Lokmat Sakhi >Beauty > हेअर बोटोक्स म्हणजे काय? ते कुणी करावे, ते कायमच टिकते की सतत करावे लागते

हेअर बोटोक्स म्हणजे काय? ते कुणी करावे, ते कायमच टिकते की सतत करावे लागते

What is Hair Botox : केस डॅमेज झाले, फार गळतात? हेअर बोटोक्स देईल दाट- शायनी केस, वाचा ही ट्रिटमेंट नक्की आहे काय

By manali.bagul | Published: August 14, 2023 06:02 PM2023-08-14T18:02:32+5:302023-08-14T18:11:10+5:30

What is Hair Botox : केस डॅमेज झाले, फार गळतात? हेअर बोटोक्स देईल दाट- शायनी केस, वाचा ही ट्रिटमेंट नक्की आहे काय

What is Hair Botox : Hair Botox Treatment Benefits, Price & How It Works and benefits | हेअर बोटोक्स म्हणजे काय? ते कुणी करावे, ते कायमच टिकते की सतत करावे लागते

हेअर बोटोक्स म्हणजे काय? ते कुणी करावे, ते कायमच टिकते की सतत करावे लागते

मनाली बागुल

आपले केस बाऊंसी, दाट आणि व्यवस्थित सेट केलेले दिसावेत यासाठी मुली स्ट्रेटनिंग, स्मूथनिंग, ग्लोबल कलर अशा बऱ्याच हेअर ट्रिटमेंट्स करून केस हवेतसे करून घेतात.  कारण सुंदर, आकर्षक दिसण्यात चेहऱ्याबरोबरच केसांची भूमिका महत्वाची असते. खरं पाहता केसांवर दिसणारा हा बदल तात्पुरता असतो. (What is hair botox vs keratin) वारंवार केसांवर केमिकल्सयुक्त क्रिम्स आणि हिटींग टुल्स वापरल्याने केस खराब होतात. केसांचा पोत बिघडून कोरडेपणा येतो आणि कोरडे केस जास्त गळू लागतात. केस चांगले दिसण्यासाठी अनेक स्त्रिया हेअर स्पा करतात पण हेअर स्पा महिन्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा नियमित करावाच लागतो. (Hair Botox Treatment Benefits, Price & How It Works)

कॅरेटिन ट्रिटमेंट्ही ३ ते ६ महिन्यांनी करावी लागते. सतत अशा ट्रिटमेंटुस घेणं खर्चिक ठरू शकतं. सध्या हेअर बोटोक्स ही ट्रिटमेंट बरीच चर्चेत आहे. केस गळतीने त्रस्त असलेल्यांना केसांच्या वाढीसाठी प्रत्येक उपाय करून पाहण्याची इच्छा असते. अशा स्थितीत हेअर बोटोक्समध्ये केसांवर नेमकं काय करतात? यामुळे केस गळण थांबत का असे  अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. कॉस्मॅटोलॉजिस्ट आणि हेअर स्टायलिस्ट धनश्री संखे यांनी लोकमत सखीशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

हेअर बोटोक्स कोणी करावे?

हेअर बोटोक्स सर्वांनाच करण्याची गरज नसते. ज्यांचे केस खूपच ड्राय झालेले असतात. केसांमध्ये मॉईश्चर कमी असतो, यांना या ट्रिटमेंटची गरज असते. कलर ट्रिटमेंट, हायलाईट करतो तेव्हा केसांना प्रोटेक्शनचीही आवश्यकता असते.  कलर करताना केसांच्या क्युटिकल्समध्ये जेव्हा केमिकल्स घातले जातात तेव्हा केस डॅमेज होऊ नयेत म्हणून आधीच काळजी घ्यावी. हेअर बोटोक्स केसांच्या क्युटिकल्सना  प्रोट्क्ट करते आणि मॉईश्चर बुस्ट करते. यामुळे केसांचा वॉल्युमिलस लूक दिसतो, केस शायनी दिसतात.  

या ट्रिटमेंट्मध्ये केसांवर नक्की काय केलं जातं?

ही एक सेमी-परमनंट ट्रिटमेंट आहे. १ ते दीड महिना हेअर बोटोक्स टिकून राहते.  मॅनेजेबल, हेल्दी हेअर लूक हवा असेल तर तुम्ही हेअर बोटोक्स करू शकता. हाय प्रोटीन लिक्वीड केसांच्या क्युटिकल्समध्ये टाकले जाते. यामुळे केस मजबूत होतात. परिणामी बाहेरील घटकांपासून म्हणजेच प्रदूषण, शॅम्पूज यामुळे केसांचं होणारं नुकसान टाळता येतं आणि केसांचा फ्रिजीनेस निघून जातो. केसांना फाटे फुटण्याची समस्याही कमी होते. हेअर बोटोक्स २ प्रकारचे असते.  स्काल्पवर इन्जेक्शन देऊन केले जाणारे बोटोक्स हे  डॉक्टरांकडून केले जाते. सलून प्रोफेशनल्स टॉपिकल बोटोक्स करतात. 

इतर ट्रिटमेंट्सपेक्षा बोटोक्स केल्याने काय फायदा होतो?

इतर हेअर ट्रिटमेंट्सनंतर तुम्हाला तेल न लावण्याचा सल्ला दिला जातो. याऊलट बोटोक्स केल्यानंतर तुम्ही कधीही केसांना तेल लावू शकता. बोटोक्स ट्रिटमेंट फॉरमल डिडाईड फ्री असते. त्यामुळे डोळ्यांना कोणतीही एलर्जी होत नाही.  केसांच्या लांबीवर हेअर बोटोक्सचा खर्च अवलंबून असतो. साधारणत: 5 हजारांपासून ते १२ ते १३ हजारांपर्यंत खर्च येतो.

Web Title: What is Hair Botox : Hair Botox Treatment Benefits, Price & How It Works and benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.