- प्रियांका निर्गुण - जाधव.
आपण सुंदर आणि तितकंच आकर्षक दिसावं असं प्रत्येकीला वाटतच. यासाठी अनेकजणी वेगवेगळ्या प्रकारच्या लाखो रुपयांच्या महागड्या ब्यूटी ट्रिटमेंट्स करायला देखील अगदी चुटकीसरशी तयार होतात. बदलत्या काळानुसार, आपला रंग, केस इतकंच काय तर अगदी डोक्यापासून पायापर्यंत अनेक अवयवांना मोठमोठया सर्जरी किंवा ब्यूटी ट्रिटमेंट्स करुन हवे तसे सुंदर आणि आकर्षक बनवले जाते. यात फिलर, बॉटोक्स, मायक्रोनीडलिंग अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या महागड्या ब्यूटी(Barbie Botox: The Trend of Neck and Shoulder Slimming Injections Explained) ट्रिटमेंट्सचा समावेश होतो. आपल्याकडील काही मोठे असामी किंवा बड्या व्यक्ती, बॉलिवूड अभिनेत्री, सेलिब्रिटी अशा ब्यूटी ट्रिटमेंट्स अगदी सर्रास (Everything You Need to Know About 'Barbie Botox) करुन घेतात. अर्थात त्यांना पडद्यावर सुंदर दिसायचं असत बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपलं नाव टिकवायचं असत, त्यासाठीच असे अनेक उपाय केले जातात. परंतु हे ब्यूटी ट्रिटमेंट्स (what is barbie botox that enhance & make neck or shoulder beautiful) करुन घेण्याचं वारं आता हळुहळु आपल्यासारख्या सामान्य लोकं आणि तरुण वयीन मुलामुलींपर्यंत देखील पोहोचलं आहे('Barbie Botox' viral beauty treatment).
हेअर बोटॉक्स, स्किन बोटॉक्स यांसारख्या बोटॉक्स ब्यूटी ट्रिटमेंट्स सध्या फारच ट्रेंडिंग होत आहेत. यातही 'बार्बी बोटॉक्स' करुन घेण्याकडे हल्ली मुलींचा कल वाढत जात आहे. 'बार्बी बोटॉक्स' (Barbie Botox) म्हणजे नेमकं काय, ते का केलं जात, त्याचे फायदे काय याबद्दल अधिक माहिती घेऊयात. प्लास्टिक सर्जन डॉक्टर पल्लवी फाटक यांनी नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीनुसा 'बार्बी बोटॉक्स' म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊयात.
'बार्बी बोटॉक्स' म्हणजे नेमकं काय ?
प्लास्टिक सर्जन डॉक्टर पल्लवी फाटक यांच्या म्हणण्यानुसार, 'बार्बी बोटॉक्स' ही एक प्रकारची कॉस्मेटिक ट्रिटमेंट आहे, जी आपल्या मान आणि खांद्यांना व्यवस्थित शेप देऊन अधिक आकर्षक करण्यास मदत करते. ज्याप्रमाणे ओठांना जाड किंवा पातळ करण्यासाठी 'लिप फिलर' ट्रिटमेंट वापरली जाते त्याचप्रमाणे, मान आणि खांद्यांना लांब, सडपातळ आणि शेप देण्यासाठी 'बार्बी बोटॉक्स' केले जाते. या ट्रिटमेंटमध्ये, खांद्याच्या ट्रॅपेझियस स्नायूला आराम देऊन मान स्लिम करण्याचे काम करते म्हणून याला 'ट्रॅपेझियस बोटॉक्स' किंवा 'ट्रॅप बोटॉक्स' असेही म्हणतात. याशिवाय, ही ट्रिटमेंट स्नायूंवरील ताण कमी करून त्यांना आराम देण्यासाठी देखील फायदेशीर असते.
आंघोळीच्या पाण्यांत टाका ही जादुई पोटली, त्वचेच्या समस्या होतील गायब - त्वचा दिसेल अधिकच सुंदर...
ही ट्रिटमेंट केल्यानंतर त्याचा प्रभाव किती काळ टिकतो ?
प्लास्टिक सर्जन डॉक्टर पल्लवी यांनी सांगितले की, या बार्बी बोटॉक्सचा परिणाम २ ते ६ आठवड्यांत दिसून येतो आणि काही दिवस खांद्यावर सूज दिसून येते. बार्बी बोटॉक्सचे परिणाम ३ ते ६ महिने टिकतात. नंतर परत आपल्याला पुन्हा ही ट्रीटमेंट करुन घ्यावी लागते. यामुळे खांदे आणि मान अधिक सुंदर दिसणाऱ्यास मदत होते.
पांढऱ्या केसांना डाय लावायची भीती वाटते? बिटाचा रस 'या' पद्धतीने लावा - केसांना मिळेल सुंदर रंग...
'बार्बी बोटॉक्स' ट्रीटमेंट करण्याची किंमत किती ?
'बार्बी बोटॉक्स' करण्यासाठी आपल्याला रुपये १५,००० ते ५०,००० रुपयांपर्यंत खर्च येतो. डॉक्टरच्या अनुभवानुसार आणि ठिकाणानुसार ही किंमत बदलू शकते.
'बार्बी बोटॉक्स' ही फेशियल ट्रीटमेंट कॉन्टूरिंगसाठी लोकप्रिय होत चाललेली पद्धत आहे. तथापि, कोणत्याही कॉस्मेटिक प्रक्रियेआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आणि वैयक्तिक गरजांनुसार योग्य उपचार निवडणे गरजेचे आहे. कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया करण्यापूर्वी, हे लक्षात ठेवा की,फक्त दुसऱ्यासारखे दिसण्यासाठी कोणत्याही प्रकारचे उपचार करू नये. याशिवाय, फक्त ट्रेंड फॉलो करण्यासाठी असे कधीच करु नका. बाजारात उपलब्ध असलेली नवीन ट्रिटमेंट किंवा नवीन उपचार पद्धती प्रत्येकालाच सूट होईल अशी नसते.