सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. त्यातच मकर संक्रांतीच्या हळदीकुंकूचा कार्यक्रमही असतोच.. अशावेळी वारंवार पार्लरमध्ये जाणं अनेकींना शक्य होत नाही. किंवा दरवेळी पार्लरमध्ये जाऊन फेशियल किंवा क्लिनअप अशा महागड्या ब्यूटी ट्रिटमेंट्सवर पैसे खर्च करण्याची इच्छा होत नाही. अशावेळी चेहऱ्याची गेलेली चमक पुन्हा आणण्यासाठी आपण नक्कीच काही घरगुती उपाय करू शकतो. हे उपाय केल्यामुळे चेहऱ्यावरचं टॅनिंग, डेडस्किन निघून जाते आणि चेहरा पुन्हा स्वच्छ, नितळ, चमकदार होतो (Wheat Flour Face Pack For Instant Glow). असाच एक चेहऱ्यावर चमक आणणारा गव्हाच्या पिठाचा फेसपॅक कसा करता येऊ शकतो, ते आपण पाहूया..(how to make skin glowing and clean?)
गव्हाच्या पिठाचा फेसपॅक
गव्हाच्या पिठाचा फेसपॅक तयार करण्यासाठी एका वाटीमध्ये १ ते २ चमचे गव्हाचे पीठ घ्या.
लग्नसराई स्पेशल अंगठ्यांचे ७ सुंदर पर्याय!! कपल रिंग घालून करा रोमँटीक नात्याची सुरूवात
या पिठामध्ये २ चमचे कच्चे दूध घाला. कच्च्या दुधामध्ये असणारे लॅक्टीक ॲसिड त्वचेसाठी अतिशय उपयुक्त ठरते. त्यामुळे त्वचेवरील काळपट डाग कमी होत जातात आणि त्वचा स्वच्छ, नितळ होण्यास मदत होते. चेहऱ्यावरचे ओपन पोअर्सही बऱ्याच प्रमाणात कमी होतात. तसेच त्वचा छान माॅईश्चराईज होते.
गव्हाच्या पिठामध्ये कच्चे दूध टाकल्यानंतर त्यामध्ये १ चमचा ग्लिसरीन आणि १ चमचा गुलाब जल टाका. सगळे पदार्थ व्यवस्थित एकत्र करून त्याची पेस्ट तयार करा.
पोळ्या नेहमीच कडक, वातड होतात? ६ स्पेशल टिप्स- चपात्या होतील मऊ, सगळेच करतील कौतुक
आता हा लेप तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर ८ ते १० मिनिटांनी लेप जेव्हा अर्धवट सुकेल तेव्हा पुन्हा थोडेसे चोळून तो काढून टाका आणि चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
तुम्हाला चेहऱ्यामध्ये खूप छान फरक जाणवेल. त्वचेवरचं टॅनिंग, डेडस्किन जाऊन त्वचा अधिक मऊ, चमकदार झाल्यासारखी वाटेल.