Lokmat Sakhi >Beauty > चेहरा तुम्ही रोज साधारण किती सेकंद धुता ? ६० सेकंद चेहरा धुण्याचे फायदे, नवा ट्रेण्ड म्हणतोय...

चेहरा तुम्ही रोज साधारण किती सेकंद धुता ? ६० सेकंद चेहरा धुण्याचे फायदे, नवा ट्रेण्ड म्हणतोय...

Beauty Trend : 60-Second Rule for Washing Your Face ? : आपण साधारण किती सेकंद चेहरा धुतो हे काही आपण मोजत नाही पण १५-२० सेकंदच धूत असाल तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2023 08:11 PM2023-08-25T20:11:49+5:302023-08-25T20:33:15+5:30

Beauty Trend : 60-Second Rule for Washing Your Face ? : आपण साधारण किती सेकंद चेहरा धुतो हे काही आपण मोजत नाही पण १५-२० सेकंदच धूत असाल तर...

What is the 60-second rule in skincare and does it work for everyone ? | चेहरा तुम्ही रोज साधारण किती सेकंद धुता ? ६० सेकंद चेहरा धुण्याचे फायदे, नवा ट्रेण्ड म्हणतोय...

चेहरा तुम्ही रोज साधारण किती सेकंद धुता ? ६० सेकंद चेहरा धुण्याचे फायदे, नवा ट्रेण्ड म्हणतोय...

आजकाल बाजारांत असे अनेक ब्यूटी प्रॉडक्ट्स आले आहेत. जे काही मिनिटांत किंवा सेकंदात गोरेपणा, काळे केस, स्वच्छ चमकदार पांढरेशुभ्र दात मिळवून देण्याचा दावा करतात. आपण आजवर अनेक जाहिराती पहिल्या असतील ज्यात, ग्लोइंग स्किन फक्त १० मिनिटात, केसगळती थांबते आठवड्याभरात, डोळ्यांखालील डार्क सर्कल्स जातील महिन्याभरात असे ठोस १००% खात्री देऊन सांगितले जाते. आपणही या जाहिराती वारंवार टिव्हीवर बघून हे प्रॉडक्ट्स विकत घेण्यासाठी तितकेच उत्सुक असतो. पण हे प्रॉडक्ट्स विकत आणल्यावर वापरुन पाहिल्यावर खरचं असं होत का हो ? 

अमुक एका कालावधीत आपल्या सौंदर्यात असा फरक दिसेल असे आपण मानून त्यावर विश्वास ठेवतो. आपली त्वचा गोरीपान, सुंदर, मुलायम हवी असं प्रत्येकाला वाटत असत आणि यासाठी आपण अनेक उपायांचा वापर करतो. त्वचेचे सौंदर्य वाढावे म्हणून आपण महागडे साबण, फेसवॉश, फेसपॅक याशिवाय कोणी सांगितलेले उपाय, नवनवीन ट्रेंड फॉलो करत असतो. सध्या सोशल मीडियावर अशाच एका ट्रेंडची फारच चर्चा होताना दिसत आहे.(Everything you need to know about the viral 60-second rule in skincare) हा ट्रेंड आहे ६० सेकंदांपर्यंत आपला चेहरा धुण्याच्या, या ट्रेंडमध्ये नेमकं आहे तरी काय ते पाहूयात(What is the 60-second rule in skincare and does it work for everyone ?).

चेहरा धुण्यासाठी ६० सेकंदाचा नियम काय आहे ?

चेहरा धुण्यासाठी ६० सेकंदांचा नियम असे सांगतो की, आपण आपला चेहरा स्वच्छ करताना नेहमीच्या १५ ते २० सेकंदांसाठी हातांच्या बोटांनी चोळून चेहरा धुतो. परंतु या नव्या ६० सेकंदांच्या नियमानुसार चेहरा धुताना तो केवळ १५ ते २० सेकंदात न धुता संपूर्णपणे ६० सेकंदांपर्यंत धुतला पाहिजे. ६० सेकंदांपर्यंत (60 Second Rule) चेहरा धुण्याची ही पद्धत LABeautyologist च्या नायमका रॉबर्ट्स - स्मिथ (beautyologist and aesthetician Nayamka Robert-Smith) यांच्याकडून आली आहे. चेहरा धुण्याचा हा ६० सेकंदांचा नियम इतका स्पष्ट आणि मूलभूत वाटत असला तरी तो आपल्या त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. सोशल मीडियावर हा चेहरा धुण्याचा ६० सेकंदांचा नियम इतका चर्चेत आला आहे की त्याने #60secondrule हा हॅशटॅग मिळवला आहे.

