱ्यावर दुखणारे मुरुम-पिंपल्स आले तर अनेकजण ते फोडतात पण तसे करावे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2023 07:11 PM2023-08-18T19:11:58+5:302023-08-18T19:13:36+5:30

What Happens When You Pop A Pimple चेहऱ्यावर दुखणारे मुरुम-पिंपल्स आले तर अनेकजण ते फोडतात पण तसे करावे का?

What Happens When You Pop A Pimple | चेहऱ्यावर जाडजाड पिंपल्स-पुळ्या-मुरुमांचं जंगल? पुळ्या फोडल्या तर ते जास्त वाढतात का? कसा कमी होईल त्रास

चेहऱ्यावर जाडजाड पिंपल्स-पुळ्या-मुरुमांचं जंगल? पुळ्या फोडल्या तर ते जास्त वाढतात का? कसा कमी होईल त्रास

चेहऱ्यावरचे मुरुम फोडले म्हणून ते वाढले हे कितपत खरे? ते का येतात, जातील कशाने?

चंद्रावर डाग असतात असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे महिलांच्या चेहऱ्यावर देखील पिंपल्सचे डाग असतात. ज्यामुळे चेहऱ्यावरील सौंदर्य काही अंशी कमी होते. बिघडलेल्या जीवनशैलीमुळे मुरूम आणि पुळ्या उठण्याचं प्रमाण वाढले आहे. असंतुलित आहार, सौंदर्य प्रसाधनांचा वाईट परिणाम, व्यायामाचा अभाव इत्यादी गोष्टींमुळे चेहऱ्यावरील मुरुम वाढतात.

मुरुमांच्या निगडीत अनेक गैरसमज महिलांमध्ये आहेत. पिंपल्स फोडल्याने कमी होतात का? पिंपल्स फक्त टीनएजरमध्येच दिसून येतात का? उलट - सुलट खाल्ल्याने पिंपल्स वाढतात का? असे प्रश्न व गैरसमज महिलांच्या मनात येत राहतात. पिंपल्सच्या निगडीत महिलांमध्ये संभ्रम का आहे? त्यावर उपाय व उत्तर काय हे पाहूयात(What Happens When You Pop A Pimple).

मुरुम तयार झाल्यावर ते पॉप करणे योग्य आहे का?

याचं उत्तर आहे नाही. पिंपल्स पॉप करण्यासाठी कधीच तयार होत नाही. आपल्याला असे वाटते की, मुरूम आकाराने मोठे झाल्याने आपण त्यांना फोडू शकतो. परंतु, मुरुम पॉप केल्यानंतर चेहऱ्यावर त्याचे डाग पडतात. याशिवाय पिंपल्समधील पूस पिळून काढल्याने इन्फेक्शनचा धोकाही वाढतो. म्हणून कधीही पिंपल्स पॉप करू नका.

मिठाच्या पाण्यानं चेहरा धुण्याचे ४ फायदे, चेहरा होईल नितळ; डाग-मुरुमही होतील गायब

पिंपल्स फक्त टीनएजमध्येच येतात?

टीनएजरच नाही तर, प्रौढांच्या चेहऱ्यावरही पिंपल्स येतात. हार्मोन्समधील चढ - उतार, वाढता स्ट्रेस, मद्यपान, अनहेल्दी लाईफस्टाईल, आनुवंशिकता, सौंदर्य प्रसाधनांचा वाईट परिणाम, त्वचेची निगा न राखणे, या सर्व कारणांमुळे त्वचेवर मुरुमांची समस्या निर्माण होते. फक्त टीनएजरच नाही तर, कोणत्याही वयात चेहऱ्यावर पुरळ उठू शकतात.

चेहऱ्यावर रात्रीच्या समयी पुरळ येतात का?

महिलांमध्ये ही एक कॉमन गैरसमज आहे की, रात्रीच्या वेळी चेहऱ्यावर पुरळ उठतात. पण असे नाही आहे. चेहऱ्यावर मुरुम येण्यामागचे कारण अस्वच्छ छिद्र आहेत. ज्याकडे आपण विशेष लक्ष देत नाही. चेहरा दिवसभर मेकअप आणि धूळ - प्रदूषणात असतो. काहीवेळेला आपण रात्री चेहरा न धुता झोपतो. ज्यामुळे स्किन खराब होणं साहजिक आहे. ओपन पोर्समध्ये बॅक्टेरियाचा संसर्ग होतो. अशा स्थितीत मुरूम निर्माण होतात.

उलट - सुलट खाल्ल्याने पुरळ येतात?

वारंवार फ्राईड फुड्स खाणे, अनहेल्दी पदार्थांमुळे आरोग्यावर तर परिणाम होतोच, अनेकदा स्किनवर देखील ही समस्या दिसून येते. यासह पुअर हायजीन,  केमिकलयुक्त सौंदर्य प्रसाधनांचा वापर करणे, पुरेशी स्किनकेअर नसणे, वेळेवर चेहरा क्लिन न करणे, हे पुरळ येण्यामागचे मुख्य कारणं आहेत.

केसगळतीमुळे वैतागलात? आहारात करा ७ गोष्टींचा समावेश, केस गळणे थांबवा

पिंपल्स फक्त चेहऱ्यावरच येतात का?

असा अनेकांचा गैरसमज आहे की, पुरळ फक्त चेहऱ्यावर उठतात. पण जिथे सेबेशियस ग्रंथी असतील, त्याच ठिकाणी पुरळ उठू शकतात.  पुरळ सामान्यतः आपल्या खांद्यावर, नितंबांवर, पाठीवर आणि छातीवर देखील दिसून येतात.

मुरूम एका रात्रीत नाहीसे होऊ शकतात?

मुरूम एका रात्रीत कमी होतील असे नाही. मुरूम पूर्णपणे नाहीसे होण्यासाठी चार ते सहा आठवडे लागू शकतात. जर त्याला फोडले तर मुरुम गेल्यानंतर त्याजागी डाग निर्माण होऊ शकतात. 

Web Title: What Happens When You Pop A Pimple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.