Lokmat Sakhi >Beauty > डोळ्यांखाली काळी वर्तुळं आणि सूज? तज्ज्ञ सांगतात 10 उपाय, सुजलेला चेहरा दिसेल सुंदर

डोळ्यांखाली काळी वर्तुळं आणि सूज? तज्ज्ञ सांगतात 10 उपाय, सुजलेला चेहरा दिसेल सुंदर

 विविध कारणांमुळे डोळ्याखाली काळी वर्तुळं (dark circles) आणि सूज (puffiness) येते. आपल्या नेहमीच्या दीनचर्येत काही गोष्टींचा समावेश केल्यास आणि घरगुती पातळीवरील (home remedies on dark circles and puffiness under eye) सोपे उपाय केल्यास अवघड वाटणारी समस्या दूर होते. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2022 01:54 PM2022-09-05T13:54:37+5:302022-09-05T14:04:49+5:30

 विविध कारणांमुळे डोळ्याखाली काळी वर्तुळं (dark circles) आणि सूज (puffiness) येते. आपल्या नेहमीच्या दीनचर्येत काही गोष्टींचा समावेश केल्यास आणि घरगुती पातळीवरील (home remedies on dark circles and puffiness under eye) सोपे उपाय केल्यास अवघड वाटणारी समस्या दूर होते. 

What to do for get rid of dark circles and puffiness under eye? | डोळ्यांखाली काळी वर्तुळं आणि सूज? तज्ज्ञ सांगतात 10 उपाय, सुजलेला चेहरा दिसेल सुंदर

डोळ्यांखाली काळी वर्तुळं आणि सूज? तज्ज्ञ सांगतात 10 उपाय, सुजलेला चेहरा दिसेल सुंदर

Highlights डोळ्यांना थंड शेक दिल्यास डोळ्यांखालच्या रक्तवाहिन्या संकुचित होवून तेथील काळेपणा कमी होतो. नैसर्गिक घटक आणि माॅश्चरायझर यांचा समावेश असलेलं अंडर आय क्रीम वापरावं.काकडी, मध,  लिंबाचा रस, टमाट्याचा रस, खोबरेल तेल या घरगुती गोष्टींचा वापर करुनही डोळ्यांखालील सूज आणि काळेपणा कमी होतो. 

डोळ्यांखाली सूज ( puffiness)  असल्यास, काळी वर्तुळं (dark circles) असल्यास चेहेऱ्याच्या सौंदर्यास बाधा येते हा अनुभव अनेकांच्या वाट्याला येतो. पण कितीही महागडे प्रोडक्टस वापरुनही फरक पडत नसल्याचीही अनेकांची तक्रार असते. डर्मा मिरॅकल क्लिनिकच्या संस्थापक- संचालक नवनीत हरोर डोळ्यांखालची सूज आणि काळी वर्तुळं यामागच्या कारणांची चर्चा करुन त्यावरचे सोपे उपायही (remedies on dark circles and puffiness under eye)  सांगितले आहेत. घरच्याघरी उपाय करुनही ही अवघड वाटणारी समस्या सहज सुटू शकते. 

Image: Google

डोळ्यांखाली सूज का येते?

नवनीत हरोर यांच्या मते वय वाढतं तशी डोळ्यांच्या आसपासची त्वचा कमजोर होते आणि ती सैल पडते. अनेकांच्या बाबतीत डोळ्यांच्या खाली चरबी जमा होवून सूज येते. सूज आलेल्या ठिकाणची त्वचा काळी पडते. डोळ्यांखाली सूज येण्यास,  काळी वर्तुळं येण्यास ॲलर्जी, स्मोकिंग, सायनसची समस्या, डीहायड्र्रेशन, ताण, रडणं, अनुवांशिकता, झोपेचा  अभाव किंवा झोपेशी निगडित समस्या ही कारणं कारणीभूत ठरतात.  ही समस्या घालवण्यासाठी विशिष्ट गोष्टींचा आपल्या दीनचर्येत समावेश करावा असं हरोर म्हणतात.

