Join us  

सिल्कच्या साडीवर कोणते दागिने घालायचे? सणावाराला सिल्की ट्रॅडिशनल लूक हवा, 'असे' निवडा परफेक्ट दागिने..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2021 4:01 PM

नवरात्री म्हणजे महिलांच्या आनंदाला उधाण. या दिवसात महिला हमखास साडी नेसतात. नवरात्रीच्या नऊ दिवसात एकदा तरी साडी नेसली जातेच. मग सिल्कची साडी घातल्यावर दागिन्यांची निवड कशी करायची, हा प्रश्न देखील अनेक जणींना हैराण करतो.

ठळक मुद्देसिल्कची साडी नेसल्यावर जर दागदागिन्यांची निवड परफेक्ट केली तर तुम्ही नक्कीच स्टाईलिश आणि ग्लॅमरस दिसू शकाल. 

नवरात्रीचे नऊ दिवस महिलांची अगदी लगबग सुरू असते. यासोबत तरूणींचा उत्साहही काही कमी नसतो. नवरात्रीच्या नऊ दिवसात कुठेही जायचे असले तरी अगदी प्रत्येक दिवशीचा जो रंग आहे, त्यानुसार ड्रेस, साडीचा रंग ठरवून कपडे घातले जातात. कपाटात पडून असलेल्या साड्यांना नवरात्रीच्या निमित्ताने नक्कीच थोडी बाहेरची हवा मिळते. कपाटातल्या अनेक सिल्कच्या साड्या या दिवसांत बाहेर येतात. सिल्कची साडी नेसल्यावर त्यावर हमखास पारंपरिक सोन्याचे दागिणे घातले जातात. सिल्कच्या साडीवर पारंपरिक दागिने निश्चितच छान दिसतात. पण असा लूक तुम्हाला एकदम ट्रॅडिशनल टच देतो.

 

सिल्कची साडी नेसून जर तुम्ही पारंपरिक पद्धतीने दागिणे घालून सजलात, तर नक्कीच एखाद्या लग्नाला जात आहात की काय असे वाटू शकते. म्हणूनच तर असा जुन्या पद्धतीचा मेकअप थोडा बाजूला ठेवा आणि नवरात्रीत सिल्क साडी नेसल्यावर जरा ट्रेण्डी लूक येईल असा मेकअप करा. सिल्कची साडी नेसल्यावर जर दागदागिन्यांची निवड परफेक्ट केली तर तुम्ही नक्कीच स्टाईलिश आणि ग्लॅमरस दिसू शकाल. 

 

सिल्कच्या साडीवर घाला असे दागिणे१. लांब गळ्यातलं नकोतुम्हाला अगदी ट्रॅडीशनल लूक हवा असेल, तर सिल्कच्या साडीवर नक्कीच लांब गळ्यातलं घाला. पण आपण थोडं ट्रेण्डी दिसावं असं वाटत असेल तर सिल्कच्या साडीवर लांब गळ्यातलं घालणं टाळा. सिल्कच्या साडीवर गळाबंद चोकर घातला तर तुमचा लूक एकदमच बदलून जाईल. पण चोकर हा खुलवट आणि ब्रॉड असेल याची काळजी घ्या. बारीकसा चोकर सिल्क साडीवर उठून दिसणार नाही. चोकर घातल्यावर कानातले अगदी लहानसे घाला. 

 

२. लांब कानातले घालाज्या सिल्कच्या साड्यांचे काठ मोठे आहेत, अशा साड्या नेसल्यावर गळ्यात काही घालू नका. कारण मोठ्या काठांवर गळ्यात काही घातले तर ते फार शोभून दिसत नाही. शिवाय तो लूक अगदीच टिपिकल होऊन जातो. त्यामुळे अशी मोठ्या काठांची सिल्कची साडी असेल तर गळ्यात काहीही घालू नका. कानात मात्र नक्कीच लांब झुबे घाला. अगदी मानेपर्यंत लाेंबकळणारे कानातले देखील छान दिसतात.

३. स्लिव्हलेस ब्लाऊज मस्त दिसेलसिल्कच्या साडीवर मोठ्या बाह्यांचे ब्लाऊज छान दिसतात. पण जर तुम्हाला टिपिकल लूक टाळून ट्रेण्डी टच हवा असेल, तर सिल्कच्या साड्यांवर स्लिव्हलेस ब्लाऊज घाला. यामध्ये तुम्ही निश्चितच ग्लॅमरस दिसाल. 

 

४. गळाबंद ब्लाऊजसिल्कच्या साडीवर जर बंद गळ्याचे किंवा स्टॅण्ड कॉलर ब्लाऊज शिवले तर ते खूपच आकर्षक दिसते. स्लिम, उंच मुलींना तर अशा प्रकारचे ब्लाऊज आणि सिल्क साडी खूपच शोभून दिसते. त्यामुळे यंदाच्या नवरात्रीत असा हटके लूक एकदा नक्कीच ट्राय करून पहा. गळाबंद ब्लाऊज घातल्यानंतर त्यावर लाँग इअरिंग्ज छान दिसतात. किंवा अंबाडा घालून छोटे कानातले असा लूक देखील त्यावर छान दिसतो. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सनवरात्रीमहिला