केस गळण्याचा त्रास अनेकींना तरूण वयातच उद्भवतो. खासकरून ज्यावेळी महिला केस धुताात तेव्हा बरेच केस तुटून हातात येतात. गळण्याच्या भितीनं बऱ्याचजणी केस धुवायला कंटाळा करतात. केस धुतल्यानंतर काही गोष्टी केसांना लावल्या पाहिजेत. (What to apply on hair after bathing) यामुळे केस मॉइश्चरायझ होण्यास मदत होते. केस धुतल्यानंतर किंवा आंघोळीनंतर केसांना कोणत्या गोष्टी लावल्यानं केस गळणं थांबवता येईल ते समजून घेऊया. (Hair Care Tips)
केस धुतल्यानंतर केसांना काय लावायचं?
कंडीशनर लावा
शॅम्पूने केस धुतल्यानंतर केस खूप कोरडे होतात आणि खराब होतात, कारण त्यात अनेक हानिकारक रसायने असतात. म्हणूनच केसांना हेअर मास्क किंवा कंडिशनर लावणे आवश्यक आहे. ते नुकसान कमी करतात आणि केसांमधील आर्द्रता लॉक करण्यात मदत करतात.
हेअर सिरम लावा
केस धुतल्यानंतर जर तुम्ही कंडिशनर लावले नसेल तर केसांना नैसर्गिकरित्या कोरडे होऊ द्या. केस सुकविण्यासाठी ड्रायरचा वापर करू नका, कारण यामुळे केसांचे नुकसान वाढते आणि टाळू देखील कोरडी होते. केस कोरडे होऊ द्या आणि नंतर चांगले हेअर सीरम लावा, टाळूची मालिश करा आणि कंगव्याने केस व्यवस्थित विंचरा.
केस धुतल्यानंतर लगेच बांधू नका
केस ओले असताना कधीही बांधू नका. पूर्ण कोरडे झाल्यावर बांधा. ओले केस लवकर तुटतात. याशिवाय केस बांधण्यासाठी नेहमी सैल किंवा जास्त स्ट्रेचेबल हेअर इलास्टिक बँड वापरावा लागतो. नेहमी स्कार्फ किंवा झाकलेला स्नॅग-फ्री इलास्टिक बँड वापरा.
कंगव्याचा वापर
जेव्हा तुमचे केस पूर्णपणे कोरडे असतात तेव्हा ते सोडवण्यासाठी नेहमी रुंद कंगवा वापरा, बारीक कंगवा वापरल्याने केस तुटू शकतात.
हेअरस्टाईल करण्याआधी सिरम लावा
जर तुम्हाला कुठेही बाहेरजाण्यापूर्वी केसांची स्टाईल करायची असेल तर केस कोरडे झाल्यानंतर प्रथम केसांना सीरम लावा आणि त्यानंतरच ड्रायर किंवा हीटिंग प्रेस वापरा. यामुळे केसांचे नुकसान कमी होईल आणि केसांमध्ये चमकही येईल.