1. केवळ डोळ्याखालीच नाही तर शरीराच्या इतर कोणत्याही भागास सूज आल्यास कोल्ड कम्प्रेसचा उपाय करता येतो. थंड गोष्टीनं शेकण्यामुळे सूज, डोळ्याखालील काळेपणा कमी होतो. डोळे कोरडे होणे, लाल होणे, डोळ्यांना संसर्ग होवून डोळे दुखणे या समस्येत कोल्ड कम्प्रेसचा उपाय प्रभावी ठरतो. यासाठी चमचा फ्रिजरमध्ये ठेवून थंड करवा. थंड झालेल्या चमच्यानं डोळ्याखाली थोडा दाब देवून शेकल्यास डोळ्याखालील रक्त वाहिन्या संकुचित होतात त्यामुळे डोळ्याखालचा काळेपणाही कमी होतो. 

2. ग्रीन टी पिणे हा अनेकांच्या आरोग्यदायी जीवनशैलीचा भाग असतो. या ग्रीन टी चहाच्या बॅग्जचा उपयोग डोळ्यांखालची सूज आणि काळेपणा घालवण्यासाठी करता येतो. यासाठी  गरम पाण्यात ग्रीन टी बॅग्ज बुडवून ठेवाव्या. नंतर पाण्यातून ग्रीन टी बॅग्ज काढून त्या फ्रीजमध्ये ठेवून थंड कराव्यात. थंड झालेल्या ग्रीन् टी बॅग्ज डोळ्यांखाली ठेवल्यास डोळ्यांखालची काळी वर्तुळं डोळ्यांखालची सूज, डोळ्यांना होणाऱ्या वेदना कमी होतात. 

Image: Google

3. झोपताना मानेखाली जरा जाड उशी ठेवून डोकं थोडं वर ठेवून झोपल्यास डोळ्यांची सूज कमी होण्यास मदत होते. यामुळे रक्त प्रवाह सुधारतो, डोळ्यांखाली द्राव साचून राहात नाही.

4. डोळ्यांखाली जास्त सूज आणि काळेपणा असल्यास ते कमी करण्यासाठी अंडर आय मास्कचा वापर करावा. रेटिनाॅल, अ जीवनसत्व, ग्रीन टी हे घटक असलेले अंडर आय मास्क वापरावे. 

5. डोळे अगदीच निस्तेज झाले असतील, थकल्यासारखे वाटत असतील, डोळ्यांभोवतीच्या त्वचेवर सुरकुत्या दिसत असतील तर केवळ माॅश्चरायझर लावून भाग नाही. माॅश्चरायझरसोबरतच अंडर आय क्रीमचीही गरज असते. ज्यात नैसर्गिक घटकांचा वापर केलेला आहे, ज्यात माॅश्चरायझरचं प्रमाण जास्त असेल असं अंडर आय क्रीम वापरावं

6. ताज्या काकडीचा रस काढावा. त्यात कापूस बुडवून तो डोळ्यांवर ठेवावा. यामुळे सूज आणि काळी वर्तुळं दोन्ही कमी होण्यास फायदा मिळतो. 

Image: Google

7. रात्री झोपताना बोटांवर थोडं मध घ्यावं आणि ते हलक्या हातानं डोळ्यांच्या भोवताली लावावं. रात्रभर डोळ्यांभोवती मध राहू दिल्यास त्याचा चांगला फायदा होतो. 

8. लिंबाच्या रसाचा त्वचेला काही त्रास होत नसल्यास एका वाटीत लिंबाचा रस आणि थोडा टमाट्याचा रस घ्यावा. दोन्ही रस एकत्र करुन त्यात कापूस बुडवून डोळ्यांखाली हा रस लावावा. 

9. शुध्द स्वरुपातलं खोबऱ्याचं तेल घ्यावं. त्या तेलानं डोळ्यां भोवतीच्या भागावर हलक्या हातानं मसाज करावा. 

10. विटॅमिन इ ऑइलचे काही थेंब घेऊन त्याने डोळ्यांखाली मसाज केल्यास डोळ्यांखालची सूज कमी होते, काळी वर्तुळं कमी होतात आणि डोळ्यांखालच्या त्वचेचं संरक्षण होतं. 

Web Title: What to do for get rid of dark circles and puffiness under eye?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.