Lokmat Sakhi >Beauty > कोणता कंगवा वापरणे केसांसाठी योग्य? चुकीचा कंगवा वापरल्याने तर तुमचे केस गळत नाहीत...

कोणता कंगवा वापरणे केसांसाठी योग्य? चुकीचा कंगवा वापरल्याने तर तुमचे केस गळत नाहीत...

Which Comb is good for Scalp बाजारात अनेक प्रकारचे कंगवे मिळतात. मात्र, कोणता कंगवा आपल्या केसांसाठी फायदेशीर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2023 02:07 PM2023-01-13T14:07:11+5:302023-01-13T14:08:54+5:30

Which Comb is good for Scalp बाजारात अनेक प्रकारचे कंगवे मिळतात. मात्र, कोणता कंगवा आपल्या केसांसाठी फायदेशीर..

Which comb to use for hair? Using the wrong comb doesn't make your hair fall out... | कोणता कंगवा वापरणे केसांसाठी योग्य? चुकीचा कंगवा वापरल्याने तर तुमचे केस गळत नाहीत...

कोणता कंगवा वापरणे केसांसाठी योग्य? चुकीचा कंगवा वापरल्याने तर तुमचे केस गळत नाहीत...

आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यावर केस चारचांद लावतात. व्यस्त जीवनशैलीमुळे केसांची निगा राखणं आपल्यासाठी कठीण जाते. मात्र, केसांच्या बाबतीत छोट्या - मोठ्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक. केस धुण्यापसून ते विंचरण्यापर्यंत केसांची काळजी घेणं महत्त्वाचे आहे. केसांच्या सौंदर्यासाठी आणि आरोग्यासाठी केस विंचरण्याकडे बारकाईनं बघायला हवं. कारण कंगवाने आपण केस विंचरतो. कंगवा आपल्या केसांच्या मुळापर्यंत जाते. त्यामुळे आपण कोणता कंगवा किंवा ब्रश वापरावा याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे.

साधारणपणे केस विंचरण्यासाठी नायलॉन, प्लास्टिक किंवा तत्सम घटकांपासून तयार झालेले कंगवे आपण वापरतो. काही कंगव्यांच्या दातामुळे टाळूला जखमा होवू शकतात. त्यामुळे आपल्या केसांसाठी योग्य कंगवा निवडण्याकडे लक्ष देणं आवश्यक.

यासंदर्भात त्वचारोगतज्ञ डॉ. आंचल पंथ सांगतात, "केसांसाठी लाकडी कंगवा खूप फायदेशीर आहे. केसांवर लाकडी कंगवा वापरल्याने स्थैटिक इलेक्ट्रिसिटी कमी होते याने केस गळणे थांबते. लाकडी कंगवा केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे परंतु सर्व प्रकारच्या केसांवर ते प्रभावी नाही.

ज्या महिलांची टाळू तेलकट असते, किंवा ज्यांच्या टाळूवर जास्त कोंडा साचतो त्यांनी लाकडी कंगवा वापरू नये. लाकडी कंगवा सच्छिद्र असतात आणि ते टाळूवर तेल, जीवाणू आणि बुरशीला अडकवू शकतात. ज्या लोकांना टाळूच्यासंबंधित या सर्व समस्या आहेत त्यांनी लाकडी कंगवा वापरू नये."

लाकडी कंगव्याचे फायदे

मुंबईच्या कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमधील कन्सल्टंट डर्मेटोलॉजिस्ट आणि ट्रायकोलॉजिस्ट डॉ तृप्ती डी अग्रवाल म्हणतात, "प्लास्टिकच्या कंगवापेक्षा लाकडी कंगवा अधिक चांगल्या असतात. लाकडी कंगवे कमी तुटतात, याने टाळूवर इजा होत नाही. यासह रक्त परिसंचरण सुधारते. या कंगव्याने केस विंचरल्याने केसांची योग्य वाढ होते. हे टाळूचा कोरडेपणा आणि खाज कमी करते."

Web Title: Which comb to use for hair? Using the wrong comb doesn't make your hair fall out...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.