Join us  

प्रिटी झिंटाप्रमाणेच हिमाचल प्रदेशच्या बहुतांश लोकांची त्वचा असते गुलाबी- चमकदार! बघा त्यामागचं सिक्रेट.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2024 1:33 PM

Secret Behind Preity Zinta's Pinkish Glowing Skin: हिमाचल प्रदेश, काश्मीर या भागातल्या बहुतांश लोकांच्या त्वचेवर एक छानशी गुलाबी चमक असते. बघा त्यामागचं काय आहे खास कारण... 

ठळक मुद्देतिथलं वातावरण हा त्यांच्या त्वचेच्या सौंदर्यामागचा एक मुख्य भाग असला तरी काही खाण्यापिण्याच्या पद्धतींचाही परिणाम त्यांच्या त्वचेवर दिसून येतो.

अभिनेत्री प्रिटी झिंटा ही अशी एक अभिनेत्री आहे जिच्या चेहऱ्यावरच्या दोन गोष्टी बघताक्षणीच तुम्हाला आकर्षित करून घेतात. त्यापैकी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तिच्या गालावरची गोड खळी आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिच्या चेहऱ्यावर असणारी गुलाबी चमक. प्रिटी झिंटा आहे मुळची हिमाचल प्रदेशची. आता तिथल्या लोकांमध्ये एक समान गोष्ट आढळून येते ती म्हणजे त्या लोकांच्या त्वचेवर असणारा गुलाबी चमकदारपणा.. तिथल्या लोकांचे वय वाढले तरी त्यांची त्वचा अगदी तरुण आणि तुकतुकीत दिसते. हिमाचल प्रदेशच नाही तर कोणत्याही पहाडी भागातल्या लोकांची त्वचा अशाच पद्धतीची असते (how to get beautiful skin like Preity Zinta). तिथलं वातावरण हा त्यांच्या त्वचेच्या सौंदर्यामागचा एक मुख्य भाग असला तरी काही खाण्यापिण्याच्या पद्धतींचाही परिणाम त्यांच्या त्वचेवर दिसून येतो. त्या नेमक्या कोणत्या ते पाहा...(what is the secret of preity zinta's pinkish glowing skin)

 

हिमाचल प्रदेशच्या किंवा कोणत्याही बर्फाच्छादित पहाडी भागातल्या मंडळींची त्वचा गुलाबी, चमकदार कशी याविषयीची माहिती सांगणारा एक व्हिडिओ fashionwithfahad या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा उपाय केल्याने तुमच्या त्वचेचा पोत सुधारण्यास नक्कीच फायदा होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त त्वचाच नाही तर आरोग्यासाठीही हा उपाय गुणकारी आहे. 

पांढऱ्याशुभ्र कपड्यांवर रंगाचे डाग पडले? फक्त २ पदार्थ लावा, डाग पुर्णपणे गायब होतील... 

त्वचेवर छान नॅचरल, गुलाबी ग्लो पाहिजे असेल तर ३ ते ४ चमचे डाळिंबाचे दाणे, लहान आकाराचे अर्धे बीट, मध्यम आकाराचे अर्धे गाजर आणि एक किंवा अर्धा टोमॅटो हे सगळे पदार्थ एकत्र करून मिक्सरमधून बारीक करून घ्या आणि त्यात थोडं पाणी टाकून तो ज्यूस दररोज प्या, असं या व्हिडिओमध्ये सुचवलं आहे.

 

हे सगळेच पदार्थ शरीरातील लोह वाढविणारे आहेत. लोह वाढले की आपोआपच त्वचा चमकदार, तजेलदार दिसू लागते.

मुलांची हाडं होतील दणकट आणि शरीर पोलादी, फक्त ५ सवयी लावा, मुलं होतील सुदृढ, सशक्त

व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेल्या दुसऱ्या उपायानुसार तिथले लोक दररोज एक चमचा मधावर थोडीशी कलोंजी टाकून खातात. हे दोन्ही पदार्थ केस, त्वचा आणि एकंदरीतच आरोग्यासाठी पोषक असतात. व्हिडिओमध्ये सांगितलेले सगळेच पदार्थ पौष्टिक आहेत. त्यामुळे काही दिवस हे दोन्ही उपाय करून पाहायला हरकत नाही. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सप्रीती झिंटात्वचेची काळजीहोम रेमेडी