Join us  

सकाळचा नाश्ता किती वाजता करावा? पाहा नाश्ता करण्याचं परफेक्ट टायमिंग-वजन कमी होईल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 4:06 PM

What Is The Best Time To Eat Breakfast : नाश्ता केल्याने तुम्हाला दिवसभरातील इतर कामं करण्याचेही प्रोत्साहन मिळते.

नाश्ता (Breakfast) हा दिवसभरातील सर्वात महत्वपूर्ण आहारापैकी एक आहे. नाश्ता केल्याने शरीराला दिवसभराची उर्जा मिळते आणि कोणतंही काम करण्यासाठी शरीर तयार राहते. (Health Tips)हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते सकाळचा नाश्ता हा खूप महत्वाचा मानला जातो. (Perfect Timing As Per Dietitian And Study Eating Time Schedule) नाश्ता केल्याने तुम्हाला दिवसभरातील इतर कामं करण्याचेही प्रोत्साहन मिळते. ज्यामुळे मेटाबॉलिझ्म बुस्ट होतो. ब्लड शुगर, लठ्ठपणा नियंत्रणात राहण्यास मदत होते. म्हणूनच रोज न चुकता नाश्ता करायला हवा. (Right Time For Breakfast)

२०२१ मध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार रोज ब्रेकफास्ट केल्याने हृदयाचे विकार, डायबिटीस, स्ट्रोक, लठ्ठपणाचा धोका अनेकपटीने कमी होतो. (Ref) जे लोक ब्रेकफास्ट करत नाहीत त्यांच्यात कॅल्शियम, आयर्न,  व्हिटामीन ए,व्हिटामीन बी-१, व्हिटामीन सी, व्हिटामीन डी ची कमतरता भासते. नाश्ता स्किप केल्यामुळे रक्तीतील ग्लुकोजच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होते. म्हणूनच नाश्ता करणं आवश्यक आहे. 

फोर्ब्सच्या अहवालानुसार ब्रेकफास्ट स्किप केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकता. ज्यात स्ट्रेस, थकवा, लठ्ठपणा, डायबिटीस या लक्षणांचा समावेश आहे.  सकाळी नाश्ता वेळेवर न केल्यास हॉर्मोन्स कंफ्यूज होतात. ज्यामुळे दिवसभर लोक ओव्हरइटींग करतात. म्हणूनच आहारातज्ज्ञ वेळेवर नाश्ता करण्याचा सल्ला देतात. ब्रेकफास्ट वेळेवर करायला हवा. सकाळी उठल्यानंतर  2 तासांच्या आत नाश्ता करावा.  ज्यामुले मेटाबॉलिझ्म चांगला राहतो. 

उन्हाळ्यात ताक पिण्याची योग्य वेळ कोणती? ताक कसं-कधी प्यावं? ताकाचे फायदे हवे तर..

नाश्ता करण्यासाठी  योग्यवेळ कोणती? (What Is The Best Time To Eat Breakfast)

जर तुम्ही सकाळी ५ वाजता उठत असाल तर संध्याकाळी ७ पर्यंत नाश्ता करायला हवा. जर  ७ ला उठत असाल तर ९ पर्यंत नाश्ता करावा. तुम्ही  सकाळी जिमला जात असाल  तर वर्कआऊटच्या  २० ते ३० मिनिटं आधी केळी, एवोकॅडो टोस्ट अशा पदार्थांचा आहारात समावेश करा. जीमला जाऊन आल्यानंतरही तुम्ही नाश्ता करू शकता. 

रात्रीच्या जेवणबद्दल बोलायचं झालं तर झोपण्याच्या कमीत  २ ते ३ तास आधी रात्रीचं जेवण करायला हवं रात्रीचं जेवण  १० च्या आधी घ्यावे. असं केल्याने शरीराची डायजेशन प्रक्रिया चांगली राहते आणि अन्न पचायला पुरेसा वेळ मिळते. कारण  झोपताना आपला मेटाबॉलिक रेट स्लो झालेला असतो. जेवल्यानंतर लगेच झोपल्यामुळे अपचनाची समस्या उद्भवू शकते. 

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यवेट लॉस टिप्स