कांद्याचा वापर फक्त रडवण्यासाठी आणि फोडणीसाठी होत नसून, याचा वापर केसांच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी देखील होतो. कांद्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म आढळतात. ज्यामुळे केसांच्या अनेक समस्या दूर होतात. परंतु, कांद्याचा योग्य वापर केसांसाठी कसा करावा याची माहिती असणं गरजेचं आहे.
केसांसाठी कांद्याचा चुकीचा वापर केल्यास केसांची समस्या आणखी वाढण्याची शक्यता निर्माण होते. याबाबतीत प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये, कांद्याचा वापर केसांसाठी कसा करावा याची माहिती दिली आहे(What is the right way to apply onion juice to hair? Javed Habib says the 'correct' method).
केसांना कांद्याचा रस कसा लावायचा?
केसांची निगा राखण्यासाठी आपण कांद्याचा वापर करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त कांद्याचा रस काढून थेट केसांना लावायचा आहे. आपल्या केसांना कांद्याचे तेल लावण्याची गरज नाही. फक्त त्याचा रस काढा आणि थेट केसांना लावा.
रोज रात्री झोपताना चेहऱ्याला खोबरेल तेल लावा, ४ समस्यांवर १ उपाय, चेहरा होईल नितळ
कांद्याचा रस केसांवर किती दिवस वापरावा?
जावेद हबीब सांगतात, केसांची समस्या सोडवण्यासाठी आपल्याला, आठ आठवडे सतत केसांना ताज्या कांद्याचा रस लावावा लागेल, याने केसांवर सकरात्मक बदल दिसून येईल.
केसांसाठी कांद्याच्या रसाचे फायदे
१. केस लांब होतात
केसांसाठी कांद्याचे अनेक फायदे आहेत. केसांना कांद्याचा रस लावल्याने, टाळूमधील रक्ताभिसरण सुरळीत होते, व सफ्लर पोर्सला खुले करते. ज्यामुळे केसांना अनेक पोषक तत्वे मिळतात, व केसांची वाढ होते. याशिवाय केसांच्या मुळांमधून हायड्रोजन पेरॉक्साइड कमी करते, त्यामुळे केस पांढरे होत नाहीत.
चमचाभर मेथीचे दाणे -मूठभर कडीपत्ता! दोनच गोष्टी वापरा, केस होतील घनदाट -चमकदार
२. केस गळती व कोंड्याची समस्या कमी करतात
केसगळती व कोंड्याच्या समस्येपासून त्रस्त असाल तर, केसांना कांद्याचा रस लावा. कांद्यामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आढळतो, जे कोंडा निर्माण करणार्या बॅक्टेरियांना कमी करते, व टाळू साफ करण्यास मदत करते. यासह केसांना आवश्यक अँटिऑक्सिडंट्स देते, ज्यामुळे केस गळणे कमी होते.