Lokmat Sakhi >Beauty > 'रिव्हर्स हेअर वॉशिंग' केस धुण्याची नवी पद्धत, केस गळती थांबून केस होतील चमकदार....

'रिव्हर्स हेअर वॉशिंग' केस धुण्याची नवी पद्धत, केस गळती थांबून केस होतील चमकदार....

Reverse Hair Washing : Everything You Need To Know This Viral Hair-Wash Trick : आपल्याला 'रिव्हर्स हेअर वॉशिंग' पद्धतीबद्दल माहिती आहे का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2023 11:57 AM2023-04-03T11:57:30+5:302023-04-03T12:08:06+5:30

Reverse Hair Washing : Everything You Need To Know This Viral Hair-Wash Trick : आपल्याला 'रिव्हर्स हेअर वॉशिंग' पद्धतीबद्दल माहिती आहे का ?

What is reverse hair washing? Here is all you need to know about this trending haircare technique | 'रिव्हर्स हेअर वॉशिंग' केस धुण्याची नवी पद्धत, केस गळती थांबून केस होतील चमकदार....

'रिव्हर्स हेअर वॉशिंग' केस धुण्याची नवी पद्धत, केस गळती थांबून केस होतील चमकदार....

आपले केस काळेभोर, घनदाट आणि लांबसडक असावेत अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. केस दाट आणि लांब वाढलेले असतील तर कुठलीही स्त्री सुंदर दिसते. आपण आपल्या केसांची योग्य ती काळजी घेतो. केसांची वाढ चांगली होण्यासाठी आपण तेलाने मसाज करणे, वेगवेगळ्या पद्धतीचे हेअर मास्क वापरणे अशा विविध गोष्टी करत असतो. काही स्त्रिया पटकन केस वाढवण्यासाठी अनेक प्रकारची हेअर प्रॉडक्ट्स वापरतात. एवढंच नव्हे तर पार्लरमध्ये जाऊन केसांवर विविध ट्रिटमेंट्स करतात. 

केस म्हटलं की त्याच्या हजारो समस्या असतात. केस पातळ होणे, केसांची मूळ खराब होणे, केसगळती, केस रुक्ष - निस्तेज होणे अशा अनेक समस्या केसांच्या बाबतीत निर्माण होऊ शकतात. केसांच्या बाबतीत कोणत्याही समस्या उद्भवू नये नये म्हणून केस स्वच्छ धुवून त्यांची काळजी घेणे ही सर्वात महत्वाची आणि बेसिक गोष्ट आहे. केस धुताना ते एका विशिष्ट पद्धतीनेच आपण धुतो. सर्वप्रथम तेलाने मसाज करुन मग शक्यतो दुसऱ्या दिवशी आपण केस धुतो. केस धुताना आधी आपण शॅम्पूने केस स्वच्छ धुवून घेतो. त्यानंतर केसांना कंडिशनर लावून ते किमान २ ते ५ मिनिटे ठेवतो आणि मन स्वच्छ पाण्याने केस धुतो. सगळेचजण बहुदा केस धुण्यासाठी अशाच पद्धतीचा वापर करतात. परंतु आपल्याला 'रिव्हर्स हेअर वॉशिंग' पद्धतीबद्दल माहिती आहे का ? केस धुताना ते कसे धुवावेत, स्कॅल्पवर शॅम्पू कसा लावावा, कंडिशनरचा वापर कसा करावा, केस कसे कोरडे करावे याबाबत योग्य माहिती असेल तर आपल्याला केसांच्या समस्या कमी जाणवतात. म्हणूनच केस धुण्याची एक परफेक्ट पद्धत लक्षात ठेवा, ज्याला 'रिव्हर्स हेअर वॉशिंग' असे म्हटले जाते(What is reverse hair washing? Here is all you need to know about this trending haircare technique).

'रिव्हर्स हेअर वॉशिंग' (Reverse Hair Washing) म्हणजे नेमकं काय ? 