चॉकलेट खा आणि चेहऱ्यालाही लावा ! १ चमचा कोको पावडर आणेल चेहऱ्यावर चमचमता आनंदी ग्लो...

ग्लिसरीनमध्ये घाला स्वयंपाकघरातल्या ४ गोष्टी फक्त १ चमचा, आणि बघा चेहरा चमकेल - एकही डाग राहणार नाही...

या ६० सेकंदांच्या नियमांबद्दल अधिक बोलताना नायमका रॉबर्ट्स - स्मिथ सांगतात, चेहरा धुताना आपण शक्यतो कोणत्याही प्रकारचे फेसवॉश किंवा क्लिंजर वापरतो. फेसवॉश किंवा क्लिंजर जेव्हा आपण बोटांनी आपल्या त्वचेला लावतो, तेव्हा ६० सेकंद स्वच्छ केल्याने क्लीन्सरमधील घटक प्रत्यक्षात काम करू शकतात. जेव्हा आपण पूर्ण मिनिटभर आपला चेहरा स्वच्छ करता, तेव्हा फेसवॉश किंवा क्लिंजरला त्वचेच्या आतील थरात खोलवर जाण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो, ज्यामुळे अस्वच्छता, घाण आणि त्वचेला चिकटलेली इतर अशुद्धता प्रभावीपणे काढून टाकली जाते.

नाकातील केस काढावे का? संसर्ग होण्याचा गंभीर धोका, नाक सांभाळा, फॅशनच्या नावाखाली जीवाशी खेळ...

१ चमचा सालीची मुगडाळ आणि ५ फेसपॅक, चेहऱ्यावर चमक हवी तर करा १० मिनिटांचा सोपा उपाय...

स्किनकेअर उत्पादन प्रभावीपणे शोषून घेण्यासाठी आणि त्वचेत बदल घडवून आणण्याच्या प्रक्रियेला किकस्टार्ट होण्यासाठी संपूर्ण ६० सेकंद लागतात. पुढे त्या म्हणतात बहुतेकजण केवळ १५ सेकंदच आपला चेहरा धुतात. परंतु याउलट जर आपण ६० सेकंद चेहरा धुतल्यास त्वचा मऊ, मुलायम होते तसेच त्वचेचा एकूणच पोत सुधारण्यास मदत होते. ६० सेकंदांचा नियम बनवण्यामागे आपण आपली त्वचा पूर्णपणे स्वच्छ करत आहात याची खात्री करणे ही त्यामागची कल्पना आहे. ६० सेकंदांसाठी फेसवॉश किंवा क्लिंजरने चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज केल्यास आपण त्वचेतील जास्तीचे तेल, धूळ आणि ऍलर्जीपासून मुक्त होऊ शकतो. नायमका रॉबर्ट्स - स्मिथ हिने नमूद केले की ही पद्धत "जे मेकअप करतात त्यांच्यासाठी, मेकअपच्या केमिकल्सयुक्त, रासायनिक घटकांपासून मुक्त होण्याचा हा एक चांगला मार्ग आहे ज्यामुळे त्वचेच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या उद्भवण्याचा प्रश्नच येत नाही.  

चमचाभर गव्हाच्या पिठाची जादू, त्वचा दिसेल यंग व ग्लोइंग ! तजेलदार त्वचेसाठी इन्स्टंट फेसपॅक...

ही पद्धत सर्व प्रकारच्या त्वचेसाठी योग्य आहे का ? 

त्वचेचे सर्वच प्रकार हे एकसारखे नसतात. प्रत्येकाची त्वचा ही वेगवेगळी असते. प्रत्येक प्रकारच्या त्वचेचा क्लिंजिंग टाइम हा वेगळा असतो. प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी ही पद्धत योग्य असेलच असे नाही. ६० सेकंदांचा हा नियम आपल्या त्वचेसाठी वापरताना आपली त्वचा कशी प्रतिक्रिया देते हे बारकाईने पाहावे. या पद्धतीचा वापर केल्याने जर त्वचा लाल होणे, खाज सुटणे किंवा कोरडी वाटत असेल, तर ही पद्धत आपल्यासाठी योग्य नाही. अशावेळी आपण २० ते ३० सेकंदांपर्यंत एखाद्या सौम्य फेसवॉश किंवा क्लिंजरचा वापर करून चेहरा स्वच्छ करावा. खूप कोरडी किंवा संवेदनशील त्वचा असणाऱ्यांनी या पद्धतीचा वापर करू नये.

Web Title: What is the 60-second rule in skincare and does it work for everyone ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.