Join us  

चेहऱ्याला-केसांना एलोवेरा जेल लावताना त्यात चुकूनही हे ५ पदार्थ त्यात मिसळू नका, नुकसानच होईल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2024 6:06 PM

Ingredients should be avoided in aloevera for hair and skin : काही असे पदार्थ आहेत जे एलोवेरा जेलमध्ये मिक्स केल्याने त्याचा फायदा होण्याऐवजी नुकसानच होते, ते पदार्थ नेमके कोणते ? ते पाहूयात...

कोरफड फक्त आरोग्यासाठीच नव्हे तर केस आणि त्वचेसाठीही खूप फायदेशीर मानली जाते. कोरफडीचा गर हा सर्व प्रकारच्या केसांच्या तसेच त्वचेच्या समस्या दूर करण्यात उपयुक्त ठरतो. केस व त्वचेची देखभाल करण्यासाठी हा सर्वात स्वस्त आणि मस्त उपाय आहे. कोरफड जेलमधील पोषण तत्त्वांमुळे त्वचा आणि केस यांना नैसर्गिक चमक येण्यास मदत मिळते. कोरफडमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात जे त्वचा व केसांसाठी आरोग्यदायी मानले जातात. कोरफडमध्ये असणारे मॉइश्चरायझिंग व संरक्षणात्मक गुणधर्म एकूण आरोग्यासाठी कमालीचे फायदेशीर ठरू शकतात.  

केस आणि त्वचेसाठी कोरफडीच्या गराचा वापर करताना आपण त्यात इतरही पदार्थ मिसळतो. एलोवेरा जेलचा फेसपॅक किंवा हेअरमास्क बनवताना त्यात आपण अनेक औषधी पदार्थ  मिक्स करतो. परंतु असे केल्याने एलोवेरा जेलमधील जे नैसर्गिक गुणधर्म आहेत, त्यांचा प्रभाव कमी होतो. परिणामी, एलोवेरा जेलचा पाहिजे तसा प्रभाव आपल्या त्वचा आणि केसांवर दिसून येत नाही. काही असे पदार्थ आहेत जे एलोवेरा जेलमध्ये मिक्स केल्याने त्याचा फायदा होण्याऐवजी नुकसानच होते. एलोवेरा जेलमध्ये कोणते पदार्थ मिक्स करु नयेत ते पाहूयात(Ingredients should be avoided in aloevera for hair and skin).

 एलोवेरा जेलमध्ये कोणते पदार्थ मिक्स करु नयेत ? 

१. लिंबू :- लिंबूमध्ये सायट्रिक अ‍ॅसिड असते, ज्यामध्ये त्वचेला ब्लिच करण्याची क्षमता असते. परंतु लिंबू एलोवेरा जेलमधील नैसर्गिक गुणधर्म कमकुवत करू शकतात. यामुळे एलोवेरा जेलमध्ये लिंबाचा रस मिसळू नये. एलोवेरा जेलमध्ये लिंबाचा रस मिसळल्यास त्वचेची जळजळ किंवा ऍलर्जीचा अधिक धोका वाढू शकतो.

म्हणायला कडू पण मेथ्या म्हणजे आरोग्यासाठी वरदान, ४ सोप्या पद्धतीने वापरा- केसांसाठी तर अतीगुणकार...

२. डेअरी प्रॉडक्ट :- एलोवेरा जेलमध्ये दूध मिसळून ते कधीच वापरु नये. दुधात फॅटस असतात ज्यामुळे एलोवेरा जेलमध्ये असणाऱ्या नैसर्गिक घटकांत बदल होऊ शकतो. एलोवेरा जेलमध्ये दूध मिसळल्याने त्वचेला चिकटपणा व तेलकटपणा येऊ शकतो. दुधाऐवजी आपण नारळाच्या पाण्याचा वापर करु शकता. 

३. गरम पाणी :- गरम पाण्यात एलोवेरा जेल मिक्स करू नये. गरम पाण्यामुळे कोरफडीचे नैसर्गिक गुणधर्म नष्ट होतात आणि त्याचा प्रभाव कमी होतो. यामुळे त्वचेची जळजळ किंवा त्वचेला सूज देखील येऊ शकते. एलोवेरा जेलमध्ये जर आपल्याला पाणी मिसळायचे असेल तर थंड पाण्याचा वापर करावा. 

लालचुटूक जास्वंदीच्या फुलांचे करा होममेड कंडिशनर, केसांच्या सर्व समस्यांवर एक रामबाण उपाय..

४. तुरटी :- तुरटीचा वापर आपल्या त्वचेसाठी खूपच हानिकारक होऊ शकतो. एलोवेरा जेलमध्ये तुरटी मिक्स केल्याने या जेलमधील सौम्य गुणधर्मांना हानी पोहोचते. त्यामुळे त्वचेवर जळजळ आणि खाज येऊ शकते. तुरटीऐवजी आपण ग्रीन टी किंवा काकडीचा रस यांसारख्या नैसर्गिक घटकांचा वापर करु शकता. 

५. तीळ किंवा मोहरीचे तेल :- एलोवेरा जेलमध्ये तीळ किंवा मोहरीचे तेल मिक्स करु नये. तीळ व मोहरीचे तेल हे थोडे जड असते. यामुळे एलोवेरा जेलमधील नैसर्गिक गुणधर्मात बदल होऊ शकतात. यामुळे त्वचा व केस तेलकट होऊ शकतात. याऐवजी तुम्ही ऑलिव्ह किंवा खोबरेल तेल यांसारख्या हलक्या तेलाचा वापर करु शकता.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी