आपल्या हातापायांचे सौंदर्य जपण्यासाठी आपण त्यांची खूप काळजी घेतो. काहीवेळा आपण पार्लरमध्ये जाऊन मेनिक्यूअर आणि पेडीक्यूअर सारख्या विविध महागड्या ट्रिटमेंट्स घेतो. चेहरा हा आपल्या सौंदर्यातील महत्त्वाचा भाग असल्याने आपण चेहऱ्याच्या सौंदर्याकडे पुरेसे लक्ष देतो. पण हात, पाय यांच्याकडे मात्र म्हणावे तितके लक्ष दिले जात नाही. अनेकदा धूळ, प्रदूषण, ऊन यांमुळे आपले हात आणि पाय काळे पडतात. नखंही खराब होतात. पण रोजच्या धावपळीत आपण पाय आणि हात यांचे सौंदर्य जपतोच असं नाही. मग एकाएकी हात - पाय खराब झाल्याचं जाणवतं आणि आपण पार्लर गाठतो.
मेनिक्यूअर आणि पेडीक्यूअरच्या ट्रिटमेंटसाठी आपण एकवेळीच हजारो रुपये खर्च करतो. आपण पार्लरला जाऊन हातापायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी कितीही महाग ट्रिटमेंट्स केल्या तरीही त्याचा प्रभाव पुढचे काहीच आठवड्यांसाठी दिसतो. त्यानंतर वातावरणातील धूळ, माती, प्रदूषण यामुळे आपले हात पाय पुन्हा खराब होण्यास सुरुवात होते. त्यामुळे वारंवार पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रिटमेंट्सवर पैसे खर्च करण्यापेक्षा घरच्या घरी अगदी काही सोप्या स्टेप्समध्ये प्युमिक स्टोनच्या मदतीने आपण आपल्या हातापायांचे सौंदर्य राखू शकतो(What is pumice stone? How to Use a Pumice Stone? Get to know this natural skin exfoliant better).
प्युमिक स्टोन (Pumice Stone) म्हणजे नेमकं काय ?
प्युमिक स्टोन (Pumice Stone) हा एक प्रकारचा दगड आहे. तो खूपच हलका आणि सच्छिद्र असतो. या दगडाचा वापर प्रामुख्याने त्वचा स्वच्छ करण्यासाठीच केला जातो. इनग्रो हेअरची वाढ थांबण्यासाठीदेखील या दगडाचा वापर परिणामकारक ठरतो. मात्र त्यासाठी हा दगड त्वचेवर कुठे आणि कसा वापरावा याची योग्य माहिती असणे गरजेचे आहे.
उन्हाळ्यात कुरळ्या केसांचा ड्रायनेस वाढतो? ५ सोपे उपाय, कुरळे केसही होतील मऊ आणि चमकदार...
प्युमिक स्टोनचा वापर त्वचेवर कसा करावा ?
१. हाता - पायांची त्वचा स्वच्छ करण्यासाठी एका टबमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यात हात पाय बुडवून ठेवा. हात पाय संपूर्ण भिजल्यावर प्युमिक दगडाने पायांच्या टाचा व हातांची त्वचा स्वच्छ करू शकता.
२. प्युमिक दगड वापरताना पाय किंवा हात सर्वात आधी कोमट पाण्यात भिजवावे ज्यामुळे त्वचा मऊ होते आणि स्वच्छ करण्यास मदत होते.
३. त्वचेवर साबण किंवा तेल लावूनही आपण प्युमिक दगडाचा वापर करू शकता.
४. त्वचेवर हा दगड एक ते दोन वेळा हळूवार घासल्यास आपल्या त्वचेवरील डेड स्कीन आणि धुळ, माती निघून जाते.
५. प्युमिक स्टोनचा वापर झाल्यावर त्वचा आणि प्युमिक स्टोन दोन्ही स्वच्छ पाण्याने धुवावे.
६. त्वचेला एक्सफोलिएट केल्यावर पुसून मॉइस्चराइझर लावण्यास विसरू नये.
७. प्युमिक स्टोनचा वापर आपण आठवड्यातून दोन ते तीन वेळा करू शकता.
ड्राय शाम्पू खरेच केसांसाठी चांगला असतो? तज्ज्ञ सांगतात फायदे तोटे..
प्युमिक स्टोन (Pumice Stone) वापरण्याचे फायदे :-
१. पायांच्या टाचांसाठी :- वातावरणात बदल झाला की टाचा फुटू लागतात. अति थंड किंवा अति उष्ण वातावरण टाचांना सहन होत नाही. मात्र फाटलेल्या टाचांमुळे पायाचे सौंदर्य कमी होते. अशा वेळी पायांच्या टाचांवरील जाड स्कीन काढून टाकण्यासाठी प्युमिक स्टोनचा वापर करू शकता. घरी पेडिक्युअर आणि मेनिक्युअर करण्यासाठी प्युबिक स्टोन वापरणे फायद्याचे ठरेल.
एक रुपयाही खर्च न करता ८ गोष्टी करा, कोरियन तरुणींसारखा चमकदार आणि सुंदर दिसेल चेहरा...
२. कोरड्या त्वचेसाठी :- आपली त्वचा जितकी कोरडी होते तितका त्वचेवर डेड स्किनचा थर जमा होतो. अशा वेळी त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी प्युबिक स्टोन वापरणं फायद्याचं ठरत. त्वचा स्वच्छ करून मग मॉइस्चराइझरचा वापर केल्यामुळे त्वचेमध्ये ते चांगल्या पद्धतीने मुरतं आणि त्वचा मऊ करतं.
३. त्वचेवरील अनावश्यक केसांसाठी :- अंगावरील अनावश्यक केस कमी करण्यासाठी आपण नियमित प्युमिक स्टोन वापरू शकता. मान, हात, अंडरआर्म्स, मांड्या स्वच्छ करण्यासाठी प्युमिक स्टोन वापरू शकता. मात्र फार जोरात तो त्वचेवर रगडू नये. नाहीतर त्वचेचं नुकसान होण्याची शक्यता असते.