Join us  

स्किन फास्टिंग म्हणजे काय? त्वचेचा उपवास धरून चेहरा होईल का तुकतुकीत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2023 7:17 PM

Know About Skin Fasting & Its Benefits स्किन फास्टिंगचा सध्या ट्रेण्ड सुरू आहे. ही प्रोसेस कशी फॉलो करावी पाहा..

माणसं श्वास घेण्यासाठी नाकाचा वापर करतात. त्याचप्रमाणे आपली त्वचा देखील श्वास घेते हे तुम्हाला माहीती आहे का? त्वचेची निगा राखण्यासाठी आपण अनेक महागड्या प्रोडक्ट्सचा वापर करत असतो. त्वचेला तुकतुकीत आणि चमकदार बनवण्यासाठी हे प्रोडक्ट्स कामी येतात. मात्र, चेहऱ्यावर काही न लावता देखील त्वचेवर चमक आणू शकता. ते ही स्किन फास्टिंगच्या मदतीने. आता आपल्याला प्रश्न असा पडला असेल की, फास्टिंग आपण उपवासाला म्हणतो. त्या दिवशी आपण दिवसभर न खाता दिवस काढतो. त्याचप्रमाणे त्वचेच्या बाबतीत देखील नैसर्गिक पद्धतीने फास्टिंग करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेला स्किन फास्टिंग असे म्हणतात. ही पद्धत त्वचेला डिटॉक्स करण्यास मदत करते.

स्किन फास्टिंग म्हणजे काय?

स्किन फास्टिंग म्हणजे नियमित स्किन केअरमधून ब्रेक देणे. या प्रक्रियेत त्वचा जास्त क्षमतेनं स्वतःची दुरुस्ती करणं सुरू ठेवते. या प्रक्रियेत आपल्याला एक दिवस, एक आठवडा किंवा एक महिना रोजचे स्किन केअर प्रॉडक्ट्स वापरणं थांबवावे लागेल, याने त्वचा नैसर्गिक पद्धतीनं दुरुस्त होईल. यात त्वचा स्वतःचं नैसर्गिक तेल सोडते आणि स्वतःला दुरुस्त करते.

एक्सपर्टचे म्हणणे जाणून घ्या

तज्ञांच्या मते, कोणत्याही त्वचेच्या उत्पादनांचा वापर पूर्णपणे बंद करू नये, कारण आपल्या त्वचेला उत्पादनांची सवय लागली असते. प्रोडक्ट्सचा वापर बंद केल्यामुळे मुरुम आणि डागांची समस्या उद्भवू शकते. अशा परिस्थितीत क्रिमची सहाय्यता घ्या. आपल्या त्वचेला पुरेशा प्रमाणात पोषक तत्वांची गरज असते. यासाठी नाईट क्रीम लावा याने दिवसा त्वचेला झालेले नुकसान भरून काढण्याचे काम करेल.

स्किन फास्टिंगची प्रोसेस फॉलो करा

या प्रक्रियेचे अनुसरण करण्यासाठी आपण दोन पद्धतींचा वापर करून पाहू शकता. तुम्ही सीरम, टोनर, क्लिंझर, मॉइश्चरायझर आणि स्क्रबिंग सारखी उत्पादने हळूहळू वापरणे बंद करू शकता.  याशिवाय त्वचेसाठी रोज सनस्क्रीन वापरणे आवश्यक. कारण सूर्यप्रकाशामुळे चेहऱ्याला हानी पोहचू शकते. त्यामुळे या काळात सनस्क्रीनचा वापर करून पाहा. यासह क्लिन्जर, सनस्क्रीन, डे क्रीम आणि नाइट क्रीमचा वापर करणं गरजेचं आहे.

टॅग्स :त्वचेची काळजीहोम रेमेडी