आपल्या आयब्रो जाड, भरगच्च, काळ्याभोर असाव्यात असे प्रत्येकीलाच वाटत असते. यासाठी आपण आपल्या आयब्रोजची वेगवेगळ्या पद्धतीने काळजी घेतो. आयब्रोचे केस काळेभोर आणि जाड दिसण्यासाठी आपण आयब्रो पेन्सिल, सिरम, ऑईल असे अनेक उपाय करून पाहतो. परंतु हे उपाय वरवरचे असून कायम टिकून राहणारे नसतात. सध्या आयब्रोचे केस अधिक भरगच्च आणि गडद काळभोर दिसावे यासाठी आयब्रो टिंटिंग करण्याचा एक नवा ट्रेंड सुरु आहे(How To Do Eyebrow Tinting At Home).
या आयब्रो टिंटिंग ब्यूटी ट्रिटमेंटमध्ये आपल्या आयब्रोचे केस एका विशिष्ट पद्धतीने रंगवले जातात. ज्यामुळे आपल्या आयब्रोचे केस भरगच्च आणि गडद काळभोर दिसतात. ही ब्यूटी ट्रिटमेंट (How to Tint Your Eyebrows at Home) केल्याने आपल्याला वारंवार आयब्रो करावे लागत नाहीत, तसेच आयब्रोचे केस पातळ, विरळ असतील तर ते अधिक जाड आणि गडद होण्यास मदत होते. आयब्रो टिंटिंग म्हणजे काय, ते कसे केले जाते याविषयी अधिक माहिती घेऊयात(What Is Eyebrow Tinting How To Do It At Home).
१. आयब्रो टिंटिंग म्हणजे काय ?
आयब्रो टिंटिंग ही सध्या फारच ट्रेंडमध्ये असणारी एक ब्यूटी ट्रिटमेंट आहे. यात आपले आयब्रो अधिक जाड आणि दाट होण्यास मदत होते. आयब्रो टिंटिंग या ब्यूटी ट्रिटमेंट मध्ये आयब्रोच्या केसांवर एका विशिष्ठ प्रकारची सेमी - पर्मनंट डाय लावली जाते. ही डाय लावल्यामुळे आपल्या आयब्रोचे केस अधिक जाड, दाट आणि काळेभोर दिसतात. या ट्रिटमेंटमध्ये फक्त आयब्रोचेच केस नाही तर त्यांच्या आसपासचे बारीक केस देखील रंगवले जातात. यामुळे आपले आयब्रो अधिकच सुंदर आणि आखीव रेखीव दिसतात. आयब्रो टिंटिंग ही ब्यूटी ट्रिटमेंट सेमी पर्मनंट पद्धतीची आहे. ही ब्यूटी ट्रिटमेंट तुम्ही एकदा करुन घेतल्यानंतर तिचा परिणाम काही महिनेच टिकून राहतो. एका ठराविक काळानंतर आपल्या आयब्रोला दिलेला रंग फिका पडून नाहीसा होतो. अशावेळी आपल्या आयब्रोवरील हा आर्टिफिशियल रंग उडून आपले आयब्रो आधी होते तसेच पुन्हा पाहिल्यासारखेच दिसतात.
'हे' ३ पदार्थ खा आणि स्किन प्रॉब्लेम्स कायमचे विसरा, ऋजुता दिवेकर यांचा खास सल्ला...
२. आयब्रो टिंटिंग ब्यूटी ट्रिटमेंटमध्ये नक्की काय केले जाते ?
तुमच्या आयब्रोचा प्रकार कसा आहे यावर आयब्रो टिंटिंग करण्यासाठी किती वेळ लागेल हे ठरवले जाते. साधारणतः आयब्रो टिंटिंग करण्यासाठी १५ ते २० मिनिटांचा वेळ लागतो. जर तुमच्या आयब्रोची लांबी आणि जाडी अधिक असेल तर आपल्याला जास्त वेळ लागू शकतो. आयब्रो टिंटिंग करण्यासाठी सर्वात आधी तज्ज्ञ तुमच्या त्वचेच्या कॉम्प्लेक्सनुसार आधी डाय तयार करतात. यानंतर, भुवया स्वच्छ केल्या जातात आणि त्वचेभोवती पेट्रोलियम जेलीचा पातळ थर लावला जातो. त्यानंतर तयार केलेली डाय आपल्या आयब्रोवर लावली जाते. ही डाय आपल्या आयब्रोवर आधी केस ज्या दिशेने आहेत त्या दिशेने लावली जाते, त्यानंतर केसांच्या विरुद्ध दिशेने लावली जाते. डाय लावून झाल्यानंतर थोडा वेळ ती तशीच ठेवून सुकण्यासाठी थोडा वेळ दिला जातो. त्यानंतर जास्तीची डाय जी आजूबाजूला लागली आहे ती पेपर टॉवेलने पुसली जाते.
सतत केस गळून विरळ झालेत ? टक्कल दिसतंय? 'या' ४ तेलांचे मिश्रण करेल जादू, केसांची होईल वाढ...
३. किती काळासाठी ही डाय टिकून राहते ?
आयब्रोला डाय केल्यानंतर चार ते सहा आठ्वड्यापर्यंतच हा रंग आयब्रोवर टिकून राहतो. त्यानंतर हा रंग हळूहळू फिका होऊन निघून जातो. यासाठी आपल्याला दर चार ते सहा आठवड्यांनी आयब्रोला रंग देऊन टिंटिंग करावे लागते.
आंघोळीनंतर स्किनकेअर रुटिन नेमकं कसं असावं? वेळ चुकली तर त्वचेचे आजार छळतात कारण...
४. घरच्या घरी आयब्रो टिंटिंग कसे करावे ?
घरच्या घरी सोप्या पद्धतीने आयब्रो टिंटिंग करण्यासाठी आपल्या आयब्रोच्या केसांच्या रंगापेक्षा फिकट शेडची डाय घ्यावी. सगळ्यात आधी चेहरा स्वच्छ धुवून आयब्रो व्यवस्थित वाळवून घ्याव्यात. त्यानंतर छोटया ब्रशने आयब्रोचे केस विंचरून ते व्यवस्थित एका सरळ रेषेत आणावे. त्यानंतर आयब्रोच्या चारही बाजुंनी पेट्रोलियम जेल लावून घ्यावे. जेल लावल्यानंतर आयब्रोवर ब्रशच्या मदतीने डाय लावून घ्यावी. १० ते १५ मिनिटे डाय वाळू द्यावी. त्यानंतर १५ मिनिटांनी पेपर टॉवेलने ही वाळलेली डाय पुसून घ्यावी.