आपण सगळेच नेहमी आपल्या त्वचेची काळजी घेतो. त्वचेचे आरोग्य आणि सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी आपण अनेक घरगुती उपाय करतो. या घरगुती उपायांमध्ये आपण शक्यतो बऱ्याच नैसर्गिक पदार्थांचा वापर देखील करतो. त्वचेसाठी घरगुती फेसमास्क, स्क्रब किंवा इतर उपाय करताना आपण बेसन, दही, दूध यांसारख्या पदार्थांचा वापर करतो. त्वचेसाठी बेसन, दही, दूध वापरणे ही फार पूर्वीपासूनची परंपरा आहे(What To Add In Besan Milk Or Curd For Skin Benefits Of Applying Besan Pack On Face).
त्वचेसाठी एखादा घरगुती फेसमास्क करायचा म्हटलं की त्यात बेसन पीठ, दही, दुधाचा वापर हा केला जातोच. परंतु त्वचेसाठी बेसन पिठाचा वापर करत असताना त्यात दही, दूध यापैकी नेमका कोणता पदार्थ मिसळून लावणे त्वचेसाठी अधिक फायदेशीर ठरेल, असा प्रश्न पडतो. त्वचेला बेसन पीठ लावताना त्यात दही घालावे की दूध ? त्याचबरोबर त्वचेसाठी दही, दूध यापैकी नेमका कोणता पदार्थ वापरणे योग्य राहील ते पाहूयात.
बेसन पिठात दही की दूध, नेमकं काय मिसळावं ?
१. बेसन पिठात दही मिसळण्याचे फायदे :- त्वेचसाठी बेसन पिठाचा वापर करताना त्यात काहीजण दही मिसळतात. खरंतर, ज्यांची स्किन खूप ऑयली किंवा तेलकट ( Besan & Curd Face Pack Benefits For Oily Skin ) आहे त्यांनी त्वचेसाठी बेसन पिठाचा वापर करताना त्यात दही मिसळणे फायदेशीर ठरेल. चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही बेसन पिठात दही मिसळू शकतात. दह्यामध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला दोन चमचे बेसनामध्ये तीन चमचे दही मिसळून घ्यावे लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण वीस मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. वीस मिनिटानंतर चेहरा पाण्याने धुवा. नियमित बेसन आणि दह्याची पेस्ट चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्याचा रंग आणि पोत सुधारतो. दह्यात लॅक्टिक अॅसिड असते. यामुळे त्वचा ग्लोईंग होऊन मऊ-मॉईश्चराईज आणि चमकदार बनते.
मध -साखर नको, फक्त वाटीभर लिंबाचा रस वापरुन घरच्याघरी वॅक्सिंग करण्याची नवी पद्धत...
थंडीत त्वचेवर हवा गुलाबी ग्लो? महागडे उपाय कशाला, फक्त ४ प्रकारे बिट लावा, पाहा जादू...
बेसन पिठात दूध मिसळण्याचे फायदे :- चमकदार त्वचेसाठी बेसन पीठाचा उपयोग केला जातो. हे टॅनिंग काढून टाकते आणि त्वचेची चमक कायम राखण्यास मदत करते. बेसन आणि गुलाबपाणी दोन्ही चेहऱ्यासाठी नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करतात. हे त्वचेतील ओलावा टिकून ठेवण्यास मदत होते. या फेसपॅकमुळे त्वचा मऊ आणि मुलायम होते. ज्यांची स्किन ड्राय किंवा खूपच ( Besan and Milk Face Pack Benefits For Dry Skin) कोरडी, रुक्ष आहे अशांनी बेसन पिठात दूध मिसळून लावल्याने त्वचेला अनेक फायदे मिळतात. बेसन आणि दूध यांचे मिश्रण उत्तम क्लिंजिंग एजंट म्हणून काम करते. त्वचेवर साचलेले अतिरिक्त तेल आणि घाण काढून टाकण्यास मदत होते. तसेच चेहऱ्यावरील छिद्र देखील या फेसपॅकमुळे स्वच्छ होतात. ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांनी बेसन पिठात दुध मिसळून चेहऱ्यावर लावावे. यामुळे तुमची त्वचा मऊ आणि चमकदार राहील. यासाठी २ चमचे बेसनमध्ये २ चमचे कच्चे दूध मिसळून त्याची स्मूद पेस्ट बनवा. आता ही तयार पेस्ट चेहऱ्यावर नीट लावा. त्यानंतर सुमारे १५ ते २० मिनिटे त्वचेवर तसेच लावून ठेवून द्या आणि नंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा.
कॉमेडियन भारती सिंह सांगते, केस काळे करण्याचा सुपरहिट फॉर्म्युला, पांढऱ्या केसांची चिंताच सोडा....
बेसन पिठात दही की दूध, नेमकं काय मिसळणे योग्य ?
खरंतर, बेसन पिठात दूध किंवा दही हे दोन्ही पदार्थ आपण मिसळून त्वचेसाठी त्याचा वापर करु शकतो. बेसन पिठात दूध किंवा दही यापैकी कोणताही एक पदार्थ मिसळणे योग्य किंवा अयोग्य आहे असे सांगता येणार नाही कारण दोन्ही पदार्थ त्यात असणाऱ्या गुणधर्मामुळे अगदी उत्तमच आहेत. दूध किंवा दही या दोन पदार्थांचा वापर त्वचेसाठी करणे फायदेशीरच आहे. फक्त आपल्या त्वचेचा प्रकार ओळखून मग बेसन पिठात नेमकं दूध मिसळावं का दही हे एकदा तपासून पाहावं.