Join us  

तुम्हालाही जास्त ब्लॅकहेडस, व्हाईटहेडस येतात? काय करावे, काय करु नये, तज्ज्ञ सांगतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2022 5:54 PM

What is Blackheads and Whiteheads, How to Remove it according to Experts : ब्लॅकहेडस किंवा व्हाईटहेडस ही आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यातील एक महत्त्वाची अडचण असते.

ठळक मुद्देचांगले ऑईल क्लिंजर वापरुन त्वचेवर जमा होणारे जास्तीचे तेल काढून टाकायला हवे. आहारात डेअरी उत्पादने आणि साखर पूर्णपणे टाळायला हवी.

चेहऱ्यावर फोड येणे, पिंपल्स येणे, डाग पडणे, सुरकुत्या पडणे यांसारख्या समस्या आपल्यापैकी अनेकांना नेहमी सतवतात. अशावेळी आपला चेहरा सतेज आणि नितळ दिसावा यासाठी आपण नेहमी काही ना काही उपाय करत असतो. पण काही वेळा हातात पुरेसा वेळ नसल्याने किंवा अचानक कुठेतरी जायचे असल्याने आपण घरच्या घरीच काही उपाय करतो किंवा मेकअपचा आधार घेतो. असे करणे ठिक असले तरी काही वेळा आपण करत असलेले उपाय घातक ठरु शकतात आणि त्याचा फायदा होण्याऐवजी तोटा होऊ शकतो. ब्लॅकहेडस किंवा व्हाईटहेडस ही आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यातील एक महत्त्वाची अडचण असते. अनेकदा हे ब्लॅकहेडस इतके जास्त प्रमाणात येतात की चेहऱ्यावर त्यांचे डाग जमा व्हायला लागतात आणि चेहरा खराब दिसतो. अशावेळी नेमकं काय करायला हवं आणि काय करु नये याविषयी त्वचारोगतज्ज्ञ डॉ. भाग्यश्री गुप्ते काही महत्त्वाची माहिती देतात, त्याविषयी...

ब्लॅकहेडस किंवा व्हाईटहेडस नेमके तयार कसे होतात?

आपल्या शरीरात विविध गोष्टींची निर्मिती होत असते. शरीरात तयार होणारे सिबम हे तेलाच्या रुपात तयार होणारी अशीच एक गोष्ट आहे. त्वचेच्या खालच्या थरात तयार होणारे हे सिबम त्वचेच्या माध्यमातून बाहेर येते ज्याला आपण ब्लॅकहेड किंवा व्हाईट हेड म्हणतो. हे तेल बाहेर येत असताना स्कीनमुळे त्याला बाहेर यायला योग्य ती जागा मिळाली नाही तर त्याचे व्हाईट हेडस होतात आणि हेच तेल बाहेर येत असताना त्याचा सूर्यकिरणांशी संपर्क आला तर त्यापासून ब्लॅकहेडस तयार होतात. 

काय काळजी घ्यायला हवी?

१. घरच्या घरी ब्लॅकहेडस किंवा व्हाईट हेडस अजिबात काढू नका. एक्सपर्टकडे जाऊन त्यांच्याकडूनच ते योग्यपद्धतीने काढून घ्या. 

२. ऑयली स्कीनला ब्लॅकहेडस जास्त येतात, मात्र ड्राय स्कीनवरही ब्लॅकहेडस येऊ शकतात. त्यामुळे चेहऱ्यावर जास्त प्रमाणात तेलाची निर्मिती होत असेल तर चांगले ऑईल क्लिंजर वापरुन त्वचेवर जमा होणारे जास्तीचे तेल काढून टाकायला हवे. तसेच मॉईश्चराईज करुन त्वचेची उघडी असणारी रंध्रे बंद राहतील याची काळजी घ्यायला हवी. 

३. आहारात डेअरी उत्पादने आणि साखर पूर्णपणे टाळायला हवी. या दोन्ही गोष्टींचा त्वचेवर थेट परीणाम होत असल्याने याची काळजी घ्यायला हवी. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी