लग्न असो किंवा वाढदिवस असाे... घरात कोणताही लहानमोठा कार्यक्रम असला तरी बऱ्याच जणी हौशीने फेशियल करून घेतात. कारण कार्यक्रमात आपला चेहरा फ्रेश दिसावा, आपण टापटीप असावं, असं वाटतं. भरपूर पैसे खर्च करून आपण महागडं फेशियल करून येतो. पण कार्यक्रमाच्या दिवशी मात्र चेहऱ्यावर आपल्याला अपेक्षित असतो तसा ग्लो येतच नाही. त्यामुळे मग उगाच फेशियल करून पैसे वाया घालवले की काय असं वाटू लागतं. तुमचंही असंच होत असेल तर कार्यक्रमाच्या नेमकं किती दिवस आधी फेशियल करायला पाहिजे किंवा फेशियल करण्याची योग्य वेळ कोणती याविषयी ब्यूटी एक्स्पर्टनी सांगितलेल्या या टिप्स बघा...(when to do facial for bright glow)
आपण खूपच क्वचितप्रसंगी फेशियल, क्लिनअप करत असू तर चेहऱ्यावर म्हणावा तसा ग्लो लगेच एका फेशियलमध्ये येणार नाही. कारण त्वचेला अधिक पोषणाची गरज असते. त्यामुळे पार्लरला जाणं झालं नाही तरी आठवड्यातून एकदा त्वचेला स्क्रबिंग, वाफ देणं, क्लिझिंग अशा ट्रिटमेंट घरगुती पदार्थ वापरून करायला पाहिजेत.
उष्णतेच्या त्रासामुळे गळून गेलात? आलिया- करिनाची फिटनेस ट्रेनर सांगते २ उपाय- शरीराला मिळेल थंडावा
कार्यक्रमाच्या एक किंवा दोन दिवस आधी फेशियल केलेलं चांगलं. एखाद्या नवरीने लग्नाच्या किती दिवस आधी फेशियल करावं याविषयी आजतक यांनी दिलेल्या वृत्तानुसार ब्यूटी एक्सपर्ट किरण लोहिया असं सांगतात की लग्नाच्या दिवशी चेहऱ्यावर छान चमक येण्यासाठी नवरीने तिच्या लग्नाच्या साधारण ३ ते ४ महिने आधीपासूनच दर २ ते ४ आठवड्यातून एकदा फेशियल करावं. तसेच इतरही काही स्किन ट्रिटमेंट घ्याव्या, जेणेकरून लग्नापर्यंत तिची त्वचा छान तयार होईल आणि लग्नाच्या दिवशी सौंदर्य खुलून येईल.
फेशियल करण्याची योग्य वेळ कोणती?
१. फेशियल केल्यानंतर तुम्हाला कोणतीही धावपळ नसेल, अशा वेळी फेशियल करा. कारण फेशियल करून धावपळ कराल तर शरीर थकेल आणि तो सगळा थकवा चेहऱ्यावर दिसल्याने फेशियलचा उपयोग होणार नाही.
गरोदरपणात चारचौघींसारखेच दीपिका पदुकोनही करतेय काम, फोटो पाहून कुणाला वाटली काळजी-कुणी केली टिका
२. साधारणपणे संध्याकाळी किंवा रात्री फेशियल करा. जेणेकरून फेशियल केल्यानंतर लगेच उन्हात, धुळीत जाऊन चेहरा खराब होणार नाही.
३. फेशियल केल्यानंतर एखादा तास निवांत झोप घ्या. यामुळे चेहरा अधिक छान खुलेल.