Lokmat Sakhi >Beauty > व्हॅक्सिंगनंतर त्वचेवर रॅश येते? लाल चट्टे-पूरळ उठते? अशावेळी काय करायचं?

व्हॅक्सिंगनंतर त्वचेवर रॅश येते? लाल चट्टे-पूरळ उठते? अशावेळी काय करायचं?

What to do if you get a rash after waxing? व्हॅक्सिंग तर अनेकजणी करतात पण त्यानंतर येणाऱ्या रॅशचं करायचं काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2023 04:08 PM2023-07-05T16:08:40+5:302023-07-05T16:09:23+5:30

What to do if you get a rash after waxing? व्हॅक्सिंग तर अनेकजणी करतात पण त्यानंतर येणाऱ्या रॅशचं करायचं काय?

What to do if you get a rash after waxing? | व्हॅक्सिंगनंतर त्वचेवर रॅश येते? लाल चट्टे-पूरळ उठते? अशावेळी काय करायचं?

व्हॅक्सिंगनंतर त्वचेवर रॅश येते? लाल चट्टे-पूरळ उठते? अशावेळी काय करायचं?

आजच्या फॅशनेबल जीवनशैलीत व्हॅक्सिंग हा ब्यूटी लाईफस्टाईलचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. धावपळीच्या जीवनशैलीत अनेकांना पार्लरमध्ये जाऊन व्हॅक्सिंग करायला जमत नाही. काही घरी तर काही पार्लरमध्ये जाऊन व्हॅक्सिंग करतात. व्हॅक्सिंगमध्ये देखील अनेक प्रकार आहेत. परंतु, व्हॅक्सिंग केल्यानंतर त्वचेवर बारीक पुरळ येणे, त्वचा लालसर होणे आणि खाज सुटणे इत्यादी समस्या निर्माण होतात(What to do if you get a rash after waxing?).

व्हॅक्सिंगनंतर रॅशेज का येतात?

व्हॅक्सिंग करताना हाता - पायांवरील केस जोरात खेचले जातात. ज्यामुळे त्वचेवरील पोर्स ओपन होतात. ओपन पोर्समध्ये बॅक्टेरियांचा प्रवेश होतो, ज्यामुळे त्वचेवर बारीक पुरळ येतात. काही लोकांना या समस्येपासून लगेचच आराम मिळतो. पण काही जणांना रॅशेजचा त्रास सहन करावा लागतो.

दोन गोष्टी शाम्पूत मिसळा आणि करा घरच्याघरी हेअरस्पा, केस चमकतील-पार्लरचा खर्चही वाचेल

रॅशेजवर उपाय काय?

या समस्येवर कायमस्वरूपी उपाय काय? असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? कारण व्हॅक्सिंग करणं गरजेचं आहे. त्यानंतर होणारा त्रास आपण कमी करू शकतो, पण कायमस्वरूपी यातून सुटका मिळेलच असे नाही. कारण प्रत्येकाच्या स्किननुसार ही समस्या कमी जास्त होत असते. यावर काही घरगुती उपाय म्हणून आपण काही टिप्स फॉलो करू शकता.

एलोवेरा जेल

एलोवेरा जेलमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळते. ज्यामुळे पुरळ, जळजळ, खाज सुटणे, या समस्येपासून आराम मिळतो. व्हॅक्सिंगमुळे त्वचेवर आलेली सूज व जळजळ कोरफड जेलने कमी करता येईल. व्हॅक्सिंग केल्यानंतर कोरफड जेल त्वचेवर लावा. हे जेल रात्रभर स्किनवर लावून ठेवा. सकाळी उठल्यानंतर पाण्याने स्किन स्वच्छ धुवा. यामुळे जळजळ थांबेल.

खोबरेल तेल रात्री लावा, सकाळी पहा जादू, पिवळे दात ते तुटकी नखे - समस्या गायब

साखरेचा स्क्रब

व्हॅक्सिंगनंतर त्वचेवर पुरळ उठत असतील तर, साखरेचा स्क्रब त्वचेवर लावा. हे स्क्रब तयार करण्यासाठी एका वाटीत अर्धा कप साखर घ्या, त्यात एक कप खोबरेल तेल मिक्स करा. हे स्क्रब त्वचेवर लावा, व हलक्या हाताने स्क्रब करा. यामुळे स्किन क्लिन होईल.

बर्फ

व्हॅक्सिंगनंतर जर त्वचेवर जळजळ होत असेल तर, त्यावर उपाय म्हणून आपण बर्फाचा उपयोग करू शकता. पुरळ व जळजळ कमी करण्यासाठी हलक्या हाताने बर्फाने मसाज करा. यासाठी एका कापडामध्ये बर्फ घ्या, त्यात आपण काकडी किंवा एलोवेरा जेलचा देखील वापर करू शकता. व याने त्वचेवर मसाज करा. किंवा आईस - ट्रेमध्ये पाण्यासोबत एलोवेरा जेल किंवा काकडीचा रस मिक्स करून या बर्फाचा वापर करा.

Web Title: What to do if you get a rash after waxing?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.