सर्वप्रथम केस पाण्याने ओले करुन घ्यावेत. त्यानंतर केसांना शॅम्पू लावण्याऐवजी आधी कंडिशनर लावून घ्यावे. डोक्यावरील केसांच्या आतील भाग अर्थात स्कॅल्प वर कंडिशनर न लावता, केसांच्या मध्य भागांपासून ते खालच्या टोकांपर्यंत कंडिशनर लावून घ्यावे. केसांवर कंडिशनर काही मिनिटे तसेच ठेवून द्यावे. केसांवर कंडिशनर काही मिनिटे तसेच ठेवल्याने केस कंडिशनरमधील पोषक तत्त्व शोषून घेतील. त्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत. आता केसांवरील कंडिशनर धुतल्यानंतर आपल्या आवडत्या सल्फेट - फ्री शँम्पूने केस स्वच्छ धुवून घ्यावेत. अशाप्रकारे केस धुतल्याने केस व्यवस्थित स्वच्छ धुतले जातील. सर्वसाधारणपणे, आपण केस धुताना सर्वात आधी केसांना शॅम्पू लावून ते स्वच्छ धुतो आणि त्यानंतर केसांना कंडिशनर लावून कंडिशनिंग करतो. परंतु 'रिव्हर्स हेअर वॉशिंग' (Reverse Hair Washing) पद्धतींमध्ये केसांना शॅम्पू लावण्याआधी कंडिशनर लावून कंडिशनिंग करुन घ्यावे लागते. केस धुण्यासाठी शॅम्पू आधी कंडिशनर वापरुन केस या उलट पद्धतीने धुण्याच्या पद्धतीला 'रिव्हर्स हेअर वॉशिंग' (Reverse Hair Washing) असे म्हटले जाते. 

'रिव्हर्स हेअर वॉशिंग' ही पद्धत नेमकी कोणत्या प्रकारचे केस धुण्यासाठी उपयुक्त ठरते ?

'रिव्हर्स हेअर वॉशिंग' पद्धतीने केस धुतल्याने केसांना योग्य ती चमक मिळून, केस मजबूत व केसांची वाढ लवकर होते. 'रिव्हर्स हेअर वॉशिंग' आपल्या  केसांना निरोगी ठेवण्यास प्रोत्साहन देते. त्याचबरोबर स्कॅल्पचे आरोग्य संतुलित आणि हायड्रेट करण्याबरोबरच केसांची व्हॉल्यूम वाढवण्यास मदत करते. परंतु सर्व प्रकारच्या चांगल्या गोष्टी या सगळ्यांसाठीच चांगल्या असतीलच असे नाही. जर आपले केस कोरडे, रुक्ष, निस्तेज झाले असल्यास केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी आपण 'रिव्हर्स हेअर वॉशिंग' (Reverse Hair Washing) पद्धतीचा वापर करु शकता.  

अप्पर लिप्स करताना खूप दुखते, रॅश येते? ५ टिप्स- न दुखता करता येतील अप्पर लिप्स...

रिव्हर्स हेअर वॉशिंगमध्ये सर्वात आधी केसांवर कंडिशनर लावलं जातं आणि मग शॅम्पू केलं जातं. यामुळे केस स्वच्छ तर होतातच पण केसांवर कंडिशनरचा कोट लावलेला असल्यामुळे शॅम्पूमधील हार्श केमिकल्स केसांचे नुकसान करू शकत नाहीत. ज्या लोकांनी केसांवर केमिकल ट्रिटमेंट केलेली आहे किंवा  केसांना हेअर मशीनद्वारे हिट देऊन स्टायलिंग केलं आहे अशा लोकांसाठी हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे या नव्या पद्धतीने केस धुतल्यास तुमच्या केसांमध्ये खूप चांगले बदल नक्कीच दिसू शकतात.

ज्यांचे केस अति प्रमाणात कोरडे, तेलकट, पातळ अथवा फ्रिझी असतील अशा लोकांनी रिव्हर्स हेअर वॉशिंग करणे नक्कीच फायद्याचे ठरेल. केसांवर निरनिराळ्या प्रकारच्या केमिकल ट्रिटमेंट केल्यावर केसांना उष्णता देऊन स्टाईल केल्यावर ही पद्धत वापरल्यास केस जास्त निरोगी आणि बाऊन्सी दिसतील. शहरातील दूषित वातावरणात राहणाऱ्या प्रत्येकीने केसांची निगा राखण्यासाठी ही पद्धत वापरावी. केसांना कलर केल्यावर केस कोरडे पडू नयेत यासाठी तुम्ही नियमित रिव्हर्स हेअर वॉशिंग करू शकता.

Web Title: What is reverse hair washing? Here is all you need to know about this trending haircare technique

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.