Join us  

चेहऱ्याला बर्फाने मसाज करता ? पण ४ गोष्टी चुकल्या तर चेहरा दिसतो विद्रूप - त्वचा होते खराब...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2023 9:30 AM

Apply These 4 Things On Your Face After Using Ice Face Pack : चेहऱ्याला अनेकजणी बर्फ लावतात पण बर्फ लावल्यानंतर त्वचेवर काय लावायचं हे माहिती नसेल तर त्वचा खराब होतेच....

चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी आपण आतापर्यंत कित्येक प्रकारच्या क्रिम्स, फेसवॉश, स्क्रब अशा ब्युटी प्रॉडक्टचा वापर करून पाहिला असेल. यासोबतच आपण आपल्या त्वचेसाठी बाहेरच्या ब्युटी प्रॉडक्टस सोबतच काही घरगुती उपायांचा देखील वापर करतो. या घरगुती उपायांमध्ये मुख्यत्वे करुन आपण बर्फाचा देखील वापर करतो. पार्लरमध्ये किंवा घरी आपण कोणतेही फेशियल, ब्लिच किंवा त्वचेसाठी काही ट्रिटमेंटस घेतल्यानंतर सगळ्यांत शेवटी त्वचेवर बर्फ फिरवतो. या सर्व फायद्यांसोबतच बर्फ हे एक चांगले ब्युटी केअर प्रॉडक्ट देखील आहे. बर्फाचा योग्य वापर केल्यास कित्येक त्वचा विकारांपासून आपली सुटका होऊ शकते. त्वचेसाठी हा एक नैसर्गिक उपाय आहे आणि महत्त्वाचे म्हणजे यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत(Apply These 4 Things On Your Face After Using Ice Face Pack).

चेहऱ्यावर बर्फ लावून मसाज करणे त्वचेसाठी खूपच फायदेशीर मानले जाते. त्वचेसाठी बर्फाचा वापर करण्याचे फायदे अनेक असेल तरीही बर्फाचा चुकीच्या पद्धतीने त्वचेवर वापर केल्यामुळे उलट परिणाम होऊ शकतात. चेहऱ्यावर बर्फ लावल्याने त्वचेला त्याचे अनेक फायदे होतात, पण बर्फाचा चेहऱ्यावर वापर करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. जर आपण जास्त वेळ चेहऱ्यावर फक्त बर्फ लावल्याने त्वचा कोरडी व मृत दिसू शकते. त्यामुळे चेहऱ्यावर बर्फ लावण्यासोबतच इतरही गोष्टी लावाव्यात, त्या नेमक्या कोणत्या ते पाहूयात. 

चेहऱ्यावर बर्फ लावल्यानंतर कोणत्या गोष्टी लावाव्यात ? 

१. एलोवेरा जेल :- एलोवेरा जेल हे त्वचेसाठी खूपच फायदेशीर मानले जाते. चेहऱ्यावर बर्फ लावल्यानंतर एलोवेरा जेल लावल्याने योग्य पोषण आणि चमक मिळू शकते. बर्फ लावल्यानंतर चेहऱ्यावर एलोवेरा जेल लावल्याने चेहरा कोरडा पडणार नाही. चेहऱ्याला एलोवेरा जेलने मसाज केल्यास आपली त्वचा चमकदार होते. यासोबतच त्वचेचा सैलपणा जाऊन त्वचा अधिक घट्ट होण्यासही मदत होते. त्याचबरोबर चेहऱ्यावरील डाग आणि मुरुम दूर करण्यास मदत होते. इतकंच नाही तर त्वचेतील कोलेजन वाढवण्यासही एलोवेरा जेल फायदेशीर ठरते. 

BB क्रिम वापरण्याची योग्य पद्धत माहिती आहे का ? चुकलं तर, क्रिम लावूनही दिसाल भयंकर...

२. व्हिटॅमिन 'सी' सीरम :- व्हिटॅमिन 'सी' त्वचेसाठी खूप चांगले असते. यामुळे त्वचा कायम मऊ राहून पेशी ओलसर राहतात. याशिवाय चेहऱ्यावरील सुरकुत्याही दूर होतात. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमकही येते. व्हिटॅमिन 'सी' सीरम आपल्या त्वचेला मॉइश्चराइज करते आणि ती गुलाबी व चमकदार बनवते. याचा आपण रोज वापर करू शकता आणि लवकरच चमकदार त्वचा मिळवू शकता. त्वचेची काळजी घेण्याच्या घरगुती उपचारांमध्ये आपण व्हिटॅमिन 'सी' देखील अवश्य समाविष्ट करू शकता.

केसांची वाढ खुंटली ? करा ५ सोप्या स्टेप्समध्ये मसाज, केसांच्या वाढीत होईल मदत...

३. गुलाब पाणी :- गुलाबपाणी हे चेहऱ्यासाठी सर्वोत्तम नैसर्गिक सौंदर्य प्रॉडक्ट आहे. यामुळे चेहऱ्याला थंडावा मिळतो आणि तो चमकदार बनतो. हे त्वचेच्या पेशींना आराम देण्यासही मदत करते. बर्फ लावल्यानंतर चेहऱ्यावर गुलाबपाणी लावल्याने आपल्या त्वचेला दुप्पट फायदे मिळतात.  

सततच्या केस गळतीने हताश झालात ? करा सोपा ‘पोटली मसाज’, केस गळणं थांबेल लवकर...

४. मॉइश्चरायझर :- बर्फ लावल्यानंतर चेहऱ्याला चांगल्या मॉइश्चरायझरने मॉइश्चराइज करणे खूप गरजेचे असते. बर्फ लावल्याने त्वचेचे तापमान अचानक कमी होते. अशा स्थितीत मॉइश्चरायझर लावल्याने त्वचेचे तापमान टिकून राहते आणि चेहरा चमकतो. 

त्वचेवर बर्फाचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी ? 

१. चेहऱ्यावर बर्फ लावण्यापूर्वी चेहरा पूर्णपणे स्वच्छ धुवा. असे केल्याने चेहऱ्यावरील घाण व तेल दूर होते. नेहमी स्वच्छ त्वचेवर बर्फाचा तुकडा फिरवावा.

२. चेहऱ्यावर डायरेक्ट बर्फ लावू नका. जर आपण डायरेक्ट बर्फ चेहऱ्यावर फिरवला तर जळजळ झाल्यासारखे वाटू शकते. चेहऱ्यावर बर्फ लावण्यापूर्वी बर्फाचे तुकडे रुमालात बांधून घ्या आणि नंतर त्या कापडाच्या मदतीने चेहऱ्यावर मालिश करा. नुसता बर्फ चेहऱ्यावर फिरवल्यामुळे चेहरा लाल होऊ शकतो. चेहऱ्यावर रॅशही येऊ शकतात.

टोमॅटो-कॉफी-मध साखर; सेलिब्रिटी योग ट्रेनर अंशुका परवानी सांगते खास फेसस्क्रब, चेहऱ्यावर येईल ग्लो...

३. कोरडी त्वचा असलेल्यांनी आठवड्यातून दोनदा त्वचेवर बर्फाने मालिश केली पाहिजे. तर संवेदनशील त्वचा असलेल्यांनी बर्फाच्या तुकड्याने जास्त वेळ चेहऱ्याला मालिश केल्यामुळे त्रास होऊ शकतो.

४. त्वचेवर बर्फ लावताना बर्फ जोरजोरात घासू नका. हळूवारपणे आपल्या त्वचेवर बर्फाने मालिश करा.

टॅग्स :ब्यूटी टिप्स