त्वचेची काळजी घेण्यासाठी फेशियल, स्क्रब, क्लिनअप या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं असतं (When to do facial, scrub and cleanup?). आपण त्या करतोही. पण या सगळ्या स्किनकेअर ट्रिटमेंट नेमक्या किती दिवसांतनी कराव्या, दोन ट्रिटमेंटमध्ये नेमका किती दिवसांचा गॅप असावा, असा प्रश्न बऱ्याच जणींना नेहमीच पडतो. शिवाय त्वचा नेहमीच तजेलदार, चमकदार, तरुण दिसावी, यासाठी रोजचं स्किनकेअर रुटीन काय असावं, याची योग्य माहितीही अनेकींना नसते (What is the right time for doing bleach?). म्हणूनच या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळण्यासाठी ही माहिती नक्की वाचा. यातून रोजच्या रोज त्वचेची कशी काळजी घ्यायची, आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा काय उपाय करायचे याची योग्य माहिती मिळेल. (regular skin care routine for young, beautiful and radiant skin)
स्किनकेअर कॅलेंडर
त्वचेची कशा पद्धतीने काळजी घ्यावी, याचं एक छानसं स्किनकेअर कॅलेंडर इन्स्टाग्रामच्या karishma__makeupartist या पेजवर शेअर करण्यात आलं आहे.
कुंडीतल्या मातीला बुरशी आली- किडे झाले? १ सोपा उपाय, मातीतलं इन्फेक्शन दूर होईल- झाडं जोमात वाढतील
१. रोजचं स्किनकेअर रुटीन
यामध्ये असं सांगितलं आहे की आपण फेसवाॅश करतो. त्यानंतर मात्र त्वचेला काही कॉस्मेटिक्स लावणं गरजेचं आहे. जसे की चेहरा धुतल्यानंतर त्वचेला टोनर, सेरम लावावं. त्यानंतर डोळ्यांच्या खालच्या भागात आयक्रिम लावावं. त्यामुळे डोळ्यांच्या खालच्या भागात सुरकुत्या पडत नाहीत. या गोष्टी लावून झाल्यानंतर त्वचेला मॉईश्चरायझर, सनस्क्रिन लावावं. अनेकजणी सनस्क्रिन लावायला विसरतात. पण त्यामुळे त्वचेचं नुकसान होऊ शकतं. यानंतर मग ओठांसाठी लिपबाम लावावं. या सगळ्या गोष्टी करणं हा आपल्या रोजच्या स्किनकेअर रुटिनचा भाग असाव्या.
२. आठवड्यातून एकदा करण्याचं स्किनकेअर रुटीन
बऱ्याचदा स्क्रब कधी करावं, याचा अंदाज येत नाही. त्यामुळे मग काही जणी ते महिन्यातून एकदा करतात तर काही जणी आठवड्यातून दोनदा करतात. पण या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. आठवड्यातून एकदाच स्क्रब करावं. तसेच स्क्रब केल्यानंतर लगेचच मास्क लावावा.
ऐकली होती का कधी सफरचंदाची इडली? हा विचित्र प्रयोग पाहून नेटिझन्स हैराण, बघा व्हायरल व्हिडिओ
३. महिन्यातून एकदा करण्याचं स्किनकेअर रुटीन
महिन्यातून एकदा फेशियल करणं गरजेचं आहे. फेशियल करण्याच्या आधी ब्लीच किंवा डिटॅन यापैकी जे तुमच्या त्वचेला सूट होईल, ते करावं.