Join us

कतरिना कैफ-आलिया भट करतात ते आइस फेशियल नक्की काय आहे? पाहा पद्धत आणि फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 16:53 IST

What Is Ice Facial: आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आइस फेशिअलबाबत. हे कसं करतात आणि याचे फायदे काय होतात.

What Is Ice Facial: त्वचेमधील सेल्स जुन्या झाल्या की, नवीन सेल्स त्यांची जागा घेतात. या प्रक्रियेत जुन्या सेल्स किंवा डेड स्कीन सेल्स त्वचेच्या वरच्या बाजूला जमा होऊ लागतात. या डेड स्कीनमुळे त्वचा डल, डार्क आणि रफ दिसू लागते. तसेच बदलत्या वातावरणात प्रदूषण आणि धूळ-मातीमुळेही त्वचेचं नुकसान होतं आणि त्वचेवरील ग्लो कमी होऊ लागतो. त्वचेची हरवलेली रंगत आणि ग्लो पुन्हा मिळवण्यासाठी फेशिअल केलं जातं. कतरिना कैफ, आलिया भट, तमन्ना भाटिया या नियमित आइस फेशियल करतात अशी व्हायरल चर्चा असतेच. हे कसं करतात आणि याचे फायदे काय होतात.

कधी करतात आइस फेशिअल?

या फेशिअलमध्ये आइसचा वापर केला जातो हे तुम्हाला माहीत आहेच. त्वचेवर बर्फ लावून स्कीन रिफ्रेश करण्याचा प्रयत्न केला जातो. आइस फेशिअलच्या मदतीनं त्वचेच्या पोर्समध्ये जमा मळ-माती आणि सीबम साफ करण्यास मदत मिळते. सोबतच त्वचा फ्रेश आणि क्लीन दिसते.

कसं करतात आइस फेशिअल?

- एका मोठ्या भांड्यात थोडं पाणी आणि बर्फाचे काही तुकडे टाका.

- या बर्फाच्या पाण्यात चेहरा १५ ते २५ सेकंदासाठी बुडवा.

- त्यानंतर चेहरा टॉवेलनं हलक्या हातानं पुसून घ्या.

- जेव्हा त्वचा चांगली ड्राय होईल, त्वचेवर एखादं चांगलं मॉइश्चरायजर लावा.

- काही मिनिटं थांबल्यानंतर पुन्हा चेहरा बर्फाच्या पाण्यात बुडवा. नंतर पुन्हा चेहरा पुसा.

आइस फेशिअलचे फायदे

बर्फाच्या मदतीनं त्वचा चांगल्याप्रकारे एक्सफॉलिएट होते आणि त्वचेवर ग्लो येतो.आइस फेशिअलच्या मदतीनं चेहऱ्याच्या त्वचेमधील ब्लड सर्कुलेशन वाढतं.

- स्कीन डिटॉक्ससाठीही आइस फेशिअल फायदेशीर आहे.

- चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स आणि ब्लॅकहेड्स साफ करण्यासाठीही आइस फेशिअल फायदेशीर ठरते.

- आइस फेशिअलनं चेहऱ्यावरील सूजही कमी होते. 

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स