तूप हे दुधापासून तयार होत असल्यामुळे दुधामधील अ, ड, ई, क ही जीवनसत्त्वे स्निग्ध पदार्थात विरघळणारी असल्यामुळे ती आपोआपच तुपात येतात. आपल्या भारतीय जेवणात तुपाला फार महत्व आहे. वरण भात, पुरणपोळी, मोदक, खिचडी या पदार्थांची तूपाशिवाय आपण अजिबातच कल्पना करू शकत नाही. तूप म्हणजे आहारातील महत्त्वाचा भागच आहे. प्रत्येक भारतीय घरात तुपाला जेवणात प्रथम प्राधान्य दिले जाते. दिवसभरातून एक ते दोन चमचा तूप खाणं हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या त्वचेसाठी तर याचा अप्रतिम फायदा मिळतो.
तूप हे पूर्वीपासूनच मानवी शरीरासाठी अत्यंत गुणकारी मानले जाते. तुपाचा वापर आपण रोजच्या जेवणाबरोबरच आपल्या त्वचेचे सौंदर्य राखण्यासाठी देखील केला जातो. आयुर्वेदानुसार तुपाचा औषध म्हणून देखील वापर केला जातो. तुपामध्ये अनेक उपयुक्त पोषक घटक असतात. रोज तूप खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते, हाडे मजबूत होतात, डोळ्यांचे व त्वचेचे आरोग्य सुधारते. अस्सल तूप हे आपल्या शरीरातील आरोग्य सुधारण्यापासून ते त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी फारच फायदेशीर ठरते. या तुपाचा आपण वेगवेगळ्या पद्धतीने वापर करत आलो आहोत, तुपाने पायांच्या तळव्यांचा मसाज केल्यावर त्याचा आपल्या आरोग्याला खूपच फायदा होतो. बहुतेक लोक त्वचा सुंदर आणि फ्रेश आणि टवटवीत दिसण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय करताना दिसतात. पण वेगवेगळे उपाय करूनही हवा तसा ग्लो मिळत नाही. पण तुम्हाला माहितीये का की आपल्या पायाच्या तळव्यांचं आणि चेहर्याचं खास कनेक्शन आहे. पायाच्या तळव्यामुळे आपल्या चेहर्यावर ग्लो येण्यास मदत होते. आता ते कसं? याबाबत आपण जाणून घेणार आहोत(What is the benefit of rubbing ghee on the feet as per Ayurveda).
पायांच्या तळव्यांना तुपाने मसाज करण्याचे फायदे :-
१. जर आपण चेहऱ्यावरील काळे डाग, सुरकुत्या आणि कोरड्या त्वचेने त्रस्त असाल तर तळव्यांना तूप लावून मसाज करावा. रात्री झोपताना तळव्यांना तूप लावून मसाज केल्याने काही दिवसात या सर्व समस्यांपासून मुक्ती मिळेल.
२. आपल्याला जर रात्री झोप येत नसेल किंवा झोपेसंदर्भात काही समस्या असतील तर अशावेळी रात्री झोपताना पायाला थोडेसे तूप चोळून मसाज करावा. पायांना तुपाने मसाज केल्यामुळे पायांच्या नसा मोकळ्या होऊन तळव्यांना व पायांना आराम मिळतो.
३. ज्या व्यक्तींना रात्री झोपेत खूप घोरण्याची सवय असते अशा व्यक्तींनी देखील रात्री झोपताना तळव्यांना तूप लावून मसाज केल्यास हळूहळू त्यांच्या घोरण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.
फेशियल केल्यानंतर लगेच चेहऱ्यावर वाफ घेण्याचे ४ फायदे, मिळवा चमकदार सुंदर ग्लो...
सतत होणाऱ्या केस गळतीमुळे हैराण ? खोबरेल तेलाचा घरगुती हेअर मास्क वाढवेल केसांचे सौंदर्य...
४. दिवसभरातून किमान १ ते २ चमचे तूप अन्नपदार्थातून घेतल्यास आपली पचनक्रिया सुधारते तसेच पोटाला थंडावा मिळून रात्री शांत गाढ झोप लागण्यास मदत होते.
५. अस्सल देशी तूप पायावर चांगले चोळून मालिश करावे जोपर्यंत पायावरील तूप चांगले सुकत नाही तोपर्यंत ते पायांवर रगडून घ्यावे. यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. जर आपण हा उपाय रोज करायला सुरुवात केली तर महिन्याभरातच त्याचा परिणाम दिसून येईल.
६. जर आपण दररोज झोपण्याअगोदर पायाला तूप लावत असाल तर तुमचा तणाव दूर होईल आणि तुमच्या मनाला शांती मिळेल.
मेहेंदी लावताय की केमिकल लावताय केसांना? पाहा घरी ‘कशी’ भिजवायची मेहेंदी-केस काळेभोर...
तुपाने पायांना मालिश कसे करावे ?
एका वाटीत तूप घ्या आणि ते तूप तुमच्या पायाला लावा. त्यानंतर तुमचे पाय गरम होईपर्यंत तुपाने मालिश करत रहा. काही दिवस हा उपाय सातत्याने करत राहिला तर आपल्याला नक्कीच फरक जाणवेल. तुपाऐवजी आपण कोकोनट ऑइल किंवा कोकम बटरचा देखील मालिशसाठी वापर करू शकता.