Lokmat Sakhi >Beauty > गव्हाच्या पिठाचा फेसपॅक ? नवल वाटलं ना, पण फेशियल विसराल; हा पॅक वापरुन पहा!

गव्हाच्या पिठाचा फेसपॅक ? नवल वाटलं ना, पण फेशियल विसराल; हा पॅक वापरुन पहा!

 प्रदूषण, ताण-तणाव आणि वाढतं वय याचा परिणाम त्वचेवर होतोच. हा परिणाम घालवण्याची ताकद गव्हाच्या पिठाच्या लेपात आहे. पोळ्यांसाठी गव्हाचं पीठ घरात असतंच. त्यामुळे हा लेप बनवण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतात असंही नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 03:24 PM2021-06-07T15:24:21+5:302021-06-07T15:30:33+5:30

 प्रदूषण, ताण-तणाव आणि वाढतं वय याचा परिणाम त्वचेवर होतोच. हा परिणाम घालवण्याची ताकद गव्हाच्या पिठाच्या लेपात आहे. पोळ्यांसाठी गव्हाचं पीठ घरात असतंच. त्यामुळे हा लेप बनवण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतात असंही नाही.

Wheat flour facepack? No wonder, but forget the facial; Try this pack! | गव्हाच्या पिठाचा फेसपॅक ? नवल वाटलं ना, पण फेशियल विसराल; हा पॅक वापरुन पहा!

गव्हाच्या पिठाचा फेसपॅक ? नवल वाटलं ना, पण फेशियल विसराल; हा पॅक वापरुन पहा!

Highlightsगव्हाच्या पिठाचा उपयोग करुन उन्हानं आलेला काळवंडलेपणा, चेहेऱ्यावर लवकर सुरकुत्या पडणं या समस्या सोडवता येतात.गव्हातल्या अंगभूत गुणांमुळे कणकेपासून तयार केलेला हा लेप उत्तम स्क्रबचंही काम करतो. कणकेचा लेप लावल्यानं चेहेऱ्याची त्वचा तरुण दिसते. कारण या लेपामुळे चेहेऱ्याची त्वचा घट्ट होते.

 गहू हा भारतीय आहारातला मूख्य घटक. गव्हाचा विचार हा केवळ आहारापूरताच करण्याची आपली सवय आहे. पण ही सवय थोडी बदलावी लागेल. कारण गहू हे जेवढे शरीरासाठी लाभदायक आहेत तितकेचं त्वचेची काळजी घेण्यासाठीही गहू फायदेशीर ठरतात. पण त्वचेसाठी गहू ते कसे वापरायचे? त्वचेसाठी गव्हाच्या पिठाच्या लेपाचा उपयोग परिणामकारक ठरतो.
गव्हाच्या पिठाचा उपयोग करुन उन्हानं आलेल्ला काळवंडलेपणा, चेहेऱ्यावर लवकर सुरकुत्या पडणं या समस्या सोडवता येतात. यासोबतच त्वचेसंबंधी अनेक विकारांवर गव्हाच्या पिठाचा वापर होतो. प्रदूषण, ताण-तणाव आणि वाढतं वय याचा परिणाम त्वचेवर होतोच. हा परिणाम घालवण्याची ताकद गव्हाच्या पिठाच्या लेपात आहे. पोळ्यांसाठी गव्हाचं पीठ घरात असतंच. त्यामुळे हा लेप बनवण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतात असंही नाही.


कसा तयार करायचा कणकेचा फेस पॅक
हा फेसपॅक तयार करण्यासाठी दोन चमचे गव्हाचं पीठ, अर्धा चमचा कोरफड गर किंवा बाहेर तयार स्वरुपात मिळणारं अ‍ॅलोवेरा जेल, एक चमचा चंदन पावडर, एक चमचा लिंबाचा रस किंवा दही आणि एक चमचा कुस्करलेलं केळ आणि गुलाब पाणी. हे सर्व घटक नीट एकत्र करावेत आणि चेहेऱ्यास हा लेप लावावा. लेप कोरडा होईपर्यंत २०- २५ मिनिटं ठेवावा. मग पाण्यानं चेहेरा धूवावा. चेहेरा रुमालानं टिपून घ्यावा. मग चेहेऱ्यास आधी टोनर लावावं . ते वाळलं की चेहेऱ्यास मॉश्चरायझर लावावं.


कणकेच्या लेपानं काय होतं?
 गव्हाच्या पिठात अ जीवनसत्त्व आणि प्रथिनं भरपूर प्रमाणात असतात. सोबतच त्यात कर्बोदकं आणि फायबरही असतात. कणकेच्या या गुणधर्मामुळे यापासून तयार केलेला हा लेप उत्तम स्क्रबचंही काम करतो.
गहू भिजवून त्याला मोड काढून खाणं पौष्टिक असतं. त्याचप्रमाणे त्याचा लेपही त्वचेसाठी पोषक असतो. त्यासाठी मोड आलेले गहू वाटून घेवून त्यात वर उल्लेख केलेले इतर साहित्य घालून लेप तयार केल्यास हा लेप त्वचेला भरपूर प्रथिनं पुरवतो.
तेलकट त्वचेसाठी कणकेचा लेप तयार करताना त्यात तीन चमचे गव्हाचं पीठ, दोन चमचे गुलाब पाणी, दोन चिमूट हळद, एक चमचा कोरफड गर किंवा अ‍ॅलोवेरा जेल घ्यावं. हे सर्व नीट एकत्रित करुन चेहेऱ्यास लावावं. या लेपानं तैल ग्रंथीतून तेल स्रवण्यावर नियंत्रण येतं आणि त्वचा तेलकट दिसत नाही.
कणकेचा लेप लावल्यानं चेहेऱ्याची त्वचा तरुण दिसते. कारण या लेपामुळे चेहेऱ्याची त्वचा घट्ट होते. ती सैल पडत नाही. अशी घट्ट त्वचा तरुण दिसते.

Web Title: Wheat flour facepack? No wonder, but forget the facial; Try this pack!